Sunday, April 28, 2019

" धागा "

एक धागा आयुष्याचा
बांधलंय तुला मला
फार थोडे हे आयुष्य
घेऊ उंच एक झुला ।
Sanjay R.

Saturday, April 27, 2019

" अनमोल एक मोती "

तु अनमोल एक मोती
मोल मलाच ठाव किती ।
जुळला बंध मनाचा
झाली आपुली प्रीती ।
साथ तुझी मज आता
दे हात तुझा या हाती ।
हरवू नकोस  कुठे तू
वाटे थोडी मज भीती ।
Sanjay R.

" आईना "

सजना तुम सवरना तुम
देखकर आईना ।
रूप तुम्हारा सुंदर इतना
कुछ हमको है कहेना ।
हिरा हो, या तुम मोती
दिलका हमारे हो गहेना ।
खो न जाना कभी
दिलमे ही तुम रहेना ।
बसा लिया है आखोमे
ना आसू बनकर बहेना ।
Sanjay R.

Friday, April 26, 2019

" एक थेंब पाणी "

एक थेंब पाणी
सूर्याची ही कहाणी ।
सुकले नदी नाले
मिटली का निशाणी ।
हंडा घेऊन हाती
चला जाऊ अनवाणी ।
ओसाड झाले गाव
नाही उरला कोणी ।
पेटली आग आता
मिटते बघा पापणी ।
हवे मजला आता
एक थेंब पाणी ।
Sanjay R.

Thursday, April 25, 2019

" वणवा पेटला "

झळा उन्हाच्या कशा या
अंग अंग निघते भाजून ।
नाही उरले झाड कुठेच
उभा उन्हातच मी अजून ।

शोध घेतला पाखरांचा
चिमणी पण नव्हती कुठे ।
पाण्यावाचून सांगा कसे
जंगलही झाले सुटे ।

वाळून गेलीत झाड सारी
उडताहेत पानं दूर दूर ।
मधेच एक ढग दिसतो
त्यात बघतो पावसाचा पूर ।

कोरडी पडली जीभ आता
पेटला वणवा त्या दूर ।
थेंब भर पाण्यासाठी
जीव झाला कसा आतुर ।
Sanjay R.

Wednesday, April 24, 2019

" उरली फक्त राखड "

वाट मनाची वेडी वाकडी
आहे किती ती अवघड ।

निघतो चालाया मी जेव्हा
होते जीवाची तडफड ।

एक एक पाऊल ठेवता
होते किती ती पडझड ।

चाललो उठून मी परत
करे छाती मग धडधड ।

गेली जाळून सारी स्वप्न
आता उरली फक्त राखड ।

उचलाया नाही कोणी
देईल हवाच तिला पाखड ।
Sanjay R.

Tuesday, April 23, 2019

" डोळे "

जेव्हा मी ना
बघतो तुझ्या डोळ्यात ।
थांबतो श्वास
मधेच माझ्या गळ्यात ।
ठेवतो तुझी छबी
मग मी माझ्या डोळ्यात ।
बघतो मिटून डोळे
तुलाच मी माझ्या स्वप्नात ।
Sanjay R.

Monday, April 22, 2019

" सूर्याचा तिढा "

उन्हाचा जोर बघा
कमी झाला थोडा ।
आभाळानं वेढलं
सावलीचा सडा ।
बरं वाटत जरा
नाही सूर्याचा तिढा ।
गर्मी पाई तर होतो
माणूस चिडचिडा ।
Sanjay R.

" भाव मनातला "

तू आहेस माझ्या
मनातला भाव ।
मनाची माझ्या
तुझ्याकडे धाव ।
नको करुस तू
मनावर माझ्या घाव ।
ये ना सखे जवळ
प्रेमाला माझ्या प्रेम तू लाव ।
Sanjay R.

Sunday, April 21, 2019

" साद "

स्वप्नात तू देतेस साद
मिटले असतात डोळे तेव्हा ।

वाट तुझीच बघतो मी
सांग ना मज तू येशील केव्हा ।

भरून गेले काळीज माझे
आठवणींना सांग ठेऊ कुठे ।

नजरेला माझ्या आस तुझी ग
तुझ्याच साठी हे हृदय तुटे ।
Sanjay R.

" जिंदगी "

अकेले अकेले लहरोके संग
देखो ये हवा करती है तंग ।
उमड पडी दिलमे उमंग
चल उड चले अब संग संग ।
Sanjay R.

Saturday, April 20, 2019

" सूर्य चंद्र "

लागले ग्रहण सूर्याला
बघायचे मज चंद्राला ।
सळ सळ जरी वाहे तो
अस्तित्व कुठे वाऱ्याला ।

उमलला गुलाब अंगणात
डोलतो कसा डौलाने ।
धुंद झाले अंगण सारे
मंद धुंद सुगंधाने

स्वप्नच देतात साद मनाला
बंद असतात डोळे जेव्हा ।
अवतरतो मग सूर्य धरेवर
होते तांबडे आकाश तेव्हा ।
Sanjay R.

" तूच तू "

निरागस तू
मनोहार तू ।
वाटे मजला
आधार तू ।

आचार तू
विचार तू ।
फुलांचाच
बहार तू ।

गंध तू
सुगंध तू
विचारांचा
बंध तू ।

स्वप्नात तू
नेत्रात तू
बघतो जिथे
अंतरात तू ।
Sanjay R.

Friday, April 19, 2019

" मन "

मन सुखाचा सागर
कुठला त्यास किनारा ।
हळूच एक फुंकर यावी
होऊन जावे वादळ वारा ।
आकाशात ढग यावेत
सोबतीला पावसाच्या धारा ।
काळोखाची चादर ओढून
बघतो त्यातून लखलख तारा ।
पहाटेचे तांबडे फुटता
प्रकाश होतो आसमंत सारा ।
प्रीतीचा हा बंध नाजूक
अंतरात त्याचाच इशारा ।
Sanjay R.



Thursday, April 18, 2019

" राणी "

स्त्री असते सुंदर ज्ञानी
रंग रूप निर्मळ पाणी
शूर वीर ती लक्ष्मी राणी
नका समजू अबला कोणी
Sanjay R.

Wednesday, April 17, 2019

" ध्यास "

ध्यास माझ्या मनाला
सांगू मी कुणाला
सांगायचं बरच तुला
आवडेल का तुला
धिरच होत नाही
होतात वेदना अंतराला
घ्यायचा श्वास खुला खुला
Sanjay R.

" साथी "

'तेरी हर अदा
मुझे खूप भाती है ।
तुम दूर हो मगर
सपनो की साथी है ।

सोचता है जब
मेरा यह दिल ।
याद तुम्हारी ही
तो आती है ।

भूल न जाना कभी
तुम्ही हो एक ।
जो मुझको रात दिन
सताती है ।
Sanjay R.

" काय नाव देऊ "

डोळ्यात तुझ्या बघून
सुचतात चार शब्द ।
आतुर होते मन आणि
हृदय होते स्तब्ध ।

नाव काय देऊ सांग
तुझ्या माझ्या नात्याला ।
अथांग हा सागर किती
उभा मी या काठाला ।

अंतरात उठले वादळ
थरथर होते शब्दांची ।
शब्दांचीच झाली कविता
बघ तुझ्याच आठवांची ।
Sanjay R.

Tuesday, April 16, 2019

" गंध "

दार मनाचे होते बंद
मन मात्र बेधुंद ।
वाटे मनास फार
कसा हा छंद ।
पाकळीला कधी
असतो का गंध ।
उमलू दे फुल
पसरू दे सुगंध ।
उठू दे दरवळ
मंद मंद ।।
Sanjay R.

" आस "

तुझेच वेड मज
हे का कसे लागले ।
करतो विचार तुझाच
मन तुझेच जाहले ।

ओढ अंतरात तुझी
आस तुझ्या भेटीची ।
हरली तहान भूक
उरली तूझ्या प्रीतीची ।

शब्दात तुझ्या शोधतो
माझा मीच कुठे आहे ।
आभास जेव्हा होतो
हृदयात तू माझ्या आहे ।
Sanjay R.

Monday, April 15, 2019

" तारीफ "

ये दिल क्या कहता है
मैं सोचू कुछ और ।
करता कुछ और पर
चाहता दिल कुछ और ।

'तेरी तारीफ मे कही
शब्द मेरे कम ना पडे ।
हर अदा तुम्हारी क्यू
दिलको हमारे छेडे ।

आपमें वो जादू है
चाहे जो हमे बना दो ।
बस पनाह दिलमे देना
और ईश्कमे खो जाने दो ।

दिल तो है एक परिनदा
आसमान छुने की आस ।
पल भर मे जब लौट आये
देखो चल रही है सास ।
Sanjay R.

Sunday, April 14, 2019

" हवा के संग "

पता तो पात्तोंको भी नही पता
कब  कैसे वह छूट जायेंगे ।
फिर भी हिलते है संग हवाके
सोचते हम भी हवा हो जायेंगे ।
Sanjay R.

" तू "

स्वप्न तुझी सारीच
दे ओंजळीत माझ्या ।
होतील सारीच पूर्ण
घे हात हातात तुझ्या ।

माझेही आहे एक स्वप्न
परी तू त्या स्वप्नांतली ।
फुलविल हास्य गाली
राणी तूच मनातली ।

अंतरात माझ्या तू
विचारात ही तू ।
शोधतो मी जेव्हा तुला
होऊन शब्द येतेस तू ।
Sanjay R.

Saturday, April 13, 2019

" कभी "

तुम हो सपना कहू मै अपना
भूल तुम जाना ना कभी ।
यादोमे ही तो जिते है हम
छोड तुम जाना ना कभी ।
छोडकर जाते है लोग सब
पर तुम भूल जाना ना कभी ।
सुई वक्त की दौडती है कितनी
रुकती नहीं फिर भी वह कभी ।
जीस राह पे हम चल पडे
काटे कितने न सोचा था कभी ।
चलना है सांस के अंतिम  तक
बस छोडकर जाना ना कभी ।
Sanjay R.

Friday, April 12, 2019

" आधार "

नाहीस तू दूर फार
बघतो स्वप्न रोज मी
त्यातला तर तूच सार ।
नेत्रात तुझ्या बघतो जेव्हा
हृदयात होतात कितीक वार ।
शब्दात तुझ्या मी शोधतो मला
मिळतो मला मग तुझाच आधार ।
Sanjay R.

" उलझन "

ना रखना उलझन तुम दिलमे
रखा तुमको ही हमने मनमे ।
क्या माँगे अब हम खुदासे
जब याद तुम्हारी आये हमको
तब तुम आना हमारे सामने ।
Sanjay R.

Wednesday, April 10, 2019

" गणित "

वेळेचे गणित
काही बरे नाही ।
डोळ्याला डोळा
लावून बघायचं
लक्षणही खरं नाही ।
थोडी मस्ती
थोडा दंगा ।
आयष्यभर तर
असतोच पंगा ।
आयुष्य खरच हा
खेळ नाही ।
जागून घ्या आत्ता थोडं
म्हणाल नाहीतर
मेलो आता बघा
तरीही वेळ नाही ।
Sanjay R.

Saturday, April 6, 2019

" जागरण "

नको करुस तू अबोला
सूर्यही पर्वता आड गेला ।

संध्या हळूच बघ आली
पक्षी निघाले घरट्याला ।

आभाळ झाले तांबडे
गेले आमंत्रण रात्रीला ।

चांदण्या फुलतील आकाशी
चंद्र लपला आडोशाला ।

अमावशेची रात्र बघ ही
येईल काजवा जगरणाला ।
Sanjay R.

" मांडवस "

मराठी नववर्षाचा दिवस आज
उभारून गुढी करायचा खास ।

शुभ आरंभ चला करू आपण
आता नवीन ध्येय नवा प्रवास ।

बांधा तोरण ध्वज उभारा
उम्मीद नवी ही भर श्वास ।

पाडवा म्हणा वा म्हणा मांडवस
विजयाचा आहे मनात ध्यास ।
Sanjay R.

Friday, April 5, 2019

" सांग ना "

स्वप्न माझे तूच
किती ग छळशील मला
भावना मनातल्या
का कळतील ग तुला ।

मन माझेही आतुर
मी सांगू कसे तुला ।
श्वास माझा तूच
सखे सांग ना ग मला ।
Sanjay R.

Thursday, April 4, 2019

" पेव "

" पेव "

डराम कोठ्या नव्हत्या तवा
अनाज ठिवाले होते पेव ।

बिनधास्त राहे अनाज
उंदरा चिलटाच नव्हत भेव ।

दुष्काय जरी मंग पडला
राहे सोबतीले थोच देव ।

गावा गावात पहा आता
उरले नाही कुठंच पेव ।

राशन करडान चिंता गेली
दोन रुप्यात पोटभर जेव ।

काम धंदा सोडून सन्या
सरकारलेच अखिन शिव्या देय ।
Sanjay R.

Wednesday, April 3, 2019

" द्रोह "

हार गुलाबाचे टाकून
करू आम्ही स्वागत ।
देशद्रोह करा तुम्ही
पाजू देशभक्तीचे रगत ।
कायदाच नसेल आता
बसा सगळेच बघत ।
Sanjay R.

Tuesday, April 2, 2019

" भोळी चारोळी "

चार ओळींची चारोळी
दिसते थोडी भोळी ।
पण आहे शब्दांचे जाळे
लावून बसलेला कोळी ।
जरा बघा तिचे इशारे
पडेल अपुरी ती झोळी ।
भावनांचा वाचे पाढा
मनाची करते खेळी ।
Sanjay R.