Sunday, April 2, 2023

सासू सुनेची आई

कशी होईल सासू
तिच्या सुनेची हो आई ।
मधे दोघींच्या तर आहे
खोल किती ती खाई ।

आई मायेची पाखर
गोड किती ती साखर ।
सासू कडू लिंबाचे पान
कशी भासते ती प्रखर ।

भांडे सासा सूना दोघी
लोक आजूबाजूचे बघी ।
होई शब्दा शब्दात वाद
नाते नसेल असे जगी ।

भाव आईचा कसा बघा
नेला हिसकावून पोरगा ।
प्रेम किती तिच्या अंतरात
वाटे केला सूनेनेच दगा ।

सून कशी ती बिचारी
जीव लावते नवऱ्यावरी ।
गोंधळ होतो हो आईचा
प्रेम तिचे मुलावर भारी ।
Sanjay R.


No comments: