Friday, January 28, 2022

नाते

नाते फक्त नसते ओळख
त्याहून असतो बरा काळोख ।

व्यवहार जसा असावा चोख
नात्यात तसेच नसावे टोक ।

राखून बोलणारे असतात फेक
नात्यात नेहमीच असावे नेक ।

मन किती अस्थिर घेते ते झोका 
नात्यात कशास देता हो धोका ।

जुजबी ओळख उलथून फेका 
नात्यात घ्यावा अंतरातून ठेका ।
Sanjay R.

Thursday, January 27, 2022

लुकलुकता एक तारा

बघतो आकाशात
लुकलुकता एक तारा ।
गालातच हसतो
वाटते करतो इशारा ।

हळूच अंगाशी
खेळे सळाळता वारा ।
झुलतो पदर कसा
छेडतो मनाच्या तारा ।

होई आभास जणू
झुळझुळ वाहे झरा ।
सरसर येतात सरी
चिंब भिजते धरा ।
Sanjay R.

Sunday, January 23, 2022

दीप

जलते है #दीप लाखो यहा
फिरभी अंधेरा, रोशनी कहा ।
आओ मिलके #दीप एक जलाये
रोशन हो भारत, हम चाहे वहा ।
Sanjay R.

Saturday, January 22, 2022

माझे प्रकाशित साहित्य

माझे प्रकाशित साहित्य :
 (शॉपीजन प्रकाशन )

मनातली व्यथा स्वप्नातली गाथा - काव्य संग्रह
सांग... कोण मी कोण तू - काव्य संग्रह
चंद्रा - कथा संग्रह

नाचे मोर मनात -  ई - काव्य संग्रह
राणी - ई - कथा संग्रह 
काहीच कळेना - ई - काव्य संग्रह
दूर किती किनारा - ई - काव्य संग्रह
आसवांची कहाणी - ई - काव्य संग्रह

Thursday, January 20, 2022

प्यार

माँ कैसे भूल जाऊ
मेरे लिये तेरा प्यार ।

मै तो हु बहेता पानी
और तू नदी की धार ।

सुके ना कभी
ना रुके तू कभी ।

बस सोचती हो लगे
नैय्या मेरी पार ।

माँ कैसे भूल जाऊ
मेरे लिये तेरा प्यार ।
Sanjay R.


Wednesday, January 19, 2022

मनातली व्यथा आणी स्वप्नातली गाथा

https://shopizen.app.link/9uH5GqnzWmb


*माझा काव्य संग्रह शॉपिज़न. इन वर हार्डकव्हर रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. आपण शॉपिज़न एप किंवा वेबसाइटवर वरून ऑर्डर करू शकता*

शॉपिज़न एप डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.shopizen

शॉपिज़न वेबसाइट
 www.shopizen.in

नजर

नजरसे मिली जब नजर
नजरभी समझ न पाई ।
अब मिल गई नजर तो
है नजर कुछ शरमाई ।
Sanjay R.

Wednesday, January 12, 2022

करणार किती छळ

सांग करणार किती छळ
मिळेल त्यातून मज बळ ।
विसरलो मी दुःख सारेच
करू मी कशास  हळहळ ।
झाले मनही आता खंबीर
नाही पडणार कुठे वळ ।
बघणार नाही वळून मागे
विचार आहेत आता अढळ ।
Sanjay R.


भविष्य

भविष्यात घडेल काय
आयुष्यात जडेल काय ।
शोधतो हातावरच्या रेषा
त्यावर आहे लिहिले काय ।
जन्माला आलो मी जसा
सांग कसे मानू आभार माय ।
कर्तृत्व करण्या आहेत हात
यश तिथे जिथे पडतील पाय ।
Sanjay R.

Saturday, January 8, 2022

माणूस

माणसाच्यानात काय
ओळखणे महाकठीण ।
कधी जळता निखारा
होती कधी तो लिन ।
कळेना केव्हा करेल काय
विचारानेच येतो शीण ।
वाटे कधी  जुनाट  किती
कधी वाटे तोच तर नवीन ।
Sanjay R.

Thursday, January 6, 2022

उपेक्षा

ओझे उपेक्षांचे पाठीवर
करतात घाव मनावर ।
अंतरात या जखमा किती
ओघळती आसवे गालावर ।
एकटाच मी भोगतो सारे
मिळेना उपाय जगण्यावर ।
बघतात का  दुरूनच सारे
टाकतो नेऊन हसण्यावर ।
दुःखाला असे कोण सोबती
मग होतो सुखाचा वाटेकरी ।
Sanjay R.


दिसते कुठे काही

बोलू नकोस काही
मज अपेक्षाही नाही ।
अक्षरात शोधतो मी
दिसते कुठे काही ।

भाव तोच मनात
डोळे वाट पाही ।
मन झाले अधीर
शोधतो दिशा दाही ।

पुरे एक इशारा
त्यातच सर्व काही ।
करू नकोस वेळ
अंतराची होते लाही ।
Sanjay R.


वाहरे वा कोरोना

वाह रे वा कोरोना
तू आलास का परत ।
करमत नसेल ना तुला
माणसं का नाही मरत ।

कितिकांना घेऊन गेलास
पाणी डोळ्यात तू भरत ।
तरी दोन वेळा घेतली लस
पण कारे तूच नाही मरत ।

आप्त गेले पैसा गेला
अजूनही आहेत ते रडत ।
जगण्यासाठी बघ कसे ते
आहोत रे आम्ही लढत ।

मास्क लावला हातही धुतले
स्यानिटायझर आहोत मळत ।
कोणी म्हटलं येतो घरी तर
नको येऊस उत्तर देतो पळत ।

शाळा बुडली नोकरी गेली
संसार किती आहेत जळत ।
सोडणारे भाऊ पाठ आता
हे तुलाच कारे नाही कळत ।

सरकारचे तर नियम भारी
तरीही सारेच आहेत पाळत ।
चिंता लागली साऱ्यांनाच
असतो एकमेकास टाळत ।

देऊ नकोस रे दुःख आता
बसणार किती तू छळत ।
मनात या भीती किती
विचारही नाहीत ढळत ।
Sanjay R.


Wednesday, January 5, 2022

श्रद्धांजली

गंगा तू गं यमुनाही तू
सिंधू तूच सरस्वती ।

आई तू आणी माई तू
मायेचा तू सागर होती ।

कोण कुठले अनाथ सारे
साऱ्यांशी तू जोडली नाती ।

करून पोरके गेलीस तू
आठवणी उरल्या आता हाती ।

Sanjay R.


Tuesday, January 4, 2022

नवी सुरुवात

नव्या कल्पना नवी सुरुवात
वाटे जणू झाली प्रभात ।
मनासारखे घडते जेव्हा
पटापट चाले कसा हात ।
कुठे काही न पडे कमी
उत्साह असे भरभरून मनात ।
Sanjay R.


शुभेच्छा

नववर्षाचा दिवस उजाडला
झाली आनंदाची बरसात ।
नाते करू या दृढ आता
मित्रांपासून करू सुरुवात ।
काळजी घेऊन आरोग्याची
करू दुःखावरती मात ।
क्षणोक्षणी या जीवनात
आपल्यांचीच मिळेल साथ ।
Sanjay R.


नववर्षाचा संकल्प

करू काय मी संकल्प
नाही आयुष्याचा भरोसा ।
जाणार आता जुने वर्ष
नवीन वर्षात नवीन वसा ।
मागचे वर्ष ठेऊन गेले
न मिटणारा आपला ठसा ।
कोरोनाने केले विस्कळीत
चिंतेचा तो दिवस कसा ।
होईल आता सुरळीत सारे
छानच होईल आनंदी असा ।
Sanjay R.


झाले गेले सोडू कसे

झाले गेले मी सोडू कसे
आठवणींना काढू कसे ।
डोळ्यात आसवांचा पूर
रुकेचना मी थांबवू कसे ।
मन माझे हे अधीर किती
आघात किती सोसू कसे ।
तुझ्या शब्दांचा हवा सहारा
तुझ्याविना मी राहू कसे ।
Sanjay R.


आसवांची कहाणी

आसवांची  कहाणी
गाते दुःखाची गाणी ।
मुखावर दिसे हास्य
कळते कुणास वाणी ।
मुकाट्यानेच भोगतो 
ऐकतो कोण गाऱ्हाणी ।
हृदयावर होतात घाव
अंतरात त्याची निशाणी ।
विचारांची होते राख
मनास कोण जाणी ।
नशिबाचे भोग सारे 
येते डोळ्यात पाणी ।
Sanjay R.

Saturday, January 1, 2022

वाट पाहे राधा

वाट पाहे राधा
वृन्दावनात ।
आहे कुठे कृष्ण
बघा द्वारकेत ।

करी राधा ध्यास
मन मोहनात ।
दिसेना कन्हा कुठे
डोळ्यात बरसात ।

नटली किती राधा
सख्यासाठी खास ।
सख्यविना कशी
होईल रास ।

डोळ्यात आस
सदा होतो भास ।
येनारे तू कान्हा
थांबतील श्वास ।
Sanjay R.