Wednesday, August 31, 2022

अश्रू डोळ्यात

आठवण येता तुझी मला
शब्द सहजच सुचतात
हृदयातल्या वेदना साऱ्या
लेखणीतून मग अवतरतात ।
दुःखाला फुटते वाचा नी
अश्रू होऊन ते बरसतात ।
थांबेना आसवांच्या धारा
सरसावतो हुंदका ओठात ।
Sanjay R.


श्रीमंत गरीब

गरिबांचा कुठला मान
सदैव सोसतो अपमान
श्रीमंतांना बघा थोडे
जिथे तिथे त्यांचीच शान
पैश्या कडे त्यांचे ध्यान ।
विनाकारणचे देतात सल्ले
न मागता सांगतात ज्ञान ।
बेतते जेव्हा संकट स्वतःवर
विसरतात मग सारे भान ।
प्रतिक्रिया असते भारी
वाटते तेव्हा बरे लहान ।
Sanjay R.


कशास बदला

सन्मान करील तो आपला
अपमानाचा कशास बदला ।
पाप पुण्य जे ज्याचे त्याचे
फळ भेटते त्याचे तदला ।

गोड बोलुनी जिंका सारे
शब्दातूनच मिळतील तारे ।
कोण आपले कोण परके
कठीण प्रसंगी कळते सारे ।

संयम हवा थोडा वाचेवरती
समुद्रालाही तर येते भरती ।
क्षणिक असतो राग सारा
शहण्यास हो पुरे इशारा ।
Sanjay R.


Tuesday, August 30, 2022

त्राही त्राही

शब्दांना तर असतो अर्थ
सांगून जातात बरंच काही ।
कानावर घेऊन सोडून देता
शब्दांना काहीच अर्थ नाही ।
हृदयाला जे स्पर्श करतात
अंतरात मग फुटते लाही ।
कधी मस्तकाचा घेताच वेध
जिकडे तिकडे त्राही त्राही ।
Sanjay R.

जय जय शिवराय

स्वराज्यासाठी कितीकांनी
दिले प्राणाचे बलिदान ।
देऊनिया प्राण आपुले
झालेत किती महान ।
मराठ्यांचा इतिहास हा
महाराष्ट्राची शान ।
जय जय शिवराया
तुम्हास आमचा प्रणाम ।
Sanjay R.


प्रेमाला कुठे अंत

प्रेमाला कुठे अंत
वाहतं पाणी
आणि तेही संथ ।

नाही वयाचे बंधन
म्हातारं झालं जरी
हृदयात होते स्पंदन ।

नाती गोतीही सरतात
प्रेमापुढे विचारही
का कसे ते हरतात ।

प्रेमात कुठला स्वार्थ
पण असतो नक्कीच
जीवनाला तिथे अर्थ ।

प्रेम म्हणजे भक्ती
अति प्रचंड अशी ती
असते एक शक्ती ।

म्हणे प्रेमात तो पागल
कळेना कुणासच
अंतापर्यत तो जागल ।

प्रेम कराल तर कळेल
कुणासाठी माझंही हो
मन तितकंच जळेल ।
Sanjay R.


हास्य आनंद

रंग कसा या जीवनाचा
गन्ध त्यात भावनांचा ।

क्रोधाला नाही माया
सोबत असते सदा छाया ।

शब्दातून शब्द येतात
घायाळ मन करून जातात ।

चेहऱ्यावरती भाव कसे
राग क्षणात उठून दिसे ।

रूप नको ते तसे मजला
हास्य हवे ते देईल तुजला ।

हृदयावरती बंधन कुठले
होऊन आनंद सारे सुटले ।
Sanjay R.


नकोच हा दुरावा

नकोच हा दुरावा
असेल तू दूर जरी ।
नेहमीच वाटे मनाला
नकळत येतील सरी ।
क्षणोक्षणी होतात भास
कथा ती असेल खरी ।
रंभा किव्वा उर्वशी
इंद्राघरची ती तूच परी ।
Sanjay R


विसावा

करतो देवाचा धावा
करू नको दुरावा ।
आलो शरण तुजला
हवा कशाला पुरावा ।
तूच आहेस तारक
हात कृपेचा असावा ।
चरणी तुझ्याच आलो
दे मज तूच विसावा ।
Sanjay R.


माया

मनात जरी असेल
आपलेपणाचा ओलावा ।
पण स्वार्थ येतो आडवा
आणि वाढतो दुरावा ।

उरलीच कुठे माणुसकी
फालतुचेच होतात दावे ।
वेळ आली की कळते
गुणगान कुणाचे गावे ।

शब्दा शब्दात अंतर किती
कुठे काळोखाची काया ।
कधी सहजच जाणवते
शब्दातून किती माया ।
Sanjay R.


नको होऊस तू परदेशी

होऊ नको तू परदेशी
बघ तुझी रे आई कशी ।

वाट तुझी पाहते सारखी
आठवणीत ती होते दुःखी ।

काळजी सदा तुझीच तिला
आठवण कारे येत नाही तुला ।

गरज तुझीच रे म्हातारपणी
तुजविन सांग बघेल का कोणी ।

लाड तुझे रे का केलेत कमी
नको देउ आता डोळ्यांना नमी ।
Sanjay R.


आई

आई विना तर जग पोरके
असेल का कोणी आई सारखे

माया ममता प्रेमाचे ती प्रतीक
संस्कारांची तीच तर देते सिख ।

आई तूच हवी मज आयुष्यभर
नाही येणार कुणालाच ती सर ।
Sanjay R.


और जी लेंगे हम

मौत को ऐक दिन
आनाही है
ना, हम भाग सकते
ना वह....
इंतजार तो दोनोको है
चलो तब तक जी लेते है.....
थोडा हसके....
थोडा गमके.....

जलदी तो तब भी न थी
ना अब है...
कुछ और वक्त मिल जाये तो...
और जी लेंगे...
बाकी जो भी रहा...
सब कर लेंगे.....
Sanjay R.


मान सन्मान

कुठे कुणाचा मान
होतो कुठे सन्मान ।

मोठेपणाचा आव
मारतोय फक्त शान ।

विचार सारे सरले
सारेच विसरलो भान ।

पुस्तकांचे चाले पठण
नाही संस्कारांचे ज्ञान ।

असा कसा टिकेल हो
सांगा तुमचा स्वाभिमान ।

मोठेपणा विसरा थोडा
होऊन जरासे लहान ।

मिळेल ते हवे सारेच
झळकेल उंच निशान ।
Sanjay R.


भोगतो मी मरण

पोटासाठी काय चाले
कशाला हवे हो कारण ।
दिवस रात्र उपसतो कष्ट
भुकेचे केव्हाच झाले हरण ।
रक्ताचे आता झाले पाणी
बघा गोळा करतो सरण ।
मान अपमान केव्हाच गेला
डोळ्यात बघा फुटले धरण ।
काठीचाही आधार नाही
थरथर कापतात हे चरण ।
चल यमा आता घेऊन चल
रोजच तर भोगतो मरण ।
Sanjay R.

Wednesday, August 24, 2022

शुभेच्छा

देतो आज मी तुज शुभेच्छा
होऊ दे पूर्ण साऱ्या आकांक्षा ।
असतील नसतील त्या इच्छा
नसेल कधी कशाची प्रतीक्षा ।
शत शत आयुष्य तुज लाभू दे
नांदो सदा आनंद ही सदिच्छा ।
Sanjay R.


डिटेक्टिव्ह

प्रकरण होते गंभीर
सगळेच त्यात ऍक्टिव्ह ।
जो तो दाखवतो कसब
म्हणतो मी डिटेक्टिव्ह ।
Sanjay R.


विरोध विकृतीचा

साहित्याची तर लागेल वाट
विकृतांनी हो रचला घाट ।
बरा नाही हा असला थाट
वाचक हो तुम्ही दाखवा पाठ ।
तोडा आता ही अश्लील गाठ
नका होऊ तुम्ही ही माठ  ।
विरोधात व्हा एकदम ताठ
शिकवा आता तुम्हीच पाठ ।
Sanjay R.



फुलू दे कळी

अंगणात फुलू दे कळी
गालावर तुझ्याही खळी ।
बघून डोळ्यातले भाव
हृदय जाते माझे बळी ।
अशीच तू हसत राहा
मग दूर ते दुःख पळी ।
Sanjay R.


नकोच हा दुरावा

नकोच हा दुरावा
असेल तू दूर जरी ।
नेहमीच वाटे मनाला
नकळत येतील सरी ।
क्षणोक्षणी होतात भास
कथा ती असेल खरी ।
रंभा किव्वा उर्वशी
इंद्राघरची ती तूच परी ।
Sanjay R


Tuesday, August 23, 2022

हास्य आनंद

रंग कसा या जीवनाचा
गन्ध त्यात भावनांचा ।

क्रोधाला नाही माया
सोबत असते सदा छाया ।

शब्दातून शब्द येतात
घायाळ मन करून जातात ।

चेहऱ्यावरती भाव कसे
राग क्षणात उठून दिसे ।

रूप नको ते तसे मजला
हास्य हवे ते देईल तुजला ।

हृदयावरती बंधन कुठले
होऊन आनंद सारे सुटले ।
Sanjay R.


प्रेमाला कुठे अंत

प्रेमाला कुठे अंत
वाहतं पाणी 
आणि तेही संथ ।

नाही वयाचे बंधन
म्हातारं झालं जरी
हृदयात होते स्पंदन ।

नाती गोतीही सरतात
प्रेमापुढे विचारही
का कसे ते हरतात ।

प्रेमात कुठला स्वार्थ
पण असतो नक्कीच
जीवनाला तिथे अर्थ ।

प्रेम म्हणजे भक्ती
अति प्रचंड अशी ती
असते एक शक्ती ।

म्हणे प्रेमात तो पागल
कळेना कुणासच
अंतापर्यत तो जागल ।

प्रेम कराल तर कळेल
कुणासाठी माझंही हो
मन तितकंच जळेल ।
Sanjay R.



Sunday, August 21, 2022

शुक्राची चांदणी

रातराणी ती कोण
करते कशी चमचम ।
दडली का ढगाआड
बरसतो पाऊस झमझम ।
शुक्राची ती चांदणी
लोपला तिचा दम ।
चंद्रही हिरमुसला
डोळे त्याचे नम ।
Sanjay R.


रातराणी

दरवळतो सुगन्ध
बहरते रात राणी ।
धुंद होते रात्र
गाली हसते चांदणी ।
चन्द्र देतो पहारा
रजनी गाते गाणी ।
सकाळ होता ऐकायची
सूर्याची कहाणी ।
Sanjay R.


Saturday, August 20, 2022

कथा

जीवनात नाही मजा
वाटते भोगतो मी सजा ।
कळेना करू मी काय
नेहमीच वाजतो बाजा ।
सुचतच नाही काही
डोक्यात चमकतात विजा ।
हसतो मीच मला आणि
लुटतात इतराच मजा ।
आत्म कथा विदूषकाची
काय काय करू वजा ।
Sanjay R.


गपाड्या

गपाड्याना हव्या गोष्टी
चूप त्यांना बसवत नाही ।
सारखी असते टकळी सुरू
शेंडा ना बुड विषय असो काही ।
स्वतःच बोलून हसतात मग
कोणी हसो किव्वा नाही ।
Sanjay R.


Friday, August 19, 2022

नटखट मुरारी

निघाल्या गोपिका
यमुनेच्या तीरी ।
शोधती साऱ्या
कुठे तो श्री हरी ।
बाळ तो गोपाळ
बसून झाडावरी ।
बघतो तिथून
कसा भिरीभिरी ।
झाली राधा उदास
कन्हा येईना तरी ।
हळूच उठले सूर
वाजली बासरी ।
राधा शोधते मुरली
झाला आनंद भारी ।
दिसेना कन्हैय्या
शोधे दिशा चारी ।
झाडावर गवसला
नटखट मुरारी ।
Sanjay R.

डोक्यातला गोंधळ

डोक्यात विचारांचा गोंधळ ।
लिहायला घेताच
शब्दांची होते पळापळ ।
कशाला कशाचा नसतो ताळमेळ ।
वाटतं मग याहून तर बरी भेळ ।
साराच चालतो खेळ ।
लिहायला लागतो पण वेळ ।
शेवटी अवतरते जेव्हा लिखाण
मनाशी मनाचा होतो मेळ ।
कधी आसवांचा दिसतो छळ ।
कधी आनंद देते बळ ।
आणि होते अंतरात खळखळ ।
Sanjay R.



जीवनाचा अर्थ

कळेल जेव्हा जीवनाचा अर्थ
होईल तेव्हाच जीवन सार्थ ।

हवेत विचार सर्वस्वी निस्वार्थ
थोडा तर हवाच हो परमार्थ ।

अंधश्रद्धेला तर नाहीच अर्थ
पिउच नका हो तसले तीर्थ  ।
Sanjay R.

Thursday, August 18, 2022

कर्तव्याची दिली याद

अर्जुन झाला दुःखी
युद्धभूमीवर होता नाद ।
कृष्ण सारथी पार्थाचा
ऐकेना कुणाची साद ।
अर्जुनास सांगुन गीता
कर्तव्याची दिली याद ।
झाले मग महायुद्ध
शंभर कौरव झाले बाद ।
झाला अन्यायाचा पराजय
सत्याची विजयी दाद ।
Sanjay R.


हसा आणि हसू द्या

नको विसरू रे माणसा
तुझीच तू रे कर्तव्य ।
नियम जरी नसतील काही
पाळायचे तुला तुझे कर्तव्य ।

जन्मदाते आई बाप तुझे
सांभाळायचे त्यांचे म्हातारपण  ।
भाऊ बहीण बायको मुलं
त्यांनाही द्यायचा आधार तुला ।

समाजाचे नियम काही
पालन तुज त्यांचे करायचे ।
हसा आणि हुसू द्या
सोबत सोबत जगायचे ।
Sanjay R.

Wednesday, August 17, 2022

झोपडीतला संसार

झोपडीतला एक संसार
भिंती नाही तरटाचा आधार ।
डोक्यावर नाही छत
सोसवेना स्वतःचाच भार ।
काय दिवस काय रात्र
कष्टाचा सतत चाले मार ।
दिव्यात नाही तेल
झोपडीत फक्त अंधार ।
अर्धपोटी झोप कुठे
परत येतो उद्याचा विचार ।
Sanjay R.


नटू दे अंगण

गेला वाटतं पाऊस
नारायणाने दिले दर्शन ।
आकाश झाले स्वच्छ
सूर्यप्रकाश केला अर्पण ।

पाखरांची झाली किलबिल
धरेचा फुलला कणकण ।
थांब थांब पावसा आता
नटू दे धरेचे अंगण ।
Sanjay R.

Tuesday, August 16, 2022

भरोसा

हक्क माझा हक्क तुझा
नाही इथे कुणाचा ।
मग सरेल जेव्हा हक्क
सांगा कोण कुणाचा ।
वाटे तसे चाले सारे
सारा खेळ मनाचा ।
संगनमताने न चाले काही
भरोसा कुठे क्षणाचा ।
Sanjay R.

हक्काची लढाई

लढू चला आता
आपल्या हक्काची लढाई ।
दुर्बलांवर नको मात्र
स्वतः साठी चढाई ।
दुसऱ्यांचे हक्क मारून
बरेच मारतात बढाई ।
किंमत मोजावी लागते
कराल ज्याची मढाई ।
Sanjay R.

हक्क स्वातंत्र्याचा

जन्मतः मिळाला आम्हा
हक्क या स्वातंत्र्याचा ।
पारतंत्र्य असते काय
संबंध कुठे कशाचा ।
विचारांना आहे वाव
सांभाळ होतो मनाचा ।
अस्तित्वाचे भान कुठे
विचार फक्त जीवनाचा ।
Sanjay R.


Monday, August 15, 2022

नशीब

नसेल नशिबात तर
कुठे काय उरते ।
नियतीचा खेळ सारा
सारे आपोआप सरते ।
Sanjay R.


ग्रंथ

नियतीची चाल संथ
ठरलाच असतो अंत ।
सुख दुःख भोग सारे
आयुष्याचा होतो ग्रंथ ।
Sanjay R.


भारत देश माझा

भारत देश हा माझा
तिरंगा आमचे निशाण ।
मातृ भूमी ही माझी
वाटे मज अभिमान

जन गण मन हे
आमचे राष्ट्र गाण ।
मिरवतो गगनात
तिरंगा आमची शान ।

ज्ञान विज्ञान आमुचे
त्यात आमची शान ।
विश्व शांतीचा संदेश
करी आम्हास महान ।

देश निसर्गाने नटलेला
त्यात आमची शान ।
राम कृष्ण बुद्ध इथले
आहे किती महान ।

समृद्ध सम्पन्न किती
नाही कशाची वाण ।
खनिज सम्पदा किती
आहेत इथे खाण ।

स्वातंत्र्याचे वीर किती
दिले त्यांनी बलिदान ।
भरत भूच्या रक्षेसाठी
अर्पण अमचेही प्राण ।
Sanjay R.


माझा देश माझा तिरंगा

माझा देश
माझा अभिमान ।
घरोघरी तिरंगा
तोच त्याचा सम्मान ।
रंग तीन त्याचे
किती त्याची शान ।
प्रेरणा स्रोत आमचा
आम्हासाठी महान ।
तिरंगा आमची आहे
आन बान शान ।
Sanjay R.


Sunday, August 14, 2022

खळखळ

पानांची सळसळ
नदीत खळखळ ।
हळूच होते
कशी ही हळहळ ।
सोसतो मी कळ
उसने बळ ।
का कूणास ठाऊक
लागली झळ ।
वाटते मज
सगळेच अटळ ।
होते मळमळ
किती हा छळ ।
Sanjay R.


मनाचा छळ

कशास म्हणू मी खेळ
सांगून येते कुठे वेळ ।
नियतीस जे मान्य
घडतो तसाच मेळ ।

चालेना कुणाचे काही
होतो मनाचा छळ ।
घडते तेच सार
असते ते अटळ ।
Sanjay R.


नियतीचा खेळ

नियती ठरवते सारे
मनाचे कुठे चालते ।
कितीही ठरवा तुम्ही
व्हायचे तेच होते ।

म्हणतो मी मी कोणी
काय त्याचे उरते ।
सोडून जातो सारे
मित्व जेव्हा सरते ।

खेळ नियतीचा सारा
वेळ अचानक येते ।
असेल नसेल सारे
प्रवाहात घेऊन जाते ।
Sanjay R.


Saturday, August 13, 2022

वाजतात बारा

होते किती चिडचिड
आली नाही ती तर ।
डोंगर कष्टाचा समोर
आठवते माहेर सासर ।

चंदा आसो वा मंदा
आवरते पसारा सारा ।
नाही आली तर मात्र
म्याडमचा भडकतो पारा ।

घरात सारे असतात चूप
कळतो साऱ्यांना इशारा ।
कामवाली नसली तर
घरात वाजतात बारा ।
Sanjay R.


जाग माणसा जाग

संघर्षाची वात पेटली
विझेल कशी ही आग ।
नको विसरू माणुसकी
जाग माणसा तू जाग ।

रक्ताची रे चटक तुझी ही
किती तुझा हा राग ।
डोळ्यातले ते अश्रू बघ
जरा माणसासारखा वाग ।

नाती गोती का विसरला
झालास विषारी नाग ।
भोगशील सारे तुही कधीरे
जाग जरासा जाग ।
Sanjay R.


जुने ते सोने

जुने जाऊन नेहमी
मिरवत नवे येते ।
टिकत नाही नवे
परत जुनेच येते ।

म्हणतात ना
नव्याचे नऊ दिवस ।
आणि जुन्यालाच
घालायचा नवस ।

जुने ते सोने
कोणी काही म्हणे ।
यायचेच आहे तिला
ती परत येतेय ।
Sanjay R.


ये रे ये तू परत

थकले रे डोळे आता
ये ना रे तू परत ।
त्राण न उरले आता
दिवस आले भरत ।

पैसा पैसा करशील किती
आई बाबा आहेत झुरत ।
तुझ्याविना जगतील कसे
म्हातारपणही आलं सरत ।

तुझ्याविना कुणाचा आधार
तुला करे नाही कळत ।
नजर तुझ्याच रे वाटेवर
श्वासही नाही ढळत ।

नाळ इतकी घट्ट किती
अशीच नाही रे तुटत ।
ये रे ये तू परत आता
प्राणही आता नाही सुटत ।
Sanjay R.


Friday, August 12, 2022

श्रद्धा

नको पैज नको कुठली स्पर्धा
काळजीने हो जीव होतो अर्धा ।
मेहनतीचेच तर हवे मज सारे
आहे माझी देवा तुझ्यावर श्रद्धा ।
Sanjay R.

रक्षा बंधन

एक धागा प्रेमाचा
माया ममता नात्याचा
वचन त्यात आहे रक्षेचे
बंधन आहे रक्षाबंधनचे
Sanjay R.


बहिणीची माया

मिळते भावाला
बहिणीची माया ।
असते बहिणीला
भावाची छाया ।
Sanjay R.