Sunday, May 19, 2013

" अथांग सागराचा शोधावा किनारा "

"दे झुगारुन बंध"


भाग्य आरशाचे
बघा किती ।
न्याहाळतो रोज
वेळा कीती ।

मनात स्वप्न तुझे
मी रचतो कीती ।
बघाया झलक तुझी
मी वेडा कीती ।

तुझ्याविना जगणे
सोसायचे कीती ।
मनातले हुंदके
रोकायचे कीती ।

दे झुगारुन बंध
करु नकोस क्षती
हात तुझा हाती दे
देउ जिवनाला गती
sanjay R.





"शोधावा किनारा"


तुझी आठवण जसा
भुतलावरचा पसारा
अथांग सागराचा
शोधावा किनारा ।

फुलुन जावा तारकांनी
आसमंत सारा
नभी दिसावा
येकटा ध्रुव तारा ।

कळीचा पाकऴयांना
मिळता इशारा
सुगंधीत व्हावामनीचा पिसारा ।


निळे काळे नभ आणी
पावसाच्या धारा
चिंब भिजुनी
वेचाव्या गारा ।
sanjay R.




"अरमान"

बस प्यार ऐसाही है
रोने को जहान है
हसाने को नही कोयी
खोने काही अरमान है
sanjay R.

Thursday, May 9, 2013

" स्वर भावबंधांचे "






" स्वर भावबंधांचे "


Date – 26.09.2012
ह्रदय दिलेस तु आज मज
त्यात भरील मी श्वास रोज
येक झाले प्राण आपुले
वेगळे करील फक्त यमराज
sanjay R.

ह्रदय दिलेस तु आज मज
त्यात भरील मी श्वास रोज
येक झाले प्राण आपुले
वेगळे करील फक्त यमराज
sanjay R.

गुण आणी गाण
आहेत वेग वेगळे
गुण तुझे नी गाण माझे
आहे किती आगळे
...
मन मनास जाणतो
इतरांस ते ना कळे
sanjay R.


नाही प्रेम माझे दान
नको करुस तु अवमान
हर्षीत होइल मन माझे
सांग गाउ कशे गुण गाण
sanjay R.


वाचुनी नेत्री तुझ्या
गीत भावनांचे
मनी जपेन मी
स्वर भावबंधांचे
जाणतो मी
मोल आसवांचे
sanjay R.


भाव तुझ्या मनीचे
डोऴयातुन कळले
गुपीत तुझे माझ्या
ह्रदयात जुळले
sanjay R.
...

रुके रहो अब
साँस पुरी लेकर
खत्म होगी तनहायी
उनके आनेपर
sanjay R.