Monday, September 26, 2022

अमावसेचा साज

भरून आकाश ढगांनी
सूर्य वेढला त्यात ।
दिसेना आहे कुठे तो
दिली सावलीने साथ ।

वारा थोडासा गार
नाही पावसाची धार ।
वाहे इकडून तिकडे
होऊन झाडावरती स्वार ।

मधेच जातो डोकावून
रवी राज त्या नभातून ।
सायंकाळ होत आली
हसेल चांदणी गालातून ।

मैफलीत नसेल चन्द्र
अमावसेचा दिवस आज ।
होईल उदास मग चांदणी
देईल रात्रीला तिचा साज ।
Sanjay R.


No comments: