Wednesday, November 30, 2022

कसा हा गारवा

कसा हा गारवा
झाली थंड हवा ।
निसर्गाने ओढला
नव रंग नवा नवा ।
दूर तिथे आकाशात
दिसे पाखरांचा थवा ।
चिव चिव त्यांची जशी
वाटे वाजतो पावा ।
Sanjay R.


पोटाची आग

भुकेचा उसळला डोंब
कळली पोटाची आग ।
चौत कोर पोळीसाठी
होते किती भागम भाग ।

कष्टासाठी पुढे येती हात
सोसतो कुणाचाही राग ।
झेलतो किती शब्दांचे वार
असतो तो सर्स्वाचा त्याग ।

अन्न पाणी अन् निवारा
गरजांचा घेतो मी माग ।
अंताचा होतो अनंत
विझते कुठे ती आग ।
Sanjay R.


झालो मी शून्य

तुझा असेल जो निर्णय
असेल मलाही तो मान्य ।
चला रे उचला मिळेल ते
घेऊन गेले सारे धन धान्य ।
बघतच राहिलो त्यांच्याकडे
कोण बोलणार तिथे अन्य ।
शब्दात पकडले त्यांनी मज
म्हणणार कसे मज हे अमान्य ।
सहजच गेलो बोलून मी सारे
आता बघा नजर झाली शून्य ।
Sanjay R.

Tuesday, November 29, 2022

अपेक्षा

नाही उत्तराची अपेक्षा
नको प्रश्नाचा अनर्थ ।
मनच कुठे उरले आता
त्यासी न कशाचा स्वार्थ ।

सारखा चालतो विचार
शब्दांचे जुळावितो अर्थ ।
जीवनाची हीच व्यथा
ऐकतो हाक ती आर्त ।
Sanjay R.


निर्णय

आली निर्णयाची घडी
संपलेत विचार आता ।
सुचेना मनास काही
डोळ्यापुढे जन्माची गाथा ।

नकळे काही मजला
सांगू कुणास माझी व्यथा ।
नशिबाशी जुळली आहे
जीवनाची ही दीर्घ कथा ।

गरिबिशी गाठ इथे
श्रीमंत कोण आहे दाता ।
पैशाचेच आहे मोल
ठरवते पैसा सारी प्रथा ।
Sanjay R.


होईल प्रभात

एक वाट सुखाची
झाड प्रेमाचे त्यात ।
नाही दुःखाची छाया
फक्त हवे खुले हात ।

बघ वळून मागे
आहे तुलाही साथ ।
संपेल हा अंधार
मग होईल प्रभात ।

टाळू नको तू दुःख
ती सुखाची सुरुवात ।
दुखा पाठी येते सुख
मग होते बरसात ।
Sanjay R.


असत्य कुठे लपवू

सत्य किती शांत
हसते ते गालात ।
ना कुणाची भीती
नाही काही मनात ।

निर्विकार ते असे
दिसे साऱ्यास क्षणात ।
उजळून होई स्पष्ट
मिरवेल चार चौघात ।

असत्याला लपवू कुठे
दिसे ते कणा कणात ।
जगणेच होते कठीण
ठेवू कुठल्या गुणात ।
Sanjay R.


असत्याचा बोलबाला

शोधू कुठे मी सत्य
होतो जरी विजय ।
पराजयाची झाली सवय
मन आतच जळतंय ।
असत्याचा बोलबाला
वाटे तोच अजय ।
विचारांना लागली कीड
मनास कुठे कळतंय ।
Sanjay R.


विजय

असत्य कसे जिंकेल
होईल सत्याचा विजय ।
सत्यवचनी सदा असे
पदोपदी तोच अजय ।
असत्याला कुठे आसरा
होतो त्याच्या पराजय ।
त्रिलोकी फडके निशाण
सत्याचाच होई विजय ।
Sanjay R.


सुरुवात

आरंभ म्हणू की प्रारंभ
सुरुवात हीच असते ।
वेळ काळ हवा थोडा
मग तर सारेच सरते ।
विचारांना नाही सीमा
सर्वस्व तिथेच हरते ।
अंत कुठे कसा थांबतो
माप ऐक दिवस भरते ।
Sanjay R.


Monday, November 28, 2022

ऊन असते खायला

ऊन असते खायला
थंडी थोडी प्यायला ।
गर्मी व्हायला
आणि हवा द्यायला ।

नको बाकी काहीच
वेळ होतो जायला ।
शिव्या द्यायच्या तर
म्हणा च्या आयलां ।

सुंदर असेल दिसायचं
तर या फक्त पाहायला ।
गालावर दिसेल खळी
येईल मग हसायला ।
Sanjay R.

Thursday, November 24, 2022

मन अधीर

मन होते अधीर
नजर भिर भिर ।

माझे माझे करी
ठेव थोडा धीर ।

लढाईत सैनिक सारे
सारेच इथे वीर ।

जगण्याची ही लढाई
चल करू नको उशीर ।
Sanjay R.


आरंभ तिथे अंत

आरंभ तिथे अंत
आहेच कोण कोण निवांत ।
मार्ग सत्याचा हवा
विचार साऱ्यांनाच  अनंत ।
जगा आणि जगू द्या
मनात नसेल कुठली खंत ।
Sanjay R.


स्वप्नाचा असर

ते गावाच्या अगदी बाहेर
निर्जन जागी ऐक घर ।
आजूबाजूला दाट जंगल
होता रात्रीचा तो प्रहर ।

अमावस्येची रात्र काळी
वातावरणात वेगळाच स्वर ।
मधेच फडफड पाखरांची
वाटले मज यतोय कोणी अधर ।

काळी ती छावि लोंबता झगा
हसण्याचा आवाजात जोर ।
अंग माझे मग कापू लागले
आभास की  स्वप्नाचा असर ।
Sanjay R.


भूत

भूत मनातली भीती
घाबरतात सारे किती ।
अमवसेला येतात म्हणे
का असते तीच तिथी ।

भूत म्हणजे निव्वळ भ्रम
नकोच ते शोधण्याचे श्रम ।
विचारांनी च लागतो रोग
जातो त्यातमाणसाचा दम ।
Sanjay R.


माणसाचा आला अंत

नशिबाने घेतले वळण
गरीब झाला श्रीमंत ।
पैशाला नाही किंमत
कोणी झाला संत ।
युद्धाचे वादळ इथे
माणसाचा आला अंत ।
रक्ताचा वाहतो पाट
नाही कुणाला खंत ।
Sanjay R.


Monday, November 21, 2022

नशिबाचा खेळ न्यारा

नशीबच असते असे
वळण त्यात किती कसे ।
वर खाली मागे पुढे
रस्ता सरळ कधीच नसे ।

दुःखाचा कधी येतो पूर
कधी कुणासाठी मन आतुर ।
आसवांचा वाहतो लोट
काळाकुट्ट समोर धूर ।

हळुवार पावलांनी येते सुख
कशाची तरी मनात रुख रूख ।
मोह माया अनेक ज्वर
संपता संपेना मग भूक ।

नशिबाचा खेळच न्यारा
अचानक येतो कधी वारा ।
होत्याचे नव्हते होते
उडून जातो सारा पसारा ।
Sanjay R.


संधी

मिळते कुठे परत परत
संधी चे करावे सोने ।
डोक्यात नको विचार
द्यावे सोडून जुने ।
Sanjay R.


असा कसा रे माणूस

असा कसा रे देवा
तू बनविला माणूस ।
लोभी लबाड किती
चांगला कसा म्हणुस ।

अंतरात त्याच्या क्रोध
जसा जळता निखारा ।
नाही त्यास थोडे मन
वाटे कोराच चुकारा ।

कळेना काय मनात
नारीचा नाही त्यास मान ।
सदा दिसे विचारात
करी स्वतःचा अभिमान ।

मन त्याचे किती कठोर
आवाजात त्याच्या दहाड ।
कष्टाला नाही येत मागे
फोडतो दगडाचा पहाड ।

असेल कुऱ्हा जर मनात
तर जुळेना त्याची नाळ ।
देऊनी साऱ्यासी आधार
करतो घराचा सांभाळ ।

बाप म्हणून मिरवण्या
झेलतो किती तो प्रहार ।
माणसासारखा माणूस
नाही कधी मानत हार ।

डोळ्यात नाही अश्रू
दणकट त्याची छाती ।
मावळ तो होतो जेव्हा
काय उरते त्याच्या हाती ।

शब्दाला देतो तो मान
पाळतो देऊनही प्राण ।
मिळेल कुठे असा माणूस
खोदा किती जरी खाण ।
Sanjay R.


चला गाऊ अभंग

चला गाऊ अभंग
मन होईल हो दंग
विठ्ठल नमाचा गजर
भक्तीचा तिथे रंग ।
सोबतीला वाजे जसा
तालावरती मृदुंग ।
भास होतो जणू
हरी आहे संग संग ।
चला गाऊ अभंग
मन होईल हो दंग ।
Sanjay R.


पूर्ण करील मी स्वप्न तुझे

आई करील मी पूर्ण
सांग काय स्वप्न तुझे ।
आहे माझे एकच स्वप्न
प्रेम हवे मज तेच तुझे

लहानाचे मोठे करण्या
विसरलीस तू तुझे स्वप्न ।
चिंतेत माझ्या सदा होतीस
राहिलं ग स्वतःला जपणं ।

झेलल्या तू हाल अपेष्टा
रात्रीही जागून काढल्या ।
खाणे पिणे शिक्षण माझे
इच्छा साऱ्या तू सोडल्या ।

तुझ्यामुळेच झालो मोठा
सरले आता तुझे ते कष्ट ।
बघ शांतीने तू जग सारे
होऊ नकोस मजवर रुष्ट ।

तुझ्याविना मी होईल पोरका
सोडू नकोस मज क्षणभर ।
हवा मला ग तुझाच आधार
ऋण तुझेच आहे मजवर ।
Sanjay R.


आईचा धावा

आईचे असे एकच स्वप्न
बाळ व्हावे मोठे लवकर ।
शिक्षणात त्याचा नंबर यावा
नोकरीतही रुबाब मिळावा ।
म्हातारपण मग सुखात जावे
सुन बाईने पण मान द्यावा ।
सुखासाठी ती करते धावा
मुलाला सुखात राहू दे देवा ।
Sanjay R.


संजीवनी

जीवदान देई संजीवनी
आस जगण्याची मनी ।
हवा कुणाला मृत्यू सांगा
अमर ही नाही इथे कोणी ।
बिघडता तंत्र स्वास्थ्याचे 
करी उपाय संजीवनी  ।
Sanjay R.


देह झाला आडवा

झाले घाव मनावर
बाण शब्दांचे टोचले ।
जखम भरता भरेना
दुःख हृदयात साचले ।

डोळ्यात अश्रूंची गर्दी
गालावरून ओघळले ।
ओठ गेलेत मिटून
शब्द गळ्यात दाटले ।

सुचेना काही कशाचे
विचार जागीच हरले ।
श्वास हळुवार झाले
छातीचे स्पंदन सरले ।

देह झाला आडवा
त्राण न कशात उरले ।
डोळे मिटून मी आता
पाय देवाचे धरले ।
संजय R.


थंड हा वारा

गार गार थंड हा वारा
अंगावर येतो शहारा ।
ऊन सकाळचे निघता
वाटे हवा उन्हाचा सहारा ।

दिवस हिवाळ्याचे आले
निसर्गाने रूप नवे ल्याले ।
हिरव्या हिरव्या पानातून
फुल पाकळी नवरंगी झाले ।

क्षणात येऊन गेले उडून
फुल पाखरू ते आले कुठून ।
मोहक पंख रंग वेगळा
क्षण आनंदाचा घेतो लुटून ।
Sanjay R.

Saturday, November 19, 2022

हवेत संस्कार

नको कशाचा विचार
सगळेच तर इथे लाचार ।
कोणी देतो होकार
कुणाचा असतो नकार ।
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
हेच तर जीवनाचे प्रकार ।
नाही कुठला आकार
नाही कुठला उकार ।
नसले काही तरी चालेल
पण हवेत थोडे संस्कार ।
Sanjay R.


थंडी

हलकी फुलकी थंडी गुलाबी
कळलेच नाही झाली प्रभात ।

तोंडावरून घेतले पांघरुण
सोडवेना मज अंथरुणाची साथ ।

गार पाण्यात हात बुडवता


गारठली बोटं थरथरले हात ।

बोजड झाली जिव्हा कशी ती
ओठातूनही बोल निघेना ।

गरम चहाचा कप घेऊनी
थंडीचा का साथ सुटेना ।
Sanjay R.


Friday, November 18, 2022

राधा

तू हो राधा
होईल मी कृष्ण ।
कली युग हे
आहे थोडा प्रश्न ।

राधा
प्रिया कृष्णाची ।
कृष्ण
बघतो वाट गोपीची ।

गोपी कुठे गोकुळात
काय तिचा थाट ।
कृष्ण सोडून सारे
विसरतो मग वाट ।

कुठे मथुरा
कुठे वृंदावन ।
शोधती कृष्ण
सारे गोकुळ जन ।

बदलला कृष्ण
बदलली राधा ।
मार्ग प्रेमाचा
नाही साधा ।
Sanjay R.


Thursday, November 17, 2022

डॉक्टर

ताप असो वा खोकला
किव्वा असो दुर्धर आजार ।
पर्याय कुठे हो डॉक्टर ला
होतो आपणच बेजार ।

असेल दार मरणाचे जिथे
होतो डॉक्टर तिथे हजर ।
आणि परतून प्राण तिथून
लागते मृत्यू ला ही नजर ।

सेवा भाव धर्म त्यांचा
असतो सदा ते सादर ।
बघतो त्यांच्यात मी देव
करू किती मी आदर ।
Sanjay R.


देवदूत

डॉक्टर म्हणजे देवदूत
देतो जीवन संजीवनी ।
आजारातून करतो बरे
आशा जगण्याची मनी ।

बिछाण्यावर असता रोगी
वाटतो डॉक्टरचा आधार ।
यातनातून सोडवतो जेव्हा
मानतो त्या देवाचे आभार ।
Sanjay R.


कोण इथे परका

इथे कोण परका
आहे कोण वारीस ।
आई बापच करतात
मुलांची परवरिश ।

भरले आभाळ की
होते ना बारिश ।
डोळ्यात येतात अश्रू
नाही कुणाची साजिश ।

जवाबदार कोण याला
घेऊ कुणाचे मी नाव ।
संस्कार चालले सुटत
आपलेच तर देतात घाव ।
Sanjay R.


संगोपन

बाळाचे करता संगोपन
वेळही पुरेना ।
होते धावपळ किती
कष्ट कुणा कळेना ।
बाळ रडते जेव्हा
हृदयाची तुटते तार ।
आईच्या प्रेमाचा मी
सांगू किती सार ।
किंमत तिच्या दुःखाची
म्हातारपणी मिळते ।
आसव असतात डोळ्यात
दुःखात तीच जळते ।
Sanjay R.


सांभाळ

कसा करायचा सांभाळ
जाऊन आईला विचारा ।
बाबाही सांगतील सारे
जरी असेल त्यांचा दरारा ।

लहानाचे केले मोठे
किती झेलल्या यातना ।
रात्री किती जागून काढल्या
दिल्या का कोणी सांत्वना ।

तिचेच आता म्हातारपण
नको झाले लेकाला ।
करे धाडले वृद्धाश्रमी
पोचलास का टोकाला ।
Sanjay R.


बदलेल ना पिढी

कशी असेल सांगा
पुढची ती पिढी ।
वेगळीच असेल ना
त्यावेळची ती घडी ।

आई वडिलांपासून दूर
स्वतः चे वेगळे घर ।
नको म्हातारे घरात
असेल का हाच स्वर ।

दोघांचा असेल संसार
तिसऱ्याचा होईल भार ।
नसेल प्रेम माया मनी
आपले पणाचाच विचार ।

सुख सुविधा असतील
नसेल कशाची कमी ।
आठवण येऊ नये म्हणून
आई वडिलांचे डमी ।
Sanjay R.


विचारात पडतो फरक

विचारात पडतो फरक
बदलते जेव्हा पिढी ।
पडतात मागे थोड्या
जुन्या काही रूढी ।
वागतो वाटेल तसे
माणूस असतोच मुडी ।
माझेच सारे बरोबर
म्हणतो उभारून गुढी ।
Sanjay R.


पुढची पिढी

निसर्गाचा नियमच आहे
जुने जाणार नवे येणार ।
आजवर तेच घडले
पुढेही तेच घडणार ।
पिढी मागून पिढी जातील
वेळ कुठे थांबणार ।
वेळे सोबत धावायचे
सांगा मीही नाही हरणार ।
Sanjay R.


बालदिनाच्या शुभेच्छा

छोटा मी बालक
छोटे छोटे हात ।
होईल जेव्हा मोठा
गाजविल प्रताप ।

स्वप्न माझे मोठे
मोठा आहे ध्यास ।
आई बाबा तुमचा
तोडणार नाही विश्वास ।

पुस्तकात आहे प्राण
घ्यायचे सार ज्ञान ।
ऐक दिवस माझाही
वाटेल तुम्हा अभिमान ।

मीही करील कष्ट
नाव होईल माझे
जीवनभर सांभाळील
आई प्रेम हवे तुझे ।
Sanjay R.
बालदिनाच्या शुभेछा


नको आशा होते निराशा

नको कुणाची आशा
ठरलेलेच आहे होते निराशा
मार्ग आहेत अनेक
हवी कशाला दिशा ।
बस एकदा निघायचे
आपोआप ठरते दशा ।
प्रेम असो वा तिरस्कार
कळते तीही भाषा ।
साधे सरळ मन हवे
नको कुठली नशा ।
Sanjay R.


मनावर हवा साय्यम

मनावर हवा संयम
क्रोध नाही कामाचा ।
जमलेले मग बिघडते
भुर्दंड पडतो दामाचा ।
Sanjay R.


प्राणीच बरे

माणसापेक्षा प्राणी बरे
प्रेम त्यांच्यात किती खरे ।
माणूस तर झाला लोभी
वागणे त्याचे हो नाही बरे ।
Sanjay R.

घर प्रेमाचे मंदिर

घर प्रेमाचे मंदिर
कुटुंबाचा तोच आधार ।
पमनात एकच विचार
प्रेम जीवनाचा सार ।
Sanjay R.


मूक प्रेम

मूक प्रेम म्हणता
चाले सारे मनात ।
कळेल कसे समोरच्यास
व्यक्त व्हायचे साक्षात ।
मिळेल तुम्हास ही मग
प्रत्यय क्षणा क्षणात ।
मूक प्रेमास नाही अर्थ
दिसायला हवे स्वप्नात ।
प्रेम केले जरी थोडे
कुणा ठेवू नका ऋणात ।
Sanjay R.


गाय वासरू

गाय हंबरते वासरासाठी
वासरू व्याकूळ आईसाठी ।
मनुष्य असो वां असो प्राणी
प्रेमाची तर एकच कहाणी ।
Sanjay R.


वल्हवितो नाव

रडतो बाळ जेव्हा
निरागस त्याचे भाव ।
डोळ्यात नसतात अश्रू
कळेना मनाचा ठाव ।
कधी हसतो गालात
त्याची असते कुठे धाव ।
हलवतो पाय जोरात
जसा वल्हवितो नाव ।
Sanjay R.


चंद्र हसतो गालात

वर बघतो तिथे मी
निळे निळे आकाश ।
चंद्र चांदणी येताच
होतो काळा प्रकाश ।

चमचमते चांदणी
चंद्र हसतो गालात ।
गगनात चाले खेळ
रात्रीच्या अंधारात ।

हळूच येतो वारा 
सळसळ होते झाडात ।
रातकिडे देई साद
होते धड धड मनात ।
Sanjay R.

निरागसता

तुझी हीच निरागसता
मनात घर करून गेली ।
माझा मी न उरलो आता
तहान भूकही तूच नेली ।
Sanjay R.


Monday, November 14, 2022

तान्हे बाळ

कधी हसे खुदकन
भाव निरागस बाळाचे ।
उघडुन डोळे दोन्ही
घेई दर्शन मग जगाचे ।
नाही ठाव कशाचा
कळेना काही मनाचे ।
लगता भूक जराशी
उठे सुर रडण्याचे ।
Sanjay R.


अनोखे नाते

आहे कसे हे सांग नाते
वाटे आम्हा हे जग खोटे ।
सोडले असे तू अधांतरी
तुझ्यासाठी रे काय मोठे ।

आई बापास तू विसरला
सांग फेडणार आमचे ऋण ।
संस्कार दिले तुला चांगले
घेतले कुठून असेल दुर्गुण ।

म्हातारपणी लागतो आधार
केला कसा रे तू विचार ।
त्याग विसरलास का आमचा
केले आम्हा असे लाचार ।

वृद्धाश्रमास या केले घर
सुखाचा तू कर संसार ।
जगू मरू आम्ही इथेच
नको करु आमचा विचार ।
Sanjay R.

चार ओळी

चार शब्दांच्या ओळी
हव्या मज तुझ्या
त्यास प्रितचा दे गंध
ठेवील हृदयात माझ्या
Sanjay R.


Saturday, November 12, 2022

प्रवास

जनमापासून सुरू इथे
आयुष्याचा प्रवास......

आहेत मार्ग अनेक
फक्त मनात हवा ध्यास.....

प्रवासात या
जगणे फार कठीण.......

असेल मरण सोपे
पण होते तेही कठीण.....

जन्मापासून अंतापर्यंत
येतात अनेक टप्पे......

जगणण्याच्या या शर्यतीत
रोजच भोगायचे धक्के.....

आई बाबा ताई दादा
काका मामा आत्या......

आजी आणि आजोबा
किती किती ही नाती....

प्रत्येक टप्प्यात लाभतात
मित्र मैत्रिणी सोबती.....

सगळी नाती संभाळण
आहे किती कठीण....

मन जुळले तर
घट्ट होते नात्याची विण....

परिश्रमाने इथे मिळतो
मान आणि सन्मान.....

पैश्या शिवाय होते काय
सगळ्यांचे असते तिकडेच ध्यान....

करत पैसा पैसा जगायचे
सोडून सारे शेवटी असेच मरायचे...

नको तो लोभ
क्रोध मोह मत्सर नकोच ती तऱ्हा...

माया ममता प्रेम
हवा वात्सल्याचा झरा.....

सखे सोबती
मिळतात इथे खूप....

मोजकेच असतात त्यात
ओळखा त्यांचे रूप.....

काही सुटतात नवीन मिळतात
प्रवास चालतो निरंतर.....

जुने जाणार नवे येणार
पडत नाही अंतर .....

हसत हसत जगायचे
दुःख मागे सारायचे.....

दुखाविना सुख नाही
दुःखही हसत जगायचे......

बालपण सोपे इथे
आई बाबा देतात हात...

तारुण्याची हवाच न्यारी
मिळते तिथे सोबतीची साथ....

येकाचे होतात दोन
बांधून एकमेकांशी गाठ....

दोनचे जेव्हा होतात चार
जवाबदारी मग धरते पाठ.....

जगणे मरणे तिथेच कळते
जीवनाची लागते वाट....

रात्र सरते दिवस उजाडतो
ती असते नवी पहाट.....

हळू हळू मग दिवस जातात
वार्धक्याची मिळते साद....

कठीण असतो हा प्रवास
माणूस ठरतो इथेच बाद....

आयुष्यभराचे चित्र डोळ्यात
विचार असंख्य असती मनात....

नको नको वाटे साऱ्यास
धावा करतो ने क्षणात.....

अंत यात्रा असते कठीण
उरते तिथे क्षीण काया....

उतरतिचा तोच काळ
का सरते तेव्हाच माया......

लढण्याचे जेव्हा नसते बळ
नियती गाठते आपला तळ....

लेक मुलगी करी दुर्लक्ष
भोगतो स्वतः स्वतःचा छळ....

दिवस येतो अंत्यविधीचा
चार सोबती घेई खांद्यावर....

अग्निचा तिथे डोंब उसळतो
देती सोडून मध्यावर.....

प्रवासाचा होतो अंत
सोडून जातो इथेच सारे...

भस्म होते शरीर नश्वर
राख उडते येताच वारे....

Sanjay R.