Friday, September 30, 2022

इच्छा पूर्ण

होतात  इथे कुणाच्या
पूर्ण इच्छा  सर्व ।
काय नको मनाला
हवे दिसेल ते सर्व ।

इच्छा तर असंख्य
काहीच होतात पूर्ण ।
म्हणू नका त्यासी
सारेच ते अपूर्ण ।

हवे थोडे भान
मनाला समाधान ।
मिरवता येते मग
वाटते त्यातच शान ।
Sanjay R.


आईचे लेकरु

आई जणू प्रेमाचा सागर
सागर माय नि मी  लेकरु
लेकरु जसे खेळे पाखरू
पाखरू उडले एक दिस
Sanjay R.


डॉक्टर सई

सई एका वेगळ्या व्यक्तिमतवाची वेगळ्या विचारांची, काहीतरी वेगळं करण्यासाठी धडपडणारी स्त्री. लहानपणातच तिची आई गेली. तिने आईला बघटल्याचे तिला आठवतच नाही. त्यावेळी ती अगदीच लहान होती फक्त दोन वर्षांची. आबानीच तिला मोठे केले. त्यांच्या साठी ती त्यांची जीव की प्राण होती.
आई ची माया तिला आबाकडूनच मिळाली. आबांचे संस्कार तिच्या नसानसात भिनलेले होते.
आबांनी हे सांगितलं तर हे असंच करायचं. अंबानी हे असं करायचं नाही म्हणून सांगितलं तर ते मुळीच नाही करायचं. हे तिच्या मनात अगदी ठाम बसलेले होते. त्यामुळे कुणाला ती जिद्दी वाटायची. पण तीच जिद्द तिचा एक सगुण होता. 
लहानपणी ती गावात येणाऱ्या डॉक्टरांना बघायची. ते आजारी लोकांना औषध उपचार करून बरे करायचे. लोकही डॉक्टरांचे आभार मानायचे. त्यांना आपला देव मानायचे. सन्मान द्यायचे. तिला ते खूप छान वाटायचे. मग तिलाही वाटायचं आपणही डॉक्टर व्हायचं या गोर गरीब लोकांचे उपचार करायचे. त्यांना आनंद सुख द्यायचा. त्यांच्या साठी आपणही देवदूत व्हायचे.
सई जसजशी मोठी होत होती तसतसी तिची ती आत्मिक इच्छा आणखीच दृढ होत गेली. आणि मग ती एक निष्णात डॉक्टर व्हायला शहरातल्या मोठ्या मेडिकल कॉलेज ला दाखल झाली. अभ्यासात हुशार असल्यामुळे तिला अगदी सहज ऍडमिशन मिळाली आणि तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
शहरात शिकायला आल्या नंतर ती साधी भोळी सई थोडी बावचळल्या सारखी झाली. गावात वेढलेली सई तिला ते शहरी वाटेवर जर वेगळंच वाटलं. तशातच तिच्या सोबत शिकत असलेला विकी , त्याचे सोबत तिची ओळख झाली. विकी त्याचे ते टोपण नाव होते, त्याचे नाव विक्रांत भाऊसाहेब देशमुख होते. पाहायला उंच पुरा, अगदी रुबाबदार अशी त्याची पर्सन्यालिटी होती. पण बोलायला तितकाच शांत होता. आवाजात गोडवा होता. दया माया, इतरांचा सन्मान हे गुण त्याच्यात पूर्ण भरलेले होते. त्याला तिने रागावलेला किंवा चिडलेला कधीच बघितले नव्हते. त्याची ही आई त्याच्या लहानपणीच सोडून गेली होती. तोही आपल्या बाबांच्या प्रेमातच मोठा झाला होता. सई आणि विक्रांत दोघांची ओळख झाली. ती पण एक वेगळीच कहाणी आहे. एक दिवस क्लास सुरू होता. प्रॅक्टिकल ला जाण्यासाठी म्हणून सरांनी दोन दोन ची एक अश्या बॅचेस पडल्या. त्यात सई आणि विक्रांत दोघांची एक बॅच झाली. मग त्यातच दोघांची ओळख, मग मैत्री आणि त्यातूनच दोघांचे प्रेम झाले. दोघेही सुस्वभावी. दोघांचे खूप जमायचे. त्यांची झालेली ती जोडी अगदी कॉलेज च्या शेवट पर्यंत सोबत होती.
दोघांनीही मग एम एस ला पण सोबतच ऍडमिशन घेतली . शिक्षण सम्पवून नोकरी पण सोबतच जॉईन केली.
पण सई आपले उद्दिष्ट मात्र विसरली नव्हती. तिला आपल्या गावातल्या गरीब लोकांची सेवा करतायची होती. ते तिने एक दिवस विक्रांत जवळ बोलून दाखवले. विक्रांतला तिचा तो निश्चय खूप आवडला. त्यांनी मग ठरवले की रविवारी दोघांनाही सुटी असायची. तर दर रविवारी गावात जाऊन निशुल्क सेवा द्यायची. 
आज त्यांचा गावाला जायचा पहिलाच रविवार होता. सकाळी उठून तयारी करून दोघेही बाईकनेच गावकडे निघाले. सोबत काही औषधे इंजेक्शन वैगेरे घेतले होते. 
सई च्या आबांना त्यांच्या या उपक्रमा बाबत काहीच कल्पना नव्हती. ते त्यांना बघून चकित झाले. पण दोघांचा निषकय ऐकून. त्याना खूप आनंद झाला. त्यांचे डोळे भरून आले . डॉक्टरांच्या इलाजा अभावीच त्यांच्या पत्नीचा म्हणजे सईच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मनात ती गोष्ट नेहमीच खटकत असायची. सई डॉक्टर झाली आता आपले स्वप्न पूर्ण होईल याची त्यांना खात्री होती. पण सई त्याची अंमलबजावणी कधी करेल हे तीन माहीत नव्हते. आणि सईला, तू गावातल्या लोकांचा पण इलाज करायला गावात येत जा असे सांगणे त्याना जमले नाही. पण त्यांची पोरच इतकी सुसंस्कृत आणि शहाणी होती की त्याना तिला तसे सांगायची गरजच पडली नाही. 
आता गावातल्या लोकांच्या आशा जगल्या होत्या. त्यांचा आजारात इलाज करणार कोणी तरी त्याना विचारत होत. अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावत होत. त्याना समजून घेणारं त्यांच्यातलंच कोणी हक्कच त्याना मिळालं होतं.
हाच परिपाठ मग वर्षोन गणती चालत राहिला.
Sanjay R.

फक्त पुढे जायचे

जायचे पुढेच पुढे
नाही साथ कुणाची ।
क्षितिजा च्या पलीकडे
जाते वाट ही आयुष्याची ।

दगड धोंडे मढेच येती
पार करायच्या अडचणी ।
झेलायचे घाव सारेच
जखमा होतील क्षणोक्षणी ।

माघारीचा नाही रस्ता
फक्त पुढे चालायचे ।
एक दिवस होईल संध्या
तोवर आपण जगायचे ।
Sanjay R.


अनंत यात्रा

एकट्याचीच ही यात्रा
कोण असतो सोबतीला ।
जन्मदाती ती आई
पुरते कुठे जन्मला ।

जन्मभर मग चाले फेरा
सह प्रवासी भेटे वाटेला ।
जुना सुटतो नवा जुळतो
थांम्बतो कोण जीवनाला ।

नाती गोती सारी मिथ्या
असतो कोण शेवटाला ।
चार जण देतात सोडून
जातो एकटाच अंताला ।
Sanjay R.


भटकंती

एकट्याने कुठे जायचे
कामानिमित्त निघायचे ।
काम सम्पताच मग
टाईमपास भटकायचे ।
ठरले नसते काहीच
रस्ता नेईल तिकडे जायचे ।
पाय थकले की थांबायचे
करून थोडा पोटोबा
परत मग निघायचे ।
भटकण्यात जातो वेळ
अनुभव गाठी बांधायचे ।
Sanjay R.


मुखवटा

बघू नको हे खोटे हास्य
त्यामागे आहेत आसवं ।
खोटा मुखवटा मिरवतो
आहे इथे सारंच फसवं ।
Sanjay R.


Monday, September 26, 2022

फाटका पसारा

दुःख बघायला जरा
गरीबा घरी जावे ।
दुखातही हसतो तो
त्याच्या संसारास बघावे ।

दुःखाचे घेऊन ओझे
जगतो रोजचा दिवस ।
घरात नसतो दाना
करेल कशाचा नवस ।

कुणी असतो आजारी
सदा असतो कर्जबाजारी ।
औषध डॉक्टर कुठे
नसतो मदतीला शेजारी ।

रोज तिथे उपवास
संथ चालतात श्वास ।
चार भाग होतात
असेल जर एक घास ।

अंगात फाटक्या चिंध्या
त्यावर निघतो आज ।
तेच तर उरले आता
बाळगू कुणाची लाज ।

डोक्यावर कुठले छत
येतो ऊन पाऊस वारा ।
ठिगळ लावून सरले
उरला फटका पसारा ।
Sanjay R.


वेदना झाली रीती

मनातले दुःख
मनातच असू दे ।
चेहऱ्यावर मात्र
मला तू हसू दे ।

दुःखाला असते
कुणाची साथ ।
पाठीवर नाही
कुणाचा हात ।

आसवांची काय
किंमत इथे ।
डोळ्यातच असे दे
जिथले तिथे ।

फाटले हृदय तरी
हुंदका नको गळ्यात ।
निर्विकार असू दे
मज चार चौघात ।

माझे मीच झेलील
दुःख असू दे किती ।
वेदना आतली
झाली आता रीती ।
Sanjay R.


दोष नशिबाचा

हसतो मी सदा
दुःख जरी मागे ।
बंद डोळयांत अश्रू
डोळे उघडे जागे ।

देतो कोण हो साथ
नाही मदतीची आशा ।
कुणास काय तुमचे
देतील फक्त निराशा ।

भोग भोगेले कोण
दोष हा नशिबाचा ।
सहन करतो सारे
प्रहार तो प्रारब्धाचा ।

लपलेले दुःख सारे
कुणास हवा पुरावा ।
फक्त जाणतो देवच
करतो त्याचाच धावा ।
Sanjay R.


यश अपयश

जीवनात नशीबाचा जोर
कुणी गरीब कुणी थोर ।
जिद्द चिकाटी हवी थोडी
मेहनतीची ही हवी जोड ।
प्रयत्नाची ही हवी साथ
कष्टाची तर नाहीच तोड ।
नको मग चिंता कशाची
फळ मिळते गोड गोड ।
यशाचाही गर्व नकोच
लावू नका कशाशी होड ।
Sanjay R.


व्यवसाय

काय कसला व्यवसाय
वाटतो जसा अन्याय ।
जेव्हा तेव्हा पकडा
ग्राहकांचेच हो पाय ।
लोकांना पटवणे कठीण
खरेखोटे सांगा काय काय ।
चालतो दिवसभर सदा
हा नेहमीचाच व्यवसाय ।
उरतात चार पैसे तेव्हा
प्रश्न पोटाचा हाच हाय ।
Sanjay R.


कामाची कशाला लाज

कामाची कशाला लाज
डोक्यावरती चढतो साज ।
स्वकष्टाला किंमत फार
उद्या करायचे ते करा आज ।
कर्म हाच तर धर्म आहे
मनास वाटतो त्याचाच नाज ।
Sanjay R.


कर्तव्याची जाण

कर्तव्याची असता जाण
कामाची असे कुठे वाण ।
थकून भागून येता घरी
घरातही हो मिळतो मान ।
Sanjay R.


आभार

मानतो मी आभार
केला चुकीचा स्वीकार ।
स्वप्न नव्हते माझे
झाले तरी साकार ।
ठरवलेच कुठे काही
नव्हता कशाला आकार ।
कळेचना काय हे
कुठला हा प्रकार ।
गुंतलो विचारात जर
सारे झालेची बेकार ।
चुकीला माफी नाही
मानतो मी आभार ।
Sanjay R.


अमावसेचा साज

भरून आकाश ढगांनी
सूर्य वेढला त्यात ।
दिसेना आहे कुठे तो
दिली सावलीने साथ ।

वारा थोडासा गार
नाही पावसाची धार ।
वाहे इकडून तिकडे
होऊन झाडावरती स्वार ।

मधेच जातो डोकावून
रवी राज त्या नभातून ।
सायंकाळ होत आली
हसेल चांदणी गालातून ।

मैफलीत नसेल चन्द्र
अमावसेचा दिवस आज ।
होईल उदास मग चांदणी
देईल रात्रीला तिचा साज ।
Sanjay R.


Saturday, September 24, 2022

राहिले अजून बाकी

नको ते घडले
झाली मोठी चूक
जीव धडधडतो
होते धुक धुक ।

कसे कुणास ठाऊक
कसे काय घडले ।
रस्ताच चुकलो नि
काम सारे अडले ।

प्रत फिरायचे आता
तेही हाती न उरले ।
जीवनाच्या शेवटाला
दिवसच किती उरले ।

राहिले अजून बाकी
खूप होते करायचे ।
जगू द्या अजून जरा
नाही आत्ताच मरायचे ।

पाहता पाहता गेले दिवस
काहीच न कळले ।
मनातले विचार सारे
मनातच हो जाळले ।
Sanjay R.


तेच अस्त्र

चला काढू या
विशेष शस्त्र ।
अंतिम क्षणाला
तेच तर अस्त्र ।

नसतो इलाज
शेवटचा पर्याय ।
यश अपयश
कशाचे काय ।

होताच संघर्ष
काय परिणाम ।
डोळ्यात अश्रू
नाही विश्राम ।
Sanjay R.


मंदी

आली हो आता
जागतिक मंदी ।
हळूच येईल
कशा वर बंदी ।
उठा उठा आता
सोडा ही धुंदी ।
मान नका हलवू
होऊ नका नंदी ।
वाढेल महागाई
बंद मग चंदी ।
आली आता हो
जागतिक मंदी ।
Sanjay R.


प्रहार

शास्त्रांचे किती प्रकार
देते शक्ती होतो प्रहार ।

शस्त्रा विना विजय नाही
पराजयाच्या दिशा दाही ।

तोंडाने पण होते काम
बाण शब्दांचे काढते घाम ।

विध्वंसाला देई शस्त्र साथ
घडतो तिथे मग रक्तपात ।

लढाईचे परिणाम काय
अनाथांची लागते हाय ।
Sanjay R.


शक्ती

शब्दाइतकी कशात शक्ती
वेगळी प्रवृत्ती जितक्या व्यक्ती ।
असे कोणी असा धार्मिक
चाले त्याची सदा भक्ती ।
कुणास असे इतकी चिंता
हवी त्याला नुसती मुक्ती ।
जीवनाचा हा मार्गच कठीण
पैशाची आहे इथे आसक्ती ।
करू नका हो छळ कुणाचा
पडेल उघडी सारी युक्ती ।
Sanjay R.


मस्ती

हॉस्टेल म्हणजे घर नव्हे
चालते नुसती दंगा मस्ती ।
अभ्यासाचे ढोंग सारे
पोरा पोरांचीच तिथे वस्ती ।
Sanjay R.


हॉस्टेल

हॉस्टेल चे जीवन कसे
वाटे कसे ते स्वच्छंद ।
पण बंधने तिथे फार
नसतो कुठलाच आनंद ।
जेवणाचे होतात हाल
वाटते खावे याहून कंद ।
द्यावे सोडून सारेच नि
टाकावे तोडून सारे बंध ।
Sanjay R.


फ्री चा जमाना

फ्री चा हो आता
आला हा जमाना ।
काम न करता हवा
साऱ्यांनाच खजाना ।

मिळाले फुकट जर
वाटते लॉटरी लागली ।
खर्च करून नकोच
सवय लागली चांगली ।

नसेल फुकट मिळत तर
लाचेचा काढतात दंडा ।
जिकडे तिकडे मिरवतो
फ्री रेवडीचा आता झेंडा ।

सांगतो आता सुधारा सारे
जगायचा एकच रस्ता ।
समोरच्याचा कापा खिसा
ठेवा पैशाशीच वास्ता ।
Sanjay R.

स्वप्नात मॉल

स्वप्न बघितले काल
लागली मला लॉटरी ।
काय करावे सुचेना
म्हटलं टाकावी फॅक्टरी ।

कारखान्याचा मालक मी
कामगारांनी वेढले ।
सुचेना मला काहीच
स्वप्न ते मी सोडले  ।

थाटामाटात गेलो मी
मोठ्या एका मॉल मध्ये ।
भरपूर केली खरेदी
पैसेच नव्हते खिशा मध्ये ।
Sanjay R.


लॉटरी

नशिबात नाही जोर
लॉटरी कशी लागेल ।
कष्टविना मिळेना काही
मेहनतीनेच नशीब जागेल ।

सहज मिळाले आयते तर
त्यास असतो एक धोका ।
किंमत नसते मग कशाची
घडतात आयुष्यभर चुका ।

कष्टविना सुख नाही
त्यातच मन होते प्रसन्न ।
आत्मचिंतन करून बघा
वाटेल तुमचे तुम्हास धन्य ।
Sanjay R.


मन गगनात घेते भरारी

क्षणात इथे तर
क्षणात असते तिथे ।
गगनात घेते भरारी
पोचते हवे तिथे ।
मधेच येते फिरून
नसेल कोणी कुठे ।
नाही अंत कशाचा
पचते मन तिथे ।
Sanjay R .


Tuesday, September 20, 2022

मनाचे रंग किती

मनाचे रंग किती
आहे किती गती ।
भ्रमण चाले सारे
नाही कुणाच्या हाती ।
अनंत त्याचे रूप
सखा तो सोबती ।
क्षणात देई सुख
पेटवी दुःखाच्या वाती ।
अभंगाचे होता भंग
दुरावते नाती गोती ।
Sanjay R.


फिकीर नाही कशाची

फिकीर नाही कशाची
काय अवस्था मनाची ।
काळजी म्हणू की चिंता
नाही कुणास जनाची ।
Sanjay R...

तुटतं मन

दणका दिल्याशिवाय
सांगा एकतं कोण ।
रोज रोज आपणच बोला
त्यांच्याकडे नसतो क्षण ।
एक घाव दोन तुकडे
असंच मग तुटतं मन ।
आकांत तांडव होईल आता
गाजेल मग सम्पूर्ण रण ।
Sanjay R.


तुझाच आभास

बघताच तुला
मन भटकलं ।
नजरेत तुझ्या
मला बघितलं ।

विचारांच  भूत
डोक्यात शिरलं ।
विचार तुझेच
मनही हरलं ।

प्रेमाची ती आस
तुझेच आभास ।
विसरलो कसा
माझाच मी श्वास ।

ओढ आता तुझी
शोधतो तुलाच ।
हरवली कुठे
छळते स्वप्नात ।

बघू किती वाट
छळू नको अशी ।
जाऊ चल दूर
देईल मी खुशी ।
Sanjay R.


जीवन एक अध्याय

सांगू मी कोण काय
जीवन एक अध्याय
जन्म होताच म्हणतात
पाळण्यात दिसतात पाय ।
एकेक परत जाते निघत
जीवन दुधावरची साय ।
बाल्य तारुण्य गृहस्थ वृद्ध
जीवनात मिळते एकच माय ।
खेळ अभ्यास सरते जेव्हा
पैशासाठी कष्ट हाय हाय ।
वृद्धत्व तर कठीण फार
दिवस रात्र मोजण्यात जाय ।
नकळत मग येतो दिवस
तोवर सारेच करा ट्राय ।
Sanjay R.


गुलाब फुलाला

कसे कसे ते दिवस
कशातच नव्हता रस ।
एकाकी होते जीवन
मन असायचे नर्व्हस ।

गाठभेट कुठे कुणाशी
भीतीचा होता आभास ।
सहन नव्हते होत काही
मोजायचे नुसते श्वास ।

सुन्न व्हायचे डोके
कशावर नव्हता विश्वास ।
कढाच वाटायचे अमृत
अडकायचे तोंडात घास ।

नको परत ते तसे दिवस
जगण्यात होता कुठे रस ।
हसतो खेळतो आता सारे
गुलाबाने फुलाला परस ।
Sanjay R....


लॉक डाऊन

परत नको त्या आठवणी
नकोच परत ते तसे दिवस ।
माणसांची दिसली बहु रूपे
दुखाचाच होता तो प्रवास ।
घरात होते बंद सारेच
माणसाला माणसाचा ध्यास ।
शिकलो सारेच आम्ही
दुःखात सुखाचा होता प्रयास ।
Sanjay R....


ओंजळीत मावेना धारा

वाटे थोडा गार गार
वाहतो कसा वारा ।
दर्शन नाही सूर्याचे
पडला त्याचा पारा ।
झाकले आभाळ सारे
उठे कळ्या ढगांचा नारा ।
गगनात चमचमते वीज
गडगडाट देतो इशारा ।
झमाझम पडतो पाऊस
ओंजळीत मावेना धारा ।
Sanjay R.


विचार

नको आता विचार
सगळेच इथे लाचार ।
जरासा धीर धरा
होईल चांगल्याचा प्रचार ।
Sanjay R.



कळी

फुलेल कधी कळी
बघू किती मी वाट ।
फळलेल्या फुलाचा
बघायचा मज थाट ।
Sanjay R...


नजर अंदाज

नजर अंदाज ना करना
दिल यु ही नही धडकता ।
नजर से नजर मिलाना
आखें सब बया करती है ।
Sanjay R.


मनात वादळ किती

मनात वादळ किती
दे जरा हात तू हाती ।
सहज पार होईल सारे
संकटांची नाही भीती ।
Sanjay R.


Saturday, September 17, 2022

कोरोना काळ

कठीण होता तो
कोरोना काळ ।
जणू फाटले होते
वरती आभाळ ।
उठवसे वाटेना
झाली जरी सकाळ ।
सतत जीवाचा होता
नुसताच छळ ।
खिडीतूनच हो
बघायचो आभाळ ।
वाटायचं रोजच जणू
पडते का गळ्यात माळ ।
मीच बघायचो मला
दिसताच दूर जाळ ।
परतलो सुखरूप
शिजली आपली डाळ ।
म्हणतात लॉकडाऊनने
बरेच जन्मले बाळ ।
पण कठीणच होता हो
कोरोनाचा काळ ।
Sanjay R.


Wednesday, September 14, 2022

आवड

आहे एक माझी आवड
पण मिळते कुठे सवड ।
सांग शोधू कुठे आता
करू कशी मी निवड ।
ठरवतो मी मनात काही
पण असते ते अवघड ।
पूर्णत्वाला नेणं सारं
आहे किती हो जड ।
पोकळ थापा साऱ्या
असते नुसती बडबड ।
चुकले मुकले की मग
होते सारीच गडबड ।
Sanjay R....

एक होती राणी

होती एक राणी
नाव तिचे चांदणी
राजा होता चन्द्र
त्याची ती दिवाणी ।
अवकाश तिचे साम्राज्य
सोबतीला मंगळ शुक्र शनी ।
रडायची  ती ढगाआडून
पृथ्वीवर पाणी पाणी ।
अंधारात ती महाराणी
उजेडाला नसे कोणी ।
Sanjay R......


राजा राणी

संसार हा माझा
मी राजा ती राणी ।
सुख आणि आनंदाची
आहे ही कहाणी ।
साम्राज्य जरी माझे
करते तीच पहाणी ।
नजर करील कोण वाकडी
फिरेल त्याच्यावर पाणी ।
प्रत्येकाच्या संसारात
राणीच असते ज्ञानी ।
म्हणून घरोघरी चालते
गॉड मधुर गाणी ।
Sanjay R....


कोहिनुर

इंग्लंडची ती महाराणी
जगभरात तिचे साम्राज्य ।
एक शतकाचे तिचे वर्चस्व
एकाच क्षणात सरले ।
इतिहास झाली ती आता
बघा जीवनापुढे हरली ।
भारताचा कोहिनुर मुकुटात
आयष्यभर तिने मिरवला ।
घेऊन गेली काय सोबत
हक्क भारतीयांचा हिरावला ।
Sanjay R.


स्वप्न मरणाचे

धडधड कोसळतो पाऊस
जिकडे तिकडे थैमान पुराचे ।
घराघरात पोचले पाणी
हाल किती हो जगण्याचे ।
होते नव्हते सारेच बुडाले
करू काय आता शेताचे ।
करू कसा मी संघर्ष आता
दिसते स्वप्नही फक्त मरणाचे ।
Sanjay R....


संघर्ष

संघर्षा विना सुख नाही
कष्टा विना भूक नाही  ।
पेटते आग मनामनात
कशात तेवढे दुःख नाही ।
Sanjay R.


भूल

आठवते ती पहिली भेट
नजरेस मिळाली नजर ।
पडली डोळ्यांना भूल नी
माझा मलाच पडला विसर ।
Sanjay R....


Monday, September 12, 2022

आकाशाला कुठे अंत

आकाशाला कुठे अंत
क्षितीज ही कती अनंत ।
दाटते आभाळ काळे
वारा सोबतीला संथ ।
बरसतात पाऊस धारा
धारा मात्र असते शांत ।
मिलनाचे ते क्षण कसे
कोण कुठे असे निवांत ।
Sanjay R....


तू आणि मी

तेव्हा कधी तरी एकदा
वारा अगदीच होता शांत ।
तू आणि मी दोघेच तेव्हा
बसलो असेल निवांत ।

त्यादिवशीचा तो  आपला
असेल पहिलाच एकांत ।
बोलायला नव्हते सुचत
शब्दही झाले होते संथ ।

सहजच मग बोलून गेलो
कशाला बघतेस तू अंत ।
बोल मनातलं तुझ्या काही
बाळगू नकोस तू खंत ।

बोलणे तूच सुरू केलेस
बाकी अजूनही ते अनंत ।
तेच शब्दांचे होते मिलन
संपूच नये आता अंता पर्यंत ।
Sanjay R....


Sunday, September 11, 2022

पावसाने केला गोंधळ

पावसाने केला गोंधळ
थांबायलाच नव्हता तयार ।
जिकडे तिकडे पाणी पाणी
पडत होती नुसती धार ।
थकून गेलो घरात बसून
कंटाळा  हो आला फार ।
रविवार पूर्ण गेला वाया
मनात राहिले मनातले विचार ।
Sanjay R....