Thursday, April 27, 2023

अंतरात उठले वादळ

नजरेत तुझ्या  ग
होता कुठला इशारा ।
साद देऊन गेला 
मज हळूच तो वारा ।
Sanjay R.

थेंब दोन डोळ्यात

मनात जे जे आहे
व्यक्त होते डोळ्यात ।
थेंब दोन त्या डोळ्यात
आणि हुंदका गळ्यात ।
Sanjay R.


हळवे मन

मन हे हळवे किती
कधी होतात वेदना ।
कधी असते शांत
चाले जणू साधना ।
Sanjay R.


ग्रहण

सजल्या आज वाटा
आकाशही नटले ।
सूर्य ढगाआड दडला
ग्रहण चंद्राचे सुटले ।
Sanjay R.


शब्दांची साथ

चार ओळींना असते
शब्दांची साथ ।
अवतरते भावना तिथे
घेऊन विचारांचा हात ।
Sanjay R.


चार ओळींची गाथा

चार ओळींची गाथा
त्यात मनातल्या व्यथा ।
व्यक्त होऊ मी कसे
नायक मीच स्वतः ।
Sanjay R.


वारा घेऊन वादळ आले

वारा घेऊन वादळ आले
थेंब पाण्याचे गारा झाले ।

हलले डूलले थोडे बिथरले
झाडच ते कसे कोसळले ।

भिंती हलल्या छतही गेले
उघडे आकाश अश्रू हरपले ।

जिकडे तिकडे पाणी झाले ।
दुःखात सारे ओले ओले ।
Sanjay R.


विचारांचे जाळे

डोक्यात विचारांचे जाळे
छळतात किती मनाला ।
सारे असते सोसायचे
सांगायचे कसे कुणाला ।

वाटे कधी काय करावे
दुःख आतले कसे सारावे ।
सोडून साऱ्या दुःखाच्या वाटा
वाटेत सुख तेच धरावे ।
Sanjay R.


सुंदर मनाची असते आई

सुंदर मनाची असते आई
करते लहान पणी गाई गाई ।
जगात असते रात्र सारी
तानुल्या रे ती तुझ्या पाई ।

कंटाळा का कधी केला तिने
मन तिचे रे तुझ्याच ठाई ।
ओठी तिच्या नव्हता शब्द
कधी बोलली का तुला नाही ।

मोठा तू रे झालास आता
आठव जरा ती तुझी आई ।
लोटू नकोस दूर असे तू
सांग कशाची पडली घाई ।
Sanjay R.


Wednesday, April 26, 2023

एक सुंदर मन

असावे एक सुंदर मन
गुंतून जावा क्षण क्षण ।
कधी घ्यावी उंच भरारी
यावे फिरून सारे गगन ।
आहे बघायचे सुंदर तारे
ठेवून उघडे दोन नयन ।
ढगावरती होऊन स्वार
आहे करायचे मज भ्रमण ।
Sanjay R.



नियती पुढे सारे क्षीण

मनातले कळणे
आहे किती कठीण ।
व्हायचे तेच घडते
नियती पुढे सारे क्षीण ।

हाताशी आलेला घास
जातो कधी निसटून ।
नकळत मिळते कधी
नशीब आणते ओढून ।

सारा नियतीचा खेळ
नशिबाची हवी साथ ।
असेच काही मिळत नाही
मेहनतीचाही हवा हात ।
Sanjay R.


नियतीचा खेळ सारा

चालते कुणाचे इथे
नियतीचा खेळ सारा ।
हसतो रडतो कुणी कसा
ठरवितो तोच वारा ।
Sanjay R.


दरवळला सुगंध दूर

माळला तू केसात गजरा
दरवळला  सुगंध दूर ।
लागली चाहूल मोगाऱ्याची
आणि मन झाले आतुर ।

शोधू कुठे कसे तुजला
नेत्र माझे नाहीत चतुर ।
वारा हळूच सांगून गेला
मधुर किती तुझा ग सुर ।

आठवण आहे अजून ती
मन त्यातच असते चुर ।
सांगतो मी गुपित मनातले
भासते तूच मझी ग हूर ।
Sanjay R.


जगण्याची रीती

का असे तू छळतेस
सोड ना तुझी उदासी ।
हसून दे तू जरासे
जग सारे हे आभासी ।

दुःख मनातले सारे
मनातच तू असू दे ।
गालावर थोडे स्मित
तेच जगाला दिसू दे ।

आहेच कोण इथे सुखी
अंतरात सारेच दुःखी ।
हुंदका दाबून बोलतात
सांग यात काय चुकी ।

डोळ्यात असतील जरी
आसवांचे थेंब किती ।
गालावर कुठे ओघळतात
हीच जगण्याची रीती ।
Sanjay R.


मन का उदास

कळेना मज काही
हे मन का उदास ।
वाटे भीती कशाची
पडे डोक्यावर घन ।
भार हटेना कशाचा
कठीण एकेक क्षण ।
सुन्न पडली काया
प्राण सुटेना पण ।
Sanjay R.


कशास मी उदास

हसण्यास नको कारण
हीच जगण्याची मजा आहे ।
होऊ कशास मी उदास
जगतो म्हणून श्वास आहे ।
बघतो ते जीवन मी
जगणे ऐक ध्यास आहे ।
कुणास ठाऊक जीवनाचे
जीवन हे आभास आहे ।
Sanjay R.


बसेल मानगुटीवर भूत

श्रद्धेपाई होऊ नका अंध
बसेल मानगुटीवर भूत ।
पारखून निरखून बघा
आणि मगच जोडा सुत ।
Sanjay R.


Tuesday, April 25, 2023

रिमझिम बारिश

रिमझिम बारिश
भिगे भीगे ये बाल
बहता हुवा पानी
भर दो सारे ताल

छिप गया सूरज
झुमने लगे बादल ।
बुंदे बारिशकी
सब कूछ ओझल ।

हीलती हुवी पत्तिया
डोले पेडका आचल ।
भिग गई ये धरा
निखरा रूप असल ।
Sanjay R.


मांजर आडवी गेली

मांजर गेली आडवी
अपशकुन झाला ।
काय कसे झाले
कामात अडथळा आला ।

निघलो जेव्हा मी
महत्वाच्या कामाला ।
नाट लावली कोणी
प्लान फिस झाला ।

नको असा अपशकुन
आला लिंबू मिरची वाला ।
अंधश्रद्धेचे भूत मागे
सांगू मी कोणाला ।
Sanjay R.


अंध श्रद्धा

असू दे श्रद्धा तुझी
नको अंधश्रद्धा ।
अविचारी ते सारे
डाव नाही साधा ।
देतील घाव दुःखाचे
आहे ही दुविधा ।
Sanjay R.


कळले अर्थ सारे

शब्दातून तुझ्या मज
कळले अर्थ सारे ।
अंतरात माझ्या होते
सरले तेही पहारे ।

नेत्रांना आता आस
थकले करून इशारे ।
बसले नजर ते लावून
जणू गगणातले तारे ।

आसव सुकून गेले
कसे हिरमुसले बिचारे ।
शब्दांनी दिला सहारा
बोलले ओठ हसारे ।
Sanjay R.


प्रीत तुझी माझी

रंग प्रीतीचा मज
बघून तूला चढला ।
विचारात आता तूच
छंद तुझाच जडला ।

डोळ्यात चढली धुंदी
श्वास तुझ्यात अडला ।
आभास होतात तुझेच
बदल कसा हा घडला ।

शोधू तुला कुठे मी
जीव तुझ्यात दडला ।
घे हात तू हातात
हृदयास घाव पडला ।

प्रीत ही तुझी माझी
मोगराही दरवळला ।
गंधात भान हरपले
संथ वारा सळसळला ।
Sanjay R.


शोधू कुठे मी आनंद

हवा मज आनंद
सांगा कुठे शोधावा ।
पैश्यात दिसतो कधी
मग करतो मी धावा ।

पैसा पैसा करतो
पैसा वाटतो हवा ।
दुःखातून परतता
मार्ग शोधतो नवा ।

परत वाढते हाव
उरते फक्त ती धाव ।
मग मृत्यू संगे सरते
सांगा उरते कुठे नाव ।

पैश्या विना इथेहो
होते कुठे ते काय ।
विसरतो नाते सारे
कोण बाप कोण माय ।

नको नको तो पैसा
आनंद हवा वाटतो ।
दुःखात आहे सुख
दुःखच मीही मागतो ।
Sanjay R.


नको धरू आस

नको धरू आस
इथे सारेच आभास ।

म्हणू कुणास खास
करते कराविते दास ।

नाही कशाचा ध्यास
नाही उरला विश्वास ।

आवळतो कसा फास
फक्त सोसायचा त्रास ।

जगतो आहे म्हणून
चालतात हे श्वास ।
Sanjay R.


कशाचा वंश कशाचा दिवा

चला करू या
निषेध आता ।
कशाचा वंश
कशाचा दिवा ।

मिणमिणती ती
पणती बरी ।
फंडा हाच
जीवनात हवा ।

कोणी कुणाचा
नाही इथे ।
करतो कोण
तुमची सेवा ।

आयत्या बिळात
नागोबा हो ।
सगळ्यांनाच हवा
फक्त मेवा ।
Sanjay R.


निषेध

सत्कार्याचा नको निषेध
दुर्यचाऱ्यांचा करू भेद ।
सतगुणी हवेत सारे
चला घेऊ त्यांचा वेध ।
Sanjay R.


वंश

वंशाचा ऐक दिवा
चालवी परंपरेचा ठेवा ।
ओळख तीच पुरेशी
सांभाळ तूच देवा ।
Sanjay R.


रात राणी

काळया निळ्या रात्री
कळी एक फुलली ।
दरवळला सुगंध त्यात
रातराणी ही भुलली ।
Sanjay R.


अंतरात उठले वादळ

नजरेत तुझ्या  ग
होता कुठला इशारा ।
साद देऊन गेला 
मज हळूच तो वारा ।

चांदणी आकाशात
होती देत पहारा ।
हसला कसा गालात 
लपून तो चंद्र तारा ।

अंतरात उठले वादळ
मन पाऊस धारा ।
सुचेना शब्द काही
देशील का तू सहारा ।
Sanjay R.

दागिना

हवा तिलाही दागिना
मिरवते घालून पुन्हा पुन्हा ।
भासते ती ही जणू राधा
हवा तिला तिचा कान्हा ।

सुटते कुठे तिचे भान
घराची असते हो शान ।
तिच्याविना घर हे सूने
हवे नकोचे सारे ज्ञान ।

नको मान नको सन्मान
हवी तिला प्रेमाची आन ।
घरासाठी सोसते वार
घरच तिचे स्वाभिमान ।
Sanjay R.


तिचा स्वाभिमान

नाही कुठला अभिमान
नाही कुठली शान ।
फक्त हवा तिला सम्मान
तोच तिचा स्वाभिमान ।

हक्क नको आदर हवा
तोच तर अनमोल ठेवा ।
नका करू अपमानित
धर्म तिचा आहे सेवा ।

कोमळ किती तिचे मन
मामातेचा आहे सागर ।
आई म्हणा ताई म्हणा
पत्नी म्हणून होतो जागर ।
Sanjay R.


हवा मज आनंद

हवा मज आनंद
सांगा कुठे शोधावा ।
पैश्यात दिसतो कधी
मग करतो मी धावा ।

पैसा पैसा करतो
पैसा वाटतो हवा ।
दुःखातून परतता
मार्ग शोधतो नवा ।

परत वाढते हाव
उरते फक्त ती धाव ।
मग मृत्यू संगे सरते
सांगा उरते कुठे नाव ।

पैश्या विना इथेहो
होते कुठे ते काय ।
विसरतो नाते सारे
कोण बाप कोण माय ।

नको नको तो पैसा
आनंद हवा वाटतो ।
दुःखात आहे सुख
दुःखच मीही मागतो ।
Sanjay R.


Sunday, April 23, 2023

तमन्ना

पाने की है तमन्ना
खोने का हो डर ।
जो भी है दीलमे मेरे
कह दू तुम्हे अगर ।

कैसे सवारू मै यादे
भूल न पाई कभी ।
याद तुम्हे है या नही
लगता कह दु सभी ।

दूर जितनी हो तुम
सोच कहती पास हो ।
पता नहीं दिलं को मेरे
लगती तुम सास हो ।
Sanjay R.


आनंदाचा शोध

आनंद इथे कणाकणात
फक्त वाटावे थोडे मनात ।
दुःख नाही कुणास इथे
सारा दूर एकाच क्षणात ।
होऊ नका हळवे इतके
जरा बघा जगून आनंदात ।
शोध नको बोध नको
जगायचे फक्त समाधानात ।
Sanjay R.


भ्रमण

थांबायला वेळच कुठे
नाही सुखाचा क्षण ।
मुसाफिर मी इथला
करतो सदा भ्रमण ।
Sanjay R.


मुसाफिर

बापरे.....
झाला किती उशीर
धरवत नाही धीर ।
बघतो भिर भिर
सारेच इथे मुसाफिर  ।
लक्ष समोर एक
लावायचा तिर ।
साधा हीत आपले
करू नका उशीर ।
Sanjay R.



विजयाची आस

मन एक विचार
कधी होतो भार ।
मस्तिष्क थंड
तर वाटे भार ।
विजयाची आस
होते कधी हार ।
कळेना काही
होते कुठे स्वार ।
झेलतो मीच
माझेच वार ।
आनंदात सारे
वाटतो आधार ।
अंतरात वाजते
मधुर सतार ।
चम चम चांदणे
मोजायचे चार ।
Sanjay R.

जगण्यात मजा आहे

जगण्यात आहे मजा
जगणारा फक्त हवा ।
रोज असतो दिवस वेगळा
मनात विचार नवा ।
निसर्गाने दिला आम्हास
विपुल इथला ठेवा ।
द्यायचे वाईट सारे सोडून
घ्यायचा हवा तो मेवा ।
Sanjay R.


आई बाबा तुमचे स्वप्न

आई माझ्या स्वप्नांना
दिला तूच तर आकार ।
तुझ्याच ग कष्टांनी
केले मी ते साकार ।

विसरेल कसा बाबांना
होता त्यांचाच आधार ।
शिकविला मलाही त्यांनी
दृढ येक निर्धार ।

बघतली मेहनत तुमची
कष्ट तेही मी शिकलो ।
तुमच्या विना मी कुठला
म्हणू नका तुम्ही थकलो ।

तुम्ही वृक्ष मी काठी
जन्म माझा तुमच्या साठी ।
नका जाऊ खचून असे हो
हवेत मजला तुम्ही पाठी ।
Sanjay R.


बहरला गुलाब मोगरा

बहरला गुलाब
मोगरा दिसेना ।
दरवळला सुगंध
काहीच सुचेना ।

गुलाबी तो गुलाब
डोलतो थाटात ।
शुभ्र वस्त्रात मोगरा
हसतो गालात ।

पानातून डोकावून
हळूच बघते कळी ।
धुंद वाऱ्यावर कशी
झुलते पाकळी ।
Sanjay R.

आधार

मनात एकच विचार
डोकावतो वारंवार ।
नाही त्याला सार
नाही कुठला आधार ।

कळेना काय प्रकार
होतो डोक्याला भार ।
हवा असतो होकार
पण मिळतो नकार ।

मन होते तार तार
अंतरात जणू प्रहार ।
निराशेची ती खाई
शब्द पडेना चकार ।

कशी ही व्यथा
कसा हा संसार ।
परत वाटते मग
हवाच एक आधार ।
Sanjay R.


स्वप्न आई बाबाचे

लहानाचे मोठे करण्या
सोसले कष्ट किती ।
आई बाबांच्या डोळ्यात
बाळाचे स्वप्न किती ।

बाळ झाले मोठे
वाटते आता भीती ।
पासारूनिया पंख ते
जाईल दूर किती ।

म्हातारे होतील येकटे
उरेल काय हाती ।
विचारानेच त्यांची
धडधडते कशी छाती ।
Sanjay R.

हा आभास

लालसा या मनात
बघावे मन भरून ।
बोलावे इतके की
जावी रात्र सरून ।

बघावे डोळ्यात
त्यात मी दिसावा ।
शब्दात तुझ्या मी
क्षणो क्षणी असावा ।

स्वप्नांचा तुझ्याही
हवा मज आभास ।
त्यात तू आणि मी
व्हावे ऐक श्वास ।
Sanjay R.


कहर चोरीचा

रातच्यांन आले चोर
केला त्यायान कहर ।
आले चोरी कराले न
गेले पिऊन जहर ।

कपाशीवर माराले
औषिध होत ठीउन ।
काय झालं कोणास ठाव
थेच घेतल पिऊन ।

चढली असन गुंगी
रायले जागीच निजून ।
धरले लोकायन मंग
कहाडले चांगले शिजून ।

जन्मभर इसरणार नाही
लयच त्यायले झोडल ।
म्हणते नाव चोरीच हो
शपथ घेऊन सोडलं ।
Sanjay R.


संथ झाला आता श्वास

मनातले सारे माझ्या
गेले राहून मनात ।
पडला डोळ्यातून पाऊस
थेंब गळले आसवात ।

होती आस या मनात
प्रतीक्षा ही डोळ्यात  ।
गेल्या भावना सोडून
दाटला हुंदका गळ्यात ।

झाली दूर आता वाट
कुठे पडेल गाठ ।
अंधार झाला काळा कुट्ट
होईल कधी पहाट ।

काळोखात चाले नाच
भूत वसले डोक्यात ।
तुटले स्वप्न आता सारे
धूसर झाले क्षणात ।

मन लागले खाया
होते धडधड उरात ।
संथ झाले आता श्वास
कुठे प्राण या तनात ।
Sanjay R.


वाटी आणि ताट

जेवायला नाही तिथे
वाटी आणि ताट ।
संसाराची कुठे ती
जाते बघा वाट ।

बघून चुलीला कशी
विझली हो आग ।
भुकेल्या पोटाला मग
येतो किती राग ।

पैश्याविना भाजी
येईल कशी घरात ।
धान्याच्या बाजारात
गहू पण महाग ।

गाळून घाम सारा
जातो दिवस कष्टात ।
उपाश्या पोटी झोप
चोळती डोळे अंधारात ।

गरीबाची ही कथा
कसे ते जगतात ।
रक्ताचे होते पाणी
तरीही हसतात ।
Sanjay R.


आले कुठून हे आभाळ

आले कुठून हे आभाळ
सुर्याविनाच होते सकाळ ।
बसले रुसून कसे नारायण
वाटतो त्यांना हा छळ ।
मधेच येतात थेंब पावसाचे
वाहते पाणी खळ खळ ।
मधेच जातो बघून थोडा
येऊन वारा सळ सळ ।
Sanjay R.


जवाबदारी

पूर्ण तर करावीच लागते
असेल जर जबाबदारी ।
कशाला करू मी विचार
ध्येय पुढे असल्या वरी ।
चारच पावले जायचे पुढे
वाटते तितके नसते भारी ।
विचारच खेचतात मागे
करता करता होते तयारी ।
Sanjay R.


शब्द

शब्द जणू विखरले
भोवती कानाच्या पसरले ।
मूक शब्दांची होती गाथा
कळेना उच्चार त्यातले ।
सहज पहिला करून उलगडा
जुळले भावनेशी आतले ।
मन होते जेव्हा निराश
वाटले कोण इथे कुठले ।
गालावर थेंब दोन पाण्याचे
पण होते अश्रू ते डोळ्यातले ।
Sanjay R.


Wednesday, April 19, 2023

हवा संमान

प्रत्येकाला हवा असतो मान
तेच वाढविते त्याची शान ।
नका करू विचार कशाचा
कोण मोठा कोण लहान ।
नक्कीच मिळेल तुम्हास ही
द्या थोडा प्रत्येकास सम्मान ।
Sanjay R.