Monday, November 21, 2022

असा कसा रे माणूस

असा कसा रे देवा
तू बनविला माणूस ।
लोभी लबाड किती
चांगला कसा म्हणुस ।

अंतरात त्याच्या क्रोध
जसा जळता निखारा ।
नाही त्यास थोडे मन
वाटे कोराच चुकारा ।

कळेना काय मनात
नारीचा नाही त्यास मान ।
सदा दिसे विचारात
करी स्वतःचा अभिमान ।

मन त्याचे किती कठोर
आवाजात त्याच्या दहाड ।
कष्टाला नाही येत मागे
फोडतो दगडाचा पहाड ।

असेल कुऱ्हा जर मनात
तर जुळेना त्याची नाळ ।
देऊनी साऱ्यासी आधार
करतो घराचा सांभाळ ।

बाप म्हणून मिरवण्या
झेलतो किती तो प्रहार ।
माणसासारखा माणूस
नाही कधी मानत हार ।

डोळ्यात नाही अश्रू
दणकट त्याची छाती ।
मावळ तो होतो जेव्हा
काय उरते त्याच्या हाती ।

शब्दाला देतो तो मान
पाळतो देऊनही प्राण ।
मिळेल कुठे असा माणूस
खोदा किती जरी खाण ।
Sanjay R.


No comments: