Tuesday, September 30, 2014

" गुलाब काटा "


भाव कठोरतेचा
दाखवी काटा ।
सुंदर कोमळ
गुलाबी छटा ।
मोहक गंध
फुलांचा वाटा ।
प्रफुल्लीत मन
आनंदाच्या लाटा
Sanjay R.

सुर्य किरणांनी नटली धरा
विसावली रात्र हलताहेत माणसं
जरा जरा ।
Sanjay R.

" स्वच्छ भारत "

स्वच्छ भारताचे
स्वप्न होते गांधींचे ।
पुर्ण करु या मिळुन सारे
उद्दीष्ट आमच्या प्रधानाचे ।
निघेल कचरा घाण सारी
निरोगी जिवन जगु आनंदाचे ।
आम्ही सुधरु देश सुधारेल
सुख सौभाग्य बघु देशाचे ।
महान माझा देश हा भारत
जगात उंचाउ नाव ईंडीयाचे ।
Sanjay R.

Monday, September 29, 2014

" शोध "

मंत्र तंत्र सीद्धीयानी
सर्वस्वे मी गमावीलो ।
घेउनी यंत्र हाती
सुखीये हा जाहलो ।
तन मन धन तयाची
लुप्ती या नेत्री पाहीलो ।
होउनी कफल्लक आता
दारोदार भ्रमणी निघालो ।
इती यंत्र स्तुती स्तोत्र संपुर्णम ।
Sanjay R.

ठेउनी भान वेळेचे
जिवन आनंदात जगायचे।
आलाही म्रुत्युही सामोरा
खळखळुन त्यासी हसवायचे ।
अनमोल हे जिवन असे
ठरवायचे आपणच
कसे हे जगायचे ।
Sanjay R.

शोधतो आम्ही त्यास
सार् या  जगात ।
वसतो तो चराचरात ।
अज्ञानी पामर आम्ही ।
विसरतो शोधायचे अंतरात ।
ज्ञान स्वत्वाचे येता
होइल दर्शन क्षणात ।
Sanjay R.

Sunday, September 28, 2014

" चला मंगळावर जाउ "

मंजील हो अगर एक
और हो रास्ते अनेक
ना हो मुसाफीर नेक
फिरभी देखो जरा
नही हम अकेले एक
Sanjay R.

नही खोनेको
कुछ पास मेरे ।
बस ले रहा हु
जिंदगी के फेरे ।
खो गये कही 
अब सपने  सारे ।
गिनता हु दिनमे
यादोके सितारे ।
Sanjay R.

मंगळावर करायचा
एक प्लाॅट बुक आता ।
टु बी एच के च बांधायचे
स्वप्न पाहाता ।
Sanjay R.

Sunday, September 21, 2014

" मंथन "

आसमंत सारा फिरुन आलो
प्रदक्षीणाही धरतीला झाल्या ।

पालथे केले सारे जलसागर
नाही उरल्या दर् या खोर् या ।

निराकार तु वसतो जिथे
शोधले तुज मनात माझ्या ।

मंथन करुनी आतम्याचे
लाभले दर्शन तुझेची राजा ।
Sanjay R.

किती चमत्कारी ही दुनीयी
देवा तुझीच रे ही किमया ।
परल्यात इथ अनेक छाया
माणसाच्या विवीध काया ।
सुर्य चंद्र धरती असे पाया
म्रुत्यु येयी जिवन जगाया ।
Sanjay R.

लहान असतांना
मोठे होण्याचे
स्वप्न बघायचे ।
झालो मोठे आता
खुप होते करायचे ।
आज मात्र जिवनात
ठरवलेले सारे
संदर्भच बदलले ।
नाही उरली दिशा
झाली अशी दशा
सारे आता विसरायचे ।
Sanjay R.

"काय सांगाव आता "

काय सांगाव आता
सुचतच नाही काही ।
पुढ्यात आलेल मज
दिसतच नाही काही ।
थांबायच म्हटल तरी
चक्रही थांबत नाही ।
थांग मनाचा आता
मलाच लागत नाही ।
Sanjay R.

गंध फुलांचा
मनाला मोहवीतो ।
कधी रंगही फुलांचा
वेड लाउन जातो ।
Sanjay R.

" खळी "

रुप तुझे असे खुलले
खऴी वेडावते मला ।
काळेभोर केश तुझे
गुंतविती तुझ्यात मला ।
Sanjay R.

फिरवायची मज चार बोटे
काळ्या दाट तुझ्या केसांतुन ।
खुलवायची गाली खऴी
लोचनांना हलकेच टिपुन ।
Sanjay R.

Monday, September 15, 2014

" मज घडेल काशी "

हास्य वदन घेउनी
नभात अवतरला रवी ।
प्रकाशीत झाली धरा
झळकली आनंदाची छवी ।
Sanjay R.

नको रे देवा
वेळ येउ देउ अशी ।
बापाला बाप म्हणायची
त्यांना का लाज येते अशी ।

लहानाचे केले मोठे
पुरवलेत लाड राहुन उपाशी ।
आयुष्य घातले खर्ची
रात्र रात्र काढल्या उशाषी ।

जडवला घडवला हिरा बनवुन
सम्मानीत केला नावानीशी ।
आई बापच विसरला रे
कसे आता सांगायचे कुणापाशी ।

नाही हव्यास मज पैशा पाण्याचा
तरीही आहे मी उपाशी ।
शब्द दोन प्रेमाचे दे
नाही कुठले रुण घडेल काशी ।
Sanjay R.

देवा खरच तुझी
किमया न्यारी ।
पहीले तर बळिराजाची
वाया घालवलीस तयारी ।
आता केलीस रे
धरा जलमय सारी ।
प्राणही काढुन नेलेस
का सारेच होते अनाचारी ।
देवा तुझी किमयाच न्यारी ।।
Sanjay R.




Sunday, September 7, 2014

" आनंदाचे क्षण "

आनंदाचे क्षण
घालवायचे कशाला ।
दुक्खाःचे क्षण
बोलवायचे कशाला ।
खळखळीत हास्य
दडवायचे कशाला ।
डोळ्यात अश्रु
घडवायचे कशाला ।
जिवन अनमोल
दवडायचे कशाला ।
Sanjay R.

" चिव चिव चीऊ "

मोहब्बत जुदाइ का
ही एक नाम है ।
बस अब खुदासे
मोहब्बत का अरमान है ।
दुर रहो दिवानगीसे
यही उसका फरमान है ।
जिओ जिंदगी मोहब्बतसे
यही जिवन ज्ञान है ।
Sanjay R.

चिव चिव चिउ
काव काव काउ ।

येना रे भाऊ
गित एक गाऊ ।

म्हणे बाळुची आई
चित्रच पाहु ।

झाडंही नाहीत
कुठे मी राहु ।

घनदाट जंगल
चला आता लाऊ ।

तिथेच जाउन
गोड गित गाऊ ।
Sanjay R.

Saturday, September 6, 2014

" वेड्या मनाची काय ही कथा "

ख्वाब हो अगर दिलमे ।
सब कूच दिल को भाता है ।
सोचो जो भी आप ।
सामने बस आ जाता है ।
Sanjay R.


मिळता दाद कवितेला
मुठभर मास चढते आम्हा ।
लिहून परत एकदा
ऐकवतो बघा तुम्हा ।
Sanjay R.


वेड्या मनाची काय ही कथा ।
जिथे जिथे जाईल
तिथे आपलीच व्यथा ।
कधी बघत बसेल वाटा ।
‘तर कधी पिटत बसेल माथा ।
काय मनात त्याच्या कुणास ठाव ।
लिहायची म्हटल तर होईल गाथा ।
Sanjay R.

गालावर तूझ्या
काळ्या केसांची बट ।
घायाळ करी मज
नजरेचा कट ।
Sanjay R.

Thursday, September 4, 2014

" देवा सुखाचे बाळकडु दे "

देवा काय मागायच तुला ।
तुझ्या पुढ हात फक्त जोडु दे ।।
प्रत्येकाच्या मनात
असेल नसेल जर काही ।
देवा तु तसेच सारे घडु दे ।।
पायाशी तुझ्या मागेल कोणी ।
कळसा कडे त्यासी वर चढु दे ।।
नको मजसी काहीच ।
सगळ्यांना सुखाचे बाळकडु दे ।।
Sanjay R.

" हातात हात "

होती तुझी साथ
हातात होता हात
नव्हते जे मनात
घडले सारे क्षणात ।
Sanjay R.

चांदण्या रात्री
बघते चांदणी वाट ।
हळुच डोकावतो चंद्र
घेउनी पौर्णिमेचे ताट ।
Sanjay R.


" मोरया "

मंगल मुर्ती मोरया ।
गजानना लंबोदरा ।
विनायका सिद्धेश्वरा ।
तुम्हीच आता क्रुपा करा ।
दुराचारी बहु आनंदी 
व्यथीत झाली  ही धरा ।
सिंचीती कष्टकरी घाम
दुखः तयांची तुमहीच हरा ।
Sanjay R.

दुआ हम भी मांगेंगे भगवानसे
भर दे दामन आपका खुशीयोसे
हसरते पुरी हो आपकी शानसे
हो सकेतो मिला दे अपनी जानसे ।
Sanjay R.


Tuesday, September 2, 2014

" निशास्वप्न "

तस्वीर तुझी बघुन
मनाला मी समजवतो ।
तुच स्वप्नपरी माझी
निशास्वप्न मी सजवतो ।
Sanjay R.

प्रत्येक अदा तुझी
खुणावते मनाला माझ्या ।
बेधुंद मन होत
स्थिरावत विचारांत तुझ्या ।
Sanjay R.