Sunday, July 31, 2022

तुझं माझं

तू आग मी पाणी
चित्र तू मी वाणी ।
काळ्या पाटीवर
उमटते लेखणी ।
अवतरते तू कशी
शब्दांची कहाणी ।
शोभते जशी मलाच
माझी म्हणून रागिणी ।
सुंदर या माळेतला
मौल्यवान तू मणी ।
तुझं माझं जमेना
बघ क्षणो क्षणी ।
Sanjay R.


आकाशाला हात

करू कशी सुरुवात
टेकेना आकाशाला हात ।
आभाळ टाकायचे सारून
पावसाने केला घात ।
निसर्गाने दिले जीवन
जन्मोजन्मीची ही साथ ।
पाण्याविना कठीण सारे
देईल पाऊसच मात ।
Sanjay R.


रात्र

रात्र असते अंधाराची
सत्ता सम्पते दिवसाची ।
सूर्य होतो नजरेआड
अवतरते छवी चंद्राची ।
चांदण्यांचे चाले नृत्य
चढते नशा अंधाराची ।
हळू हळू सरतो होश
चाहूल लागते सूर्याची ।
पहाट होता रात्र सरते
सत्ता सुरू दिवसाची ।
Sanjay R.


Friday, July 29, 2022

चाहत

जीनेको क्या चाहीये
एक सांस है काफी ।
तन मन धन और क्या
रह गया सब बाकी ।

चाहतको कोन रोक पाया
बच्चाभी चाहता एक टॉफी ।
कभी न भरता ये दिल
बस दुनिया है एक झाकी ।
Sanjay R.


विठ्ठल विठ्ठल

ओढ मनात दर्शनाची
धरली वाट पंढरीची ।

डोई पावसाच्या धारा
सुखावणारा होता वारा ।

लोट माणसांचे तेथे ।
पांडुरंग उभा जेथे ।

भरून इंद्रायणीचा काठ
झाली पुंडलिकाची गाठ ।

भाव भक्तीचाच सारा
जगी विठ्ठल एक तारा ।

हात चरणाशी लागता
कानी तुकोबाची गाथा ।

वसता डोळयात मूर्ती
आली आनंदाला भरती

मखातून पडले बोल
जय हरी विठ्ठल विठ्ठल ।
Sanjay R.


सपना

तुझे पाने का
था सपना मेरा ।
रात अंधेरी है
कब होगा सवेरा ।
रातभर तडपा
अंधेरेसे घेरा ।
तोडकर लौटा
चांद का पहेरा ।
अब भी है सूरज
छिपाये चेहरा ।
बादल है बांधे
बारीश का सेहरा ।
Sanjay R.

उंच झोका

जितका उंच झोका
त्यात तितकाच धोका ।
उंचावर जाताच वाटे
अरे कुणीतरी रोका ।
पोटात उठतो गोळा
हृदयाचा चुकतो ठोका ।
मग वाटतो नकोच
इतका उंच झोका ।
Sanjay R.


Thursday, July 28, 2022

कुठे पैशाचा अंबार

कुठे पैशाचा अंबार
कुठे फक्त अंधार ।

कोणी इथे निराधार
शोधतात आधार ।
बघा त्यांचे आचार
जीवन ज्यांचे लाचार ।
कुठले हे असे विचार
गेलेत कुठे सुविचार ।
सांगा किती हा भार
करेल का कोणी प्रहार ।
Sanjay R.


बांधते दुःखाशी गाठ

झेलून मी दुःख
बघतो सुखाची वाट ।
सुख दुरून जाते
बांधते दुःखाशी गाठ ।

बघतो जेव्हा जेव्हा
सुखाचा तिथे मी थाट ।
जणू सागराचा किनारा
जाते घेऊन सारेच लाट ।

सरी श्रावणाच्या येता
झुळझुळ वाहे पाट । 
शोधू कुठे मी आता
सुंदर तोच तो काठ ।
Sanjay R.


बदला

घेतो कशाचा तू बदला
नाही मार्ग कुठे मधला ।
नशिबाचे भोग सारे
कोण यातून सुटला ।
हास्य जरी असेल गाली
पापण्यात थेंब दडलेला ।
न कळे अंतराची व्यथा
दिसतो कुणास रडलेला ।
Sanjay R.

काळोख

दुःख जन्माचे भोगतो
जीवन पिंजऱ्यात जगतो ।

नाही मोकळे आकाश
दिसतो काळा प्रकाश ।

वाटते भय आकृत्यांचे
वसले काय डोळ्यात ।

अंतरात होते धडधड
हुंदका दाटला काळजात ।
Sanjay R.


Wednesday, July 27, 2022

गोड तुझे अभंग

भक्तीत तुझ्या रे मी
आहे असा दंग ।
गेलो मिळून अवघा
झालो एक रंग ।
वाटे ठाई तुझ्याच
राहावे संग संग ।
गावे सदा तुझेची
गोड तुझे अभंग ।
स्मरण तुझेची होता
मीही व्हावे पांडुरंग ।
विठ्ठल विठ्ठल जपावे
नामात व्हावे दंग ।
Sanjay R.

नाही मनाला ठाव

नाही मनाला ठाव
घेईल कुठे ते धाव ।
बघताच वाटे हवे
असते सदाच हाव ।
विचारेल कोण कोणा
काय रे तुझे नाव ।
ठेवील आपला ठसा
मग खाईल किती भाव ।
सांगा जरा कोण तो
आहे आपलाच राव ।
जातो उधळून सारे
सोसतो गहिरा तो घाव ।
नका सांगू काही आता
मोडला त्याचा डाव ।
फिरवा धरून त्याला
कुठवर त्याची धाव ।
सर्यास सांगतो आता
चोर मी झालो साव ।
Sanjay R.


अंतराचे धडधडणे

गाऊ कसे कळेना
माझे जीवन गाणे ।
वाटेवर क्षणो क्षणी
विचारांचे देणे घेणे ।

कधी ओलवतात कडा
कधी डोळ्यांचे वाहणे ।
गालात फुलते हास्य
आगळे जीवनाचे तराणे ।

आठवणीत काय किती
आतच हृदयाचे रडणे ।
आशेने बघतो जेव्हा
ऐकतो अंतराचे धडधडणे ।
Sanjay R.






लपला सूर्य कुठे

लपला सूर्य कुठे
वर आभाळ दिसते ।
सर सर येतो पाऊस
ऊन मात्र नसते ।

जिकडे तिकडे पाणी
भर भरून वाहते ।
जगणे झाले कठीण
नदीच झाले रस्ते ।
Sanjay R.


नवा सूर

आठवते मज ती वेळ
लोकडाऊन चा काळ ।

सगळेच बंद होते घरात
कुणीच नसायचे दारात ।

कळेना कोण कसा कुठे
वाटे जीवनाचे संकट मोठे ।

टळले आता संकट सारे
भीतीचे सावट झाले दूर
चला एकदा लावू सारे
सोबतीला एक नवा सूर ।
Sanjay R.

Tuesday, July 26, 2022

माझी मलाच सजा

विसरेल मी कसा
मनात तू माझ्या ।
आठवणीत विसरतो
मलाच मी तुझ्या ।
मनात भाव तोच
होईल कसा दुजा ।
नाहीस तू ही तर
माझी मलाच सजा ।
Sanjay R.

गरज

काय समजायचे ते समज
प्रत्येकाला असते गरज ।
आज जशी मला गरज
पडेल उद्या तुलाही समज ।
Sanjay R.


हवी तुझी साद

वाद हा कशाचा
हवा थोडा संवाद ।
मूक मी कसा राहू
मनही करतं नाद ।
नको काही मज
फक्त हवी थोडी दाद ।
गैरसमज आहे सारा
हवी तुझी मज साद ।
Sanjay R.

गैर समज

काय तुझ्या मनात
कसा हा समज ।
अबोला वाटे मज
तुझाच गैर समज ।

कळेना तुझे विचार
बंद झाले दार ।
झेलु कसा मी भार
होता तुझाच आधार ।

बघतो दूर आकाशात
मनास वाटते चिंता ।
शोधतो उत्तर प्रश्नाचे
सुटेल कसा हा गुंता ।
Sanjay R.


Monday, July 25, 2022

वाळूचे घर

चिमणीचे घर मेणाचे
कावळ्याचे घर शेणाचे ।
एकदा पाऊस आला धावून
कावळ्याचे घर गेले वाहून ।
स्वप्न होते आमच्या बाळूचे
घर बांधायचे मग वाळूचे ।
येऊ दे पाऊस कितीही
हातपाय त्याचेच बांधायचे ।
गडबड केली पावसाने तर
सूर्याला जाऊन सांगायचे ।
बांधले घर मग बाळूने
मजला चढला वाळूने ।
पावसात गेले घर वाहून
सूर्याला सांगायचे गेले राहून ।
Sanjay R.


छंद लागला

छंद लागला मज
वेड म्हणू का त्याला ।
मोबाईल हातात सदा
जसा तो इश्कचा प्याला ।

चढते नशा मज त्याची
सांगू मी कुणाला ।
आनंदाला येते भरती
रिझवतो मीच मनाला ।

देहभान हरपून सारे
विसरतो मी जगाला ।
छंद हा सुटता सुटेना
तळमळ होते क्षणाला ।
Sanjay R.


राजेशाही

कोण राजा कोण रंक
सम्पला तो नाटकाचा अंक ।

राजा गेला उरली प्रजा
वाटेल तशी सुरू आहे मजा ।

राजा राणी कथेत उरली 
राजकुमारी केव्हाच हरली ।

मी मी म्हणतो राजकुमार
जगणे त्याचे चाले उधार ।

गेलेत सारे संत्री मंत्री
उरलेत फक्त पातळ तंत्रि ।
Sanjay R.

Saturday, July 23, 2022

आठवणी किती

आठवणी किती
साठलेल्या या मनात ।
भराभर येती पुढे
फक्त काही क्षणात ।

याद होते जेव्हा
धरतात फेर मनात ।
कधी मुखावर हास्य
कधी पाणी डोळ्यात ।
Sanjay R.


पाणीच पाणी

नको त्या आठवणी
नको ते विचार ।
वाळूचे घर बांधले
लाटेपुढे होते लाचार ।

जिकडे तिकडे पाणीच पाणी
नाही कशाचाच आधार ।
सतत पडतोय हा पाऊस
सोबत डोळ्यांनाही धार ।

घराला तर छत नाही
उरल्या कुठे भिंती चार ।
शेतात नुसतेच पाणी
डोक्यावर कर्जाचा भार ।

तापाने नुसता फणफणतो 
अंग ही  पडले गार ।
हसू कसा रडू कसा 
जीवनाचा तर हाच सार ।
Sanjay R.

Friday, July 22, 2022

रेशमी धागा

बंध प्रेमाचा कसा
जसा रेशमी धागा ।
तुटेल कसा सहज
अंतरात ज्याची जागा ।
Sanjay R.


पिंजरा

मन माझे पिंजरा
बंद त्यात भावना ।
बघतो दूर गगनात
जाऊ कुठे कळेना ।
Sanjay R.


भरारी

कशी ही दुनियादारी
वाटे किती ही भारी ।
कळेना मन कुणाचे
आभास सारे विषारी ।
खुले हे आकाश सारे
घेऊ कशी मी भरारी ।
दूर गगनात फिरतो
वाटे मीच हो विचारी ।
Sanjay R.


धावा

लय झाला पाऊस
थाम्ब न रे बावा
वावरात निस्त पानी
करू कोनाचा धावा ।
घरात पानीच पानी
लेकरायचा पहा कावा ।
सारंच त डुबलं आता
कोण देईन  ठावा ।
Sanjay R.


लग्नाची बेडी

कशी असते सांगा
लग्नाची बेडी ।
स्वातंत्र्य हिरावते
गळ्यात पडते वेडी ।
वाढते मग जवाबदारी
अवस्था वाईटच थोडी ।
पण काळजी घेते ती
करते लाडी गोडी ।
धक्का बसतो कधी
इतकी काढते खोडी ।
सुखी जीवनाची असते
सोबत तिचीच जोडी ।
Sanjay R.


विश्वास

पडेल कसा कमी
माझा आत्मविश्वास ।
मोकळ्या हवेत मी
घेतोच आहे श्वास ।
नाही उरलेत आता
काही कशाचे ध्यास ।
स्मरण होताच तुझे
मिळतो मज विश्वास ।
Sanjay R.


आत्मविश्वास

मनात एकच ध्यास
करितो तयाचे प्रयास ।
अजूनही आहे विश्वास
भरतो एक एक श्वास ।
नाहीत आता आभास
आहे फक्त आत्मविश्वास ।
Sanjay R.


प्रेमाची वाट

कुठे थांबते ही वाट
एकदा होताच गाठ ।
वळणा वरून फिरते
सुटेना क्षणभर पाठ ।

लगबग ज्याची किती
सोडवेना कधी काठ ।
परतते आली जशी
जणू सागराची लाट ।

आठवण सुटता सुटेना
हृदयात रुतून दाट ।
रात्र निघते जागून
केव्हा होईल पहाट ।

हरपते भान सारे
विचार होतात सैराट ।
नकळत वळती पाऊले
सुखावते प्रेमाची वाट ।
Sanjay R.


वाट

वाट कुठे ही साधी सरळ
काटे कुटे त्यात किती ।
मनात भरते धडकी
मग वाटते सारखी भीती ।
मनात सारखी चिंता
वाटे कशास मारली मती ।
थांबतात अचानकच श्वास
कधी थांबते हृदयाची गती ।
वाट जरी ही वाटे प्रेमाची
कठीण आहे ही अती ।
जपून चाला या वाटेवर
जायचे असेल जर सती ।
Sanjay R.


डोळ्यांची भाषा

डोळ्यांची भाषा सांगा
कुणास कळेना ।
भाव मनातले होतात व्यक्त
वाटते बघावे परत पण
मानच हो वळेना  ।
Sanjay R.


Thursday, July 7, 2022

सात जन्माची जोडी

तुझी माझी आता ही
सात जन्माची जोडी ।
सुख दुःख घेऊ वाटून
त्यातच आहे गोडी ।
दूरचा आहे हा प्रवास
सागरात निघाली होडी ।
कुठे किनारा सागराचा
नेऊन लाट तिथे सोडी ।
Sanjay R.


तिथेच जुळते जोडी

नशिबाचा खेळ सारा
तिथेच जुळते जोडी ।
आयुष्यभर पुरते मग
अवीट संसारात गोडी ।
Sanjay R.


रिमझिम पाऊस

सांग असा कसा रे
तू पाऊस ।
कुठे पडतो नि......
कुठे पडत नाहीस ।

रिमझिम तू पडतो
वाटते किती हाऊस ।
झड लावतो जेव्हा
अंत नको रे तू पाहुस ।

वाट पाहतात सारे
तुझ्या येण्या अन जाण्याची ।
उमगते मग आम्हा
गरज किती रे पाण्याची ।

थेंब येतो जेव्हा डोळ्यात
हुंदका दाटतो गळ्यात ।
थेंब थेंब भिजून माती
अंकुर फुटतो मळ्यात ।
Sanjay Ronghe


Wednesday, July 6, 2022

मुक्ती आता हवी

थकलो कंटाळलो
मुक्ती आता हवी ।
जाऊ कुठे मी आता
हवी वाट एक नवी ।
रोजच असते सकाळ
पूर्वेला उगवतो रवी ।
रात्र असते काळी
बंधनात तू अवि ।
Sanjay R.

कुठे मुक्ती

बंधनातून या कुठे मुक्ती
निष्फळ होतील साऱ्या युक्ती ।

जीवनाचे तर रंग अनेक
नाही बंधन नाही सक्ती ।

मनात आहे एकच भाव
करतो मी तुझीच भक्ती ।

विश्वास माझा ढळला नाही
हवी मजला तुझीच शक्ती ।
Sanjay R.


हवे एक बंधन

नको आता मुक्ती
हवे एक बंधन ।
परत एकदा बघा
करा जरा मंथन ।

विचारांना नाही
कुणाचा लगाम ।
वागणूक झाली
किती ही बेफाम ।

नाही कुणाचा मान
विसरलो सन्मान ।
मिरवतात सारेच
स्वतःचा अभिमान ।
Sanjay R.


Tuesday, July 5, 2022

तांडव

करतात तांडव या लाटा
परततात आपल्या वाटा ।

असे कसे हे वादळ उठले
सोबत पाऊस वारे सुटले ।

नदी नाले ही बेफाम झाले
बुडऊन अंगण पाणी आले ।

जिकडे तिकडे पाणी पाणी
सांग पावसा तुझी कहाणी ।

होते नव्हते सारेच बुडले ।
घर कुठे ते छप्पर उडले ।

थाम्ब थाम्ब रे तू पावसा ।
रात्र झाली बघतो दिवसा ।

सूर्य कुठे तो कसा दिसेना 
भरले आभाळ  चूप बसेना ।
Sanjay R.

अंतर मनातले

नको दूर जाऊ
स्वप्न एक पाहू ।
अंतर मनातले
नको त्याचा बाऊ ।
धरून हात आता
सोबत थोडं धावू ।
जीवाला जीव हा
एना थोडा लावू ।
Sanjay R.


षडयंत्र

विनाशाचे एकच तंत्र
चाले सगळे षडयंत्र ।
खेळ बिघडवतो कोणी
कानात फुंकतो मंत्र ।
बघे बघतात सारे
सोडते प्राण ते यंत्र ।
Sanjay R.


Monday, July 4, 2022

अंतर मनातले

नको दूर जाऊ
स्वप्न एक पाहू ।
अंतर मनातले
नको त्याचा बाऊ ।
धरून हात आता
सोबत थोडं धावू ।
जीवाला जीव हा
एना थोडा लावू ।
Sanjay R.


वाट प्रेमाची

असू दे दोन टोके कशाची
जुळणार नाही रीत जगाची ।
मिळतील जिथे ती दोन टोके
तीच तर वाट असे प्रेमाची ।
Sanjay R.


अंतर दोन पावलांचे

अंतर किती हे
फक्त दोन पावलांचे ।

पाऊल एक तुझे
दुसरे पाऊल माझे ।

नाही कुठे दुरावा
हवा कशाला पुरावा ।

मनाला तर हवा
मेळ भावनांचा ।

हृदय झाले एक
श्वास जीवनाचा ।
Sanjay R.


नाही आभास

तुझ्या आणि माझ्यात
असले जरी अंतर ।
मन झाले आहे एक
असते सोबत निरंतर ।
माझा आहेस तू श्वास
हृदयाचा तूच विश्वास ।
नाही कुठला आभास
सदा असतो तुझा ध्यास ।
Sanjay R.


Sunday, July 3, 2022

मैत्री

मित्र तर मित्रच असतो
कधी का तो शत्रू होतो ।

जीवाला लावतो जीव
प्राणास तो प्राणही देतो  ।

सुख दुःखात असते साथ
संकट सारे डोक्यावर घेतो ।

मैत्रीला आहेच कुठे पर्याय
मैत्रीचा वसा अंतावरी नेतो ।
Sanjay R.


राधे राधे

कोण मित्र कोण शत्रू
ओळखणे नाही साधे ।
ओळख कशीच पटेना
येईल कोण  असे मधे ।
राहून कुठे हो चालते
एकदमच असे साधे ।
जातो टोपी देऊन कोणी
म्हणतो मग राधे राधे ।
Sanjay R.