Monday, November 21, 2022

नशिबाचा खेळ न्यारा

नशीबच असते असे
वळण त्यात किती कसे ।
वर खाली मागे पुढे
रस्ता सरळ कधीच नसे ।

दुःखाचा कधी येतो पूर
कधी कुणासाठी मन आतुर ।
आसवांचा वाहतो लोट
काळाकुट्ट समोर धूर ।

हळुवार पावलांनी येते सुख
कशाची तरी मनात रुख रूख ।
मोह माया अनेक ज्वर
संपता संपेना मग भूक ।

नशिबाचा खेळच न्यारा
अचानक येतो कधी वारा ।
होत्याचे नव्हते होते
उडून जातो सारा पसारा ।
Sanjay R.


No comments: