Saturday, February 29, 2020

" इबोला गेला कोरोना आला "

आता तुम्ही काहीही बोला
व्हायरस बेकार हो इबोला ।

सांगू काय हो मी तुम्हाला
आता तर चायनात करोना आला

माणसाच्या जीवाचा खेळ झाला
निरपराध बिचार्यांचा जीव गेला ।

भारत ही आमचा घाबरून गेला
उपाय काय ते तेवढंच बोला ।

इबोला इबोला करता काय
त्याला जाऊन तर काळ झाला ।
Sanjay R.


Friday, February 28, 2020

" केलेस तू भूत आपले "

रे मानावा
केलेस तू भूत आपले

जीवन तुझे रे तिथेच सरले ।


झालास तू बाहुले त्याचे


अस्तित्व तुझे रे कुठे उरले ।

आचार विचार देऊन सारे
सांग कुणास तू घडवले ।
अविचारी तूच महान
साऱ्यांना तर तूच रडवले ।

यंत्र झालेत सर्वस्व आता
जे जे होते सारे पढवले ।
बुद्धिवान ते यंत्र झाले
कामात तुझ्या तुला अडवले ।

गरज कुणास आता तुझी रे
तुझ्या विनाच होईल सारे ।
निर्बुद्ध तू ठरशील आता
अक्कल तुझी , तुझेच तारे ।
Sanjay R.


" विजय हवा मरणावर "

सुरू आहे वारी
प्रगतीच्या वाटेवर 
ज्ञान विज्ञान पुढे
पोचायचे शिखरावर ।

अखंड शोधाशोध
यशाच्या आशेवर ।
जीवन मात्र आता
लटकत्या तारेवर ।

लाभल्या सुख सुविधा 
फरक पडला जीवनावर ।
एकच शोध बाकी आता
विजय हवा मरणावर ।
Sanjay R.

" बहार पुन्हा येणार आहे "

कधी सुख कधी दुःख
ही वाट आयुष्याची आहे ।
पिकली पानं पडतात गळून
हेच जीवनाचे सत्य आहे ।
धीर धर ना थोडा जरा
जीवनात बहार येणार आहे ।
आयुष्याचे हेच चक्र
आसव डोळ्यातले हसणार आहे ।
Sanjay R.



Thursday, February 27, 2020

" माय मराठी होय मराठी "

अति विशाल आहे
मराठी ची गाथा ।
लहानपणी ऐकायचो
मराठीतच कथा ।

ज्ञानेश्वर तुकाराम
मराठीचे स्तंभ ।
अंतरात केले घर
वाचू किती अभंग ।

मोठमोठे साहित्यिक
नावे आहेत कितीतरी ।
झेंडा मराठीचा त्यांनी
झळकवला उंचावरी ।
Sanjay R.

Wednesday, February 26, 2020

" डोळ्यात तुझ्या आसू "

नाकावर तुझ्या रागआणि 
डोळ्यात नेहमीच आसू ।
तू ग माझे लाडके
आहे बाई रुसू ।
कळतं मला पण
कसं येतं तुला हसू ।
डोळे मिचकावले की
वाटते ग तू सासू ।
नेहमीच हसत राहा
आणू नको असू ।
Sanjay R.


" तू रे असाच शिकत राहा "

शिकून सवरून मोठा झाला
हाच तर तू रे गुन्हा केला ।
मोल मजुरीचे सारेच रस्ते
बंद तू रे करून आला ।
नोकरी हवी चाकरी हवी
स्पर्धेपाई ती मिळेना तुला ।
उद्योग धंदे नाही रे सोपे
पैश्या विना हलत नाही झुला ।
घे शिकून परत आता 
लाव दहा वीस तू डिगऱ्या ।
वर्षोन गनती तू शिकत राहा
सरकारला पण रे तेच हवे ।
Sanjay R.

Tuesday, February 25, 2020

" पदर डोक्यावर "

तिचा पदर तिची आहे लाज

सांभाळते ती त्यात तिचा साज ।

जेव्हा लेकरू असे कडेवर
सुख देउ त्यासी तिचा पदर ।

ऊन पाऊस करे जेव्हा मारा
डोक्यावर पदर देई  गार वारा ।

पाहून एकटी लोक करी इशारा
एकटा पदर सांभाळी सारी धुरा ।

मान सन्मान लाज आणि लज्जा
कवच सुरक्षेचे देण्या पदर सज्ज ।

स्त्री चा पदर आहे तिचे सर्वस्व
सारेच जाणती आहे त्याचे वर्चस्व ।
Sanjay R.


Saturday, February 22, 2020

" तू कर चुका "

करणी ही तुझीच
तू करत जा ना चुका ।
दुरुस्त करणे काम माझे
लावील मी त्यास हुका ।

चूक तुझ्या साऱ्या
त्यात तुला काय धोका ।
इकडून तिकडे फिरवले की
होईल रिकामा खोका ।

शब्द दोन चार असे
फिरवून तुम्ही फेका ।
कॉपी पेस्ट चा जमाना
वाट्टेल ते ठोका ।

चोरून दूध प्यायचे
करतो हेच बोका ।
हिम्मत कुणाची आहे का
 नाही कुणाचा टोका ।

तू ना आता रोजच
करत जा चुका ।
गोड तुझा गाल
घेईल कुणी तरी मुका ।
Sanjay R.


Friday, February 21, 2020

" एक वेगळा अर्थ "

प्रेमाला एक ना
वेगळाच अर्थ
नाही त्यात स्वार्थ
नाही परमार्थ
बस आहे ती हाक
अंतरातली आर्त

काय प्रेमाचा
भावार्थ
लपले त्यात
शब्दार्थ
विचारांचा आहे
सर्वार्थ
कराया आकलन
मानावे तीर्थ
Sanjay R.




" पैसा सब कुछ "

येरे पैसा, जाऊ नको पैसा
पैसा पैसा करत जगायचे ।
पैश्या शिवाय काय दुसरे
आला पैसा की हसायचे ।

नको काम, नको कष्ट
मार्ग पैश्याचे हो शोधायचे
हात मळताच पैसा यावा
असेच काहीतरी करायचे ।

येणार नसेल पैसा सहज तर
अश्रू दोन मग गाळायचे ।
चोरी मारी लाच खोरी
करून पैसे मात्र मिळवायचे ।

पैश्याविना सुख कुठे हो
दुःखात कशाला पडायचे ।
पैसा तर आहे सब कुछ
कशाला गरिबीत मरायचे ।
Sanjay R.




" काश्मीर हमारा "

थंड हवा गार गार वारा
निसर्ग रम्य परिसर सारा ।

उंच हिमालय , त्याचा तोरा
खळखळ वाहे पाण्याच्या धारा ।

शून्याखाली हो तिथला पारा
वाटते गर्वाने काश्मीर हमारा ।

पांढरा शुभ्र बर्फ चमके
हिरवा देवदार घेई ठुमके ।

गोरे गोमटे लोकही तिथले
वाटे नंदनवन आहे हे कुठले ।

दूर उंचावर शंकराचार्य मंदिर
ठेऊन अस्तित्व बाकी मिटले ।
Sanjay R.

" लव्ह यु जिंदगी "

जन्माला आलो तर जगायचे
येईल अंत तेव्हा हो मरायचे ।

सांगा जीवनाचा या काय अर्थ
दिसतो का हो कुठे यात स्वार्थ ।

आहे खळखळून मला हसायचे
धाय मोकलून कधी तरी रडायचे ।

उंच त्या आकाशात उडायचे
धपकन खाली येऊन मग पडायचे ।

रोज तेच ते नको हो जगायचे
काहीतरी वेगळं करून बघायचे ।

कानात कुणाच्या गुणगुणायचे
लव्ह यु जिंदगी आहे सांगायचे ।
Sanjay R.

" कशाचे हो नाते "

कुणाचे कुणाशी
कशाचे हो नाते ।
कामा शिवाय हो
जवळ कोण येते ।

नको माय बाप
नको भाऊ बहीण ।
राजा राणी दोघच
माझं मीच पाहीन ।

कुणाची कुणाला
गरज कुठे उरली ।
छोटीशी फॅमिली
माया आता सरली ।
Sanjay R.

" जगाची रितच निराळी "

दिवसभर चाले
नुसती पळा पळी ।
रात्री शांती नि
परत तेच सकाळी ।

कुणाकडे असे
रोजच दिवाळी ।
कुणाच्या भुकेला
नसे एक पोळी ।

उपसतो कुणी कष्ट
रक्त आपले जाळी ।
बघतो बसून कोणी
वाजवितो टाळी ।

गरीब कुणी श्रीमंत
लिहून त्याच्या भाळी ।
जगाची ना हो या
आहे रीतच निराळी ।
Sanjay R.

" स्वातंत्र्य तर हक्क आमचा "

स्वातंत्र्य आहे तुम्हाला
बोला काय वाट्टेल ते ।
बिघडतं कुठं काही
विचारही तुमचेच ते ।

शिव्या घाला आडवे पाडा
माळीसाठी काढा जोडा ।
संस्कृतीला फोडा झोडा
माणुसकीला असेच तोडा ।

मान सन्मान हवा कुणाला
व्हायचे श्वापद हो आम्हाला ।
स्वातंत्र्य तर हक्क आमचा
सांगा काय करायचे तुम्हाला ।
Sanjay R.

Monday, February 17, 2020

" जिता हु मै "

जिता हु मै एक सपना
जीसमे कोई है एक अपना ।
नही कुछ इसमे पराया
है इसे हमे दिलसे जपना ।
Sanjay R.

" जगतो एक स्वप्न "

प्रत्येकाच्या मनात
असते एक स्वप्न ।
गाव असो वा शहर
चाले स्वप्नात जगणं ।
पोटासाठी चाले कष्ट
कष्टामध्ये तो मग्न ।
पाठ टेकवताच रात्री
आठवतात सारे विघ्न ।
निघून त्यातून मग
बघतो बंद डोळ्यात स्वप्न ।
हवं तसं अनुभवतो मग
तेच त्याच खरं जगणं ।
Sanjay R.

" जय गजानन "

ठेऊन मनात भाव
स्मरण तुमचे करावे ।
पूर्ण होती कामना
सारेच गजानना ठावे ।
शेगावी जाऊन एकदा
दर्शन माऊलीचे घ्यावे ।
प्रसाद झुणका भाकर
घ्यावा तो मनोभावे
श्रद्धा भक्तीचा सागर
जीवन धन्य ते करावे ।
Sanjay R.

" मार्ग आता मरणाचा "

केला एकाने घात
कोरोनाने पसरले हात
पसरली वाऱ्यासंगे साथ
लागली जीवनाची वाताहात ।

सांगा गुन्हा कुणाचा
मृत्यूपूढे नाही वेळ क्षणाचा
मोडला खेळ कसा जीवनाचा
उरला मार्ग फक्त आता मरणाचा ।
Sanjay R.

" एक विचार "

प्रेम आहे जीवनाचा आधार
सहज होतो कितीही भार ।
येती मनात अगणित विचार
आनंद उत्साह होई आचार ।
मग येई सोबतीला सुखाचार
दुःख सारे होतील लाचार ।
Sanjay R.

" चला करू या समाजसेवा "

करायची कुणाला हो
सांगा ती समाज सेवा ।
नाव मोठे करून
खायचा आहे गोड मेवा ।
जगो मरो कोणी कसा
तूच पहा रे तुझे देवा ।
सेल्फी मला काढू दे
बघणाऱ्याला वाटेल हेवा ।
अस्तित्व माझे कळू दे
होईल प्रसिद्ध मी तेव्हा ।
होईल मोठी कमाई माझी
करील नाटक मी जेव्हा ।
हेच आहे मनात माझ्या
चला करू या समाज सेवा ।
Sanjay R.

Thursday, February 13, 2020

" दिवस सारेच प्रेमाचे "

काय किती प्रकार
या व्हॅलेंटाईन चे ।
कुणास ठाव हे
प्रेमाचे की मस्तीचे ।

हवेत कशाला दिवस
दिवस सारेच प्रेमाचे ।
व्यक्त करायला मन
इतके कशाला थांबायचे ।

वाटत कधी की हे प्रकार
श्रीमंतांच्या वस्तीचे ।
गरीबाच्या घरी तर
विसर्जन होते अस्थीचे ।
Sanjay R.

" तू येशील का "

मनातली मलिका ग तू
मनात माझ्या विसावशील का ।
मन घेईल झोके सुखाचे
मिठीत माझ्या तू येशील का ।

डोळ्यांना माझ्या तुझीच प्रतीक्षा
तृप्त नेत्राना तू करशील का ।
भेटावयाची आस ग माझी
मिठीत माझ्या तू येशील का ।

काळे मोकळे केस तुझे ग
हळूच बटांना सारशील का ।
होतील उष्ण श्वास माझे
मिठीत माझ्या तू येशील का ।

साद माझ्या या हृदयातली
सांग तुला ग कळली का ।
धडधड होते उरात माझ्या
सांग मिठीत तू येशील का ।

चल जाऊ या दूर गगनात
सोबत तिथे तू चलशील का
स्वप्न कराया पूर्ण एकदा
मिठीत माझ्या तू येशील का ।
Sanjay R.

" जाग माणसा जाग "

जाग माणसा जाग
किती तुझा राग ।

अंतरात तुझ्या आग
विवेक थोडा माग ।

सय्यमाने रे वाग
माणुसकीला लाग ।

सोड वासनेचा माग
नको लावूस रे डाग ।

जाग माणसा जाग
प्रेम आयुष्याचा भाग ।
Sanjay R.

Tuesday, February 11, 2020

" राधेचा रे तू कृष्ण "

सांग रे कान्हा तुज
काय तुला मी म्हणू ।
गोपाळ तुज मी म्हणू
की रे मनमोहन म्हणू ।
देवकीचा रे पुत्र तू की
यशोदेचा लाल मी म्हणू ।
सुदामाचा रे मित्र तू की
अर्जुनाचा सारथी म्हणू ।
गोपिकांचा रे तू प्रियवर
की राधेचा रे प्राण म्हणू ।
रे कन्हैय्या बसरीवाला तू
तूच राधा कृष्ण मी म्हणू ।
प्राणेश्वर तू सरवात्मा तू
चित्तयोगी परमात्मा म्हणू ।
Sanjay R.

" काय तुझा गुन्हा "

काय तुझा गुन्हा
दिसणार नाहीस पुन्हा
पेटवून गेला तो
हैवान आहे जुना ।

हो अंबा तू आहेस दुर्गा
राहू नकोस अशी शांत ।
मालवून जळती ज्योत
होऊ नकोस निवांत ।

ओठातली हाक तुझ्या
पडू दे सगळ्यांच्या कानात ।
पेटून उठू दे ज्वाळा आता
ठेव निखारे अंतरात ।

दे वाट त्या वेदनांना
घे टेम्भा एक हातात ।
टाक सम्पवून दुष्ट सारे
नको नावनिशान आसमंतात ।
Sanjay R.

" कलंक "

तू माणुसकीला रे कसा
आहेस एक कलंक ।

सम्पवलेत किती रे आजवर
तू असेच जीवनाचे अंक ।

वासने पाई तुझ्या रे गाठला
तू क्रूरतेचा उच्चांक ।

हो माणूस तू आतातरी
नको कोरुस माथ्यावर कलंक ।
Sanjay R.

Saturday, February 8, 2020

" माझा मीच हसतो "

गर्दी असो वा मी एकटा
नसता कुणाची सोबत
करतो मी संवाद मग
माझ्याच मनाशी ।

काल्पनिक ते सारे
चित्र उभे होते पुढ्यात
त्यात ठेवतो मी मलाच
सगळ्यांच्या मधात ।

मनाला माझ्या हवं तसं
आणतो घडवून सारं
आणि सहजच हसतो
आपल्याच मनात ।

उघडते दार आनंदाचे
वेचतो क्षण जीवनाचे
अनुभव तोही आगळा
दिवस जातात मग सुखात ।
Sanjay R.

Friday, February 7, 2020

" हो माणूस तू त्यात तुझा रे प्राण "

रे माणसा किती तू महान
वेगळा तू हे तुझे रे ज्ञान ।
बुद्धिवंत तू विचारीही तू
लौकिक तुझा ती तुझी शान ।
मेहनतीने तुझ्या रे बघ
केलेस तू पालथे सारे रान ।
वेळेस तू प्रगती पथावर
आरोग्य तंत्रज्ञान विज्ञान ।
मात्र कधी का ते असा
सोडतोस तू आपले भान ।
विकून होतोस मोकळा
स्वतःचाच मान आणि सन्मान ।
करून घात तू माणसाचाच
विकतो कसा ते आपलेच इमान ।
खून बलात्कार हिंसाचार
फडकवतो यातच तू निशान ।
बदल रे थोडा तरी आता
हो माणूस तू त्यात तुझा रे प्राण ।
Sanjay R.

" हिवाळ्यातली ती रात्र "

एक अंधारी रात्र
असावी अमावसेची ।
आकाशात चांदण्या
दाटीवाटीने बसलेल्या ।
मधेच एखादा काजवा
चमचम करत निघून जातो ।
थंड गार वातावरणात
दूर एक शेकोटी पेटतेय ।
दूर असूनही तीची
मनाला जाणवत होती ऊब ।
मधेच कुठेतरी झाडावर
फडफड व्हायची पक्षाची ।
रातकिड्यांचा आवाज
शांततेला बसू नव्हता देत स्वस्थ ।
अशीच निघाली रात्र आणि
मग दिली कोंबड्यांने बाग सूर्याला ।
हळूच अवतरला सूर्य
आणि सरले साम्राज्य अंधाराचे ।
Sanjay R.

Wednesday, February 5, 2020

" एकच प्याला "

अशी कशी रे ही दारू
सवयीचा तू गुलाम झाला ।
उठून सक्काळी कसा
हवा तुला रे एकच प्याला ।

घरदार शेती वाडी गेले सारे
संसाराचाही घात झाला ।
एक घुट पिण्यासाठी रे
भीक मागायचा दिवस आला ।

विनाशाचा मार्ग तुझा
डोक्यात तुझ्यारे अंधार झाला ।
कळेल कधी सांग तुला
यमराज तुझ्या रे दारी आला ।
Sanjay R.

Tuesday, February 4, 2020

" गरीब आमचे गाव "

गरिबी जिथे वसते
ते असते गाव ।
सुविधांचा तर असतो
नेहमीच तिथे आभाव ।

मोडक्या तोडक्या जागी
जमिनीवर चाले शाळा ।
मास्तर नाही आले तर
उघडतच नाही ताळा ।

नाही डॉक्टर दवाखाना
गळा पकडतो आजार ।
गरज पडली तरी बघा
नसतो कशाचा बाजार ।

फाटकं तुटकं घालायचं
कसं तरी पोट भरायचं ।
दिवसभर शेतात काम
मरेस्तोवर करायचं ।

थंडी असो वा पाऊस
आडोशाला निजायचं ।
सरेल दिवस तेव्हा ना
चटकन तसच मरायचं ।
Sanjay R.

" ओळख अनोळखी झाली "

ओळख तुझी माझी
बघ जुनी किती ती
अनोळखी आता झाली ।

मान बाजूला करून तू
आजच दूर तू
का ग अशी निघून गेली ।

आठव तो दिवस परत
होता नजरानजर जेव्हा
काळीज तू घेऊन गेली ।

मोह परत बघण्याचा
सांगून मनास माझ्या
ओढ किती तू लावून गेली ।

मनात भावना माझ्या
व्याकुळ अजूनही तशाच
साऱ्याच उलथून गेली ।

लावू नको परत आता
हुरहूर या जीवाला
पालवी प्रेमाची सरून गेली ।
Sanjay R.

" कशी ही अंधश्रद्धा "

श्रद्धा हीच आमची
या जीवनाचा पाया ।
अंधश्रद्धा आमची
जाते जीवन वाया ।

श्रद्धे विना काय उरते
पुढ्यात मोह माया ।
राग लोभ द्वेष मत्सर
अंतरातल्या छाया ।

पळापळ चाले नुसती
थांबते कुठे काया ।
सारून दूर जायचे
सुखी जीवन कराया ।
Sanjay R.