Sunday, July 30, 2017

30.07.2017

तरुण भारत द्वारा माझ्या वाढदिवसाची अनोखी भेट ।
आजच्या तरुण भारत पुरवणीत प्रकाशीत माझी कविता । संपादकांचे खुप खुप आभार ।।
दिनांक 30.07.2017

Wednesday, July 26, 2017

" स्पंदन ह्रुदयाचे "

दुर कीती तु
परी जवळ वाटे ।
ह्रुदयाचे स्पंदन
नाही ते खोटे ।

शब्द नी शब्द तुझा
त्यात आनंद वाटे ।
आठवणींचा ठेवा
ह्रुदयात दाटे  ।

तु तीथे मी इथे
नाही अंतर छोटे ।
अंतराच्या गाभार्यात
धागा मनाचा तुटे ।
Sanjay R.

" स्पंदन ह्रुदयाचे "

दुर कीती तु
परी जवळ वाटे ।
ह्रुदयाचे स्पंदन
नाही ते खोटे ।

शब्द नी शब्द तुझा
त्यात आनंद वाटे ।
आठवणींचा ठेवा
ह्रुदयात दाटे  ।

तु तीथे मी इथे
नाही अंतर छोटे ।
अंतराच्या गाभार्यात
धागा मनाचा तुटे ।
Sanjay R.

Tuesday, July 25, 2017

" रीश्ते नाते "

कुछ रीश्तेही
कुछ ऐसे होते ।
बहोत दुर लेकीन
दिलके करीब होते ।

हर वक्त हर लम्हा
बार बार याद आते ।
ओठो पर हसी और
आखोमे आसु दे जाते ।

लाख कोशीश कर लो
भुलाये न कभी भुलते ।
तब हमभी उनकी
उन यादोमे खो जाते ।
Sanjay R.

Monday, July 24, 2017

" श्रावण सरी "

रीम झीम रीम झीम
पाउस धारा ।
खळ खळ करतो
नदी किनारा ।

सळसळ सळसळ
वहतो वारा ।
ढगांच्या आड
लपला तारा ।

थंड थोडासा
झालाय पारा ।
हिरवे रान
मखमली पिसारा ।

निसर्ग डोलतो
आनंद सारा ।
श्रावण सरींची
तर हीच तर्हा ।
Sanjay R.

Friday, July 21, 2017

" पाणीच आधार "

उलटुन चालला
सीझन रेनी ।
लागली दृष्ट
टाकली कोणी ।

कोसळतो खुप
ते संकट मोठे ।
काही भागात
दर्शन खोटे ।

पुरात होतो
सारा विनाश ।
नाही तर कुठे
निरभ्र आकाश ।

जिवनाचे तर
पाणीच आधार ।
सरेल नाही तर
साराच भार ।
Sanjay R.

" एक विचार "

दुर दुर त्या आकाशात
ग्रह तार्यांच्या पल्याड
काय असेल बरं  ।

इथेच खोल अंतरात
ह्रुदयाच्या कपाटात
मन असते का खरं ।

सतत धावतात विचार
नसतो कुठला आधार
देउन जातात प्रहार ।

मिटुन थोडे डोळे
शांत थोडं बसुन
घेइल मन आकार ।

स्वच्छ निरभ्र आकाशात
सुर्याच्या प्रकाशात
कळेल जिवनाचा सार ।

सुख दुखः सखे सोबती
जिवनाची एकच गती
उलगडलेला एक विचार ।
Sanjay R.

Wednesday, July 19, 2017

" पावसा तुला सलाम "

पावसा पावसा
नसला तु तर
सार्यांनाच फुटतो घाम ।

असाच थोडा
करत तु जा
मधे मधे मुक्काम ।

नदी नाले
भरुन थोडे
टाक घेउन आराम ।

पीक पाणी
झाडं झुडपं
फुलव निसर्ग तमाम ।

केलास ना तु
आता थोडासा मुक्काम
थांबलेत सगळे काम धाम ।

करु दे थोडी कामं
तोवर तुला
मिळेल छान आराम ।

असाच कधी मधी
जात येत रहा मग
सारेच करतील सलाम ।
Sanjay R.

" पावसा तुला सलाम "

पावसा पावसा
नसला तु तर
सार्यांनाच फुटतो घाम ।

असाच थोडा
करत तु जा
मधे मधे मुक्काम ।

नदी नाले
भरुन थोडे
टाक घेउन आराम ।

पीक पाणी
झाडं झुडपं
फुलव निसर्ग तमाम ।

केलास ना तु
आता थोडासा मुक्काम
थांबलेत सगळे काम धाम ।

करु दे थोडी कामं
तोवर तुला
मिळेल छान आराम ।

असाच कधी मधी
जात येत रहा मग
सारेच करतील सलाम ।
Sanjay R.

Monday, July 17, 2017

" निळे काळे नभ "

निळे काळे ढग
आहेत आकाशात ।
मधेच कधी ते थोडा
पाउस पाडतात ।
थकले भागले की
विश्रांती घेतात ।
चिमन्या पाखरं मग
चिव चिव करतात ।
परत घरट्याला
धुम ठोकतात ।
थोडी थोडी माती
पाण्यात भिजवतात ।
पीक पाण्याचा
प्रश्न मिटवतात ।
म्हणुनच ढगांना
न भ ही म्हणतात ।
Sanjay R.

" आनंद "

तुआणी मी
एक अनोखा बंध ।
मोगर्याला जसा
असतो सुगंध ।

सोबतीला वारा
वाहतो थोडा मंद ।
मन घेतय झोका
चहुकडे आनंद ।

विचारांचा सागर
त्यात मन बेधुंद ।
शोधतो मी मलाच
लागला एकच छंद ।
Sanjay R.


" कमळ "

मन तुझं किती
आहे सुरेख निर्मऴ
भासतो मज जसा
गुलाबी कमळ ।

अथांग सागराचा
दिसेल कसा तळ ।
पावसाला नकोत
गगनी ढग विरळ ।

गच्च दाटुन यावं
निळं काळं आभाळ।
तृप्त होइल धरा आणी
होइल सुंदर सकाळ ।
Sanjay R.

Friday, July 14, 2017

" क्यु हम अकेले "

" कैसा ये बुढापा "

आज क्यु हम अकेले है ।।
धुल मीट्टी यही पर तो खेले है ।
सीखे थे जब चलना हम
गिरते उठते फिर चलते संभले है ।
आज क्यु हम अकेले है ।।

पढ लिख कर अब पहुचे यहा
उन तमाम गुरुओके हम चेले है
लाख तुफान आये फीर भी
अबभी खुदको संभाले है ।
आज क्यु हम अकेले है ।।

ताकद हिम्मत थी जब साथ हमारे
आज वहीतो दुनिया वाले है ।
थक से गये मर से गये
जिंदगी अब हम तेरे हवाले है ।
आज क्यु हम अकेले है ।।

दिन गिनके हम जिते अब भी
कोइ बता दे फीर भी क्यु लाले है ।
खोल दे अब तु बंद दरवाजा
प्रभु हम तेरे घर वाले है ।
आज हम क्यु अकेले है ।।
Sanjay R.

" दार मरणाचे "

स्वप्नांच्या या दुनियेत
आहे स्वागत सर्वांचे ।
विचार झालेत स्वैर
राज्य इथे दुष्टांचे ।
सफर अंतराळाची करा
घर तिथे चांदण्यांचे ।
भुतलावर चालाल तर
घाव झेला माणसांचे ।
आकशी चंद्राची शितलता
धरेवरी सुर्याची प्रखरता ।
विचारांचे बांध तुटले
पुर वाहताहेत रक्तांचे ।
आसुसलेली माणसं इथं
वैरी आहेत एकमेकांचे ।
नाही उरले काळीज कुठेच
ढीग लागले प्रेतांचे ।
सुर्यावरच जाउ आता
लाकडं वाचतील दहनांचे ।
कोण कुणाचा काय लागतो
उघडे दार मरणाचे ।
आसवांना नाही थारा
शब्द गुंजतात हास्याचे ।
Sanjay R

Wednesday, July 12, 2017

" ढगांची हजेरी "

रोजच ढग येतात
लाउन हजेरी फक्त
निघुन ते जातात ।
धरा बिचारी
काय तीच्या हातात ।
जगवते तरीही सारं
ओलावा तिच्या श्वासात ।
Sanjay R.

" हे जिंदगी "

कभी हसाती
कभी रुलाती ।
ए जिंदगी तु
साथ तो निभाती ।
चाहता तुझे मै
तो तु पास होती ।
न चाहु तब भी
जीना तु सिखाती ।
जिंदगी मेरी तु
मै हु तेरा साथी ।
चल साथ चले दुर
है वक्त अभी बाकी ।
Sanjay R.

" ये ना रे पावसा "

काय रे पावसा
काय तुझ्या मनात ।
ढगं तर आहेत
बरीच गगनात ।
ये ना जरा
पडुन जा शेतात ।
वाचेल नुकसान
आनंद येयील घरात ।
येत नाहीस ना तु
सारच कसं अंधारात ।
आता तुझ्याच येण्यानं
मिटेल चिंता क्षणात ।
रुसु नकोस असा
भिजव मला पावसात ।
ये ना रे पावसा
काय तुझ्या मनात ।
Sanjay R.

Tuesday, July 11, 2017

" नजर "

निरागस हसरा
गोड तुझा चेहरा ।
सुंदर तयात भाव
दिसे छान लाजरा ।
भावली मनास माझ्या
तुझी हीच  तर् हा ।
चोरट्या नजरेनच तु
एकदा बघना जरा ।
Sanjay R.

Saturday, July 8, 2017

" मन "

नको विचारुस कोन
तु तर आहेस माझे मन ।
आठवणीत तुझ्या मी
जगतो एक एक क्षण ।
तु तर आहेस माझे मन
नी मी आहे तुझेच मन ।
Sanjay R.

" स्वप्न जगुन घ्यावे "

शब्द तुझे असे की
त्यातच रमुन जावे ।
स्वतःला ठेउन तिथे
स्वप्नात जगुन घ्यावे ।

मनातली एक एक परत
उलगडुन जेव्हा बघावी ।
हळुच मग गालात छान
थोडेसे हसुन घ्यावे ।

आठवणींचा अथांग सागर
तयात थोडे डुंबुन घ्यावे ।
आनंदाचे क्षण न क्षण
सोबत तुझ्या लुटुन घ्यावे ।
Sanjay R.

Friday, July 7, 2017

" आखे भी रो बैठे "

हम उनकी चाहत मे
खुदको ही खो बैठे ।
देखके तडप दिलकी
आखे भी रो बैठे ।

सामने जब आये वो
ना समझ पाये आखे ।
दिलतो था पागल मगर
रुकसी गयी कुछ सासे ।

अब भी ढुंडता हु मै
निशान उनके उसी जगह
रोक कर बहती हवाको
कहता लौटनेको उसी जगह ।
Sanjay R.

Wednesday, July 5, 2017

" मेरा प्यारा गुलाब "

लगता मुझे है
प्यारा गुलाब ।
कोमल फिर भी
है इसका रुबाब ।
रंग है कितने
क्या कहे जनाब ।
खिलता है काटोमे
तबभी ना है
इसका जवाब ।
भर देता है प्यार
करे जिंदगी लाजवाब ।
वाह वाह क्या गुलाब
मेरे प्यारे प्यारे गुलाब ।
Sanjay R.

Tuesday, July 4, 2017

" आषाढ वारी "

मुखी हरी नामाचा गजर
निघाली पंढरपुराला वारी ।
मनात ध्यास विठ्ठलाचा
विसरला तहान भुक सारी ।
टाळ मृदंगाच्या नादात पडे पाउल
पुढे जाया हरीच्या द्वारी ।
आज एकादशीचा दिवस
लोटला जन सागर पंढरी ।
चंद्रभागेत भिजताच पाय
संचारला मनी उत्साह भारी ।
ओढ लागली दर्शनाची
ठेउनी आला सुख दुःख घरी ।
मनी एकच आशा दर्शनाची
बाप माय तुची माझा हरी ।
भाव श्रद्धा देवा तुझ्या ठायी
टेकवतो माथा तुझ्याच पारी ।
फिटले याची देहाचे पारणे
सफल झाली जन्माची वारी ।
जय जय हरी जय जय हरी
विठ्ठल हरी विठ्ठल हरी ।
Sanjay R.