Friday, August 30, 2019

" बैल "

कशाला करतो रे
कष्ट तू राजा ।
धावपळ सारी
नशिबात रे तुझ्या ।
बैल म्हणतात तो
हाच का रे आज्या ।
नाही मर्यादा
कामाला रे तुझ्या ।
सदाच जुतलेला
बैला तू माझ्या ।
सण तुझा पोळा
कर आराम गज्या ।
बैल म्हणून जग
हीच तुझी सज्या ।
Sanjay R.

" सण आज पोळा "

सण बैलांचा पोळा
वर्षातून एकच वेळा ।
बसता तुतारीचा ढोस
होते कशी पळा पळा ।
नाकात वेसण त्याच्या
बसतो मानेला पिळा ।
पोळ्याच्या दिवशी मात्र
लावती सारेच टिळा ।
कष्ट जन्मभर वाट्याला
राबून पिकवतो मळा ।
इमान धन्याशी राखतो
सण त्यासाठी हा पोळा ।
Sanjay R.

Thursday, August 29, 2019

" खेळ भावनांचा "

भावनांचा खेळ हा सारा
आकाशात कुठे एकच तारा ।

कधी वाहतो सोसाट्याचा वारा
तर कधी बरसतात धारा ।

भिजायचं होऊन स्वच्छंदी
वेचायच्या आनंदात गारा ।
Sanjay R.

Tuesday, August 27, 2019

" वृद्धाश्रमच्या वाटेवर "

ठाऊक कुणास आता
माणसाचे माणसाशी नाते ।
कुणी येतो जन्माला
कुणाची यात्रा बघा दूर जाते ।

भावनांची कदर कुठे
जगायचे म्हणून जगतो आता ।
देवही नसतो सोबतीला
विसरतो कसा रे माता पिता ।

बाळपणी तू होता निरागस
आता किति रे मोठा झालास ।
थांबव थोडे दिवसांना बघ
नको बोलवू म्हातारपणास ।
Sanjay R.

" मोगरा अंगणात फुलला "

ढगांनी वेढलं आकाश
सूर्याचा नाईलाज झाला ।
प्रकाशानं काढला मार्ग
दिवस उजेडून आला ।
पक्षांनी केली किलबिल
काळोखावर आघात झाला ।
मंद हवेची झुळूक घेऊन
झोके देण्या वारा आला ।
मंद धुंद सुगंध घेऊन
मोगरा अंगणात फुलला ।
दवबिंदूंच्या थेंबासंगे
काट्यातला गुलाब बहरला ।
Sanjay R.

" नशिबाचा खेळ सारा "

नशिबाचा खेळ सारा
येईल कधी कुठून वारा ।
काळ्या रात्री अंधारात
उजळेल मृत एक तारा ।
जगभर होईल कीर्ती
लखलख परिसर सारा ।
निरभ्र आकाशातून मग
बरसती कौतुकाच्या धारा ।
Sanjay R.

" भावनांची गाथा "

बघतो मी डोळ्यात जेव्हा
जाणतो अंतरातली व्यथा ।
ओठ होतात मग निशब्द
वाचतो भावनांची गाथा ।
बोल शब्दांचे तुझ्या अनमोल
घेतो टिपून हृदयात मी खोल ।
आठवणींची जेव्हा होते उकल
घेऊन आधार सांभाळतो मी तोल ।
Sanjay R.

" जन्माष्टमी "

जन्माष्टमी च्या शुभेच्छा

" कष्ट "

आयुष्यभर माणसाला
करावे लागतात किती कष्ट ।
मागेच लागून असते
भूक पोटाची किती ती दुष्ट ।

टीचभरच ना हे पोट
भूक बघा ही त्याची किती ।
तरी इच्छेचा महासागर तो
नेहमीच असते ना ती रीती ।

आयुष्यभर करून कष्ट
होते शरीराची किती क्षती ।
लाभते म्हातारपण मग
आणी सोसवत नाही गती ।
Sanjay R.

Friday, August 23, 2019

" अपराध घोर "

हाती ज्याच्या दोर
लावतो तो जोर ।

होतो मग चोर
अपराध कुठे घोर ।

घेतो मिरवून आणि
होतो मोठा थोर ।

गरिबास हवी असते
भाकरीची एक कोर ।

पोटासाठी होता चूक
पडतात उघडी पोरं ।
Sanjay R.

Thursday, August 22, 2019

" कळी उमलली "

अंगणात माझ्या
एक कळी उमलली ।
हसून सांगते कानात
मुद्दामच आज फुलली ।
विसरू नको रे तू
जरा बघ कशी खुलली ।
जीवनात तुझ्या सांग
स्थान तिचे अनमोल ।
अंतरात डोकावून बघ
तरंग आठवणींचे खोल ।
Sanjay R.

Wednesday, August 21, 2019

" जगण्याला कुठले कारण "

जगण्यासाठी कुठे
असते कुठले कारण ।
रोजच तर जगतो
येईल कसे मरण ।
दुःखात शोधत आनंद
बांधू सुखाचे तोरण ।
मार्ग सत्याचा धरुनी
पुढे जायचे धोरण ।
बहू अडचणी जीवनात
करायचे पार चरण ।
सिद्धी कार्याची होता
येईल सुखाचे मरण ।
Sanjay R.

" माझा विकएंड "

रविवारी वीकएंड साठी माझ्या शेतावर गेलो तर शेतात हरीण दिसले आणी मोबाईलचा कॅमेरा सहज ऑन झाला..

Tuesday, August 20, 2019

" यवतमाळ साहित्य मंच "

" पाणी पाणी झाली धरती "

पावसाच्या वाटेवर
होती नजर वरती ।
आला उशिरा किती
पाणी पाणी झाली धरती ।
घरदार बुडाले पाण्यात
वाहून गेली स्वप्न सारी ।
दिवस मोजता मोजता
जीवनच झाले भारी ।
नाही आडोशाला छत
पावसाने केली गत ।
कसा दिवस कशी रात
उरले पाणी ओंजळीत ।
Sanjay R.

Monday, August 19, 2019

" नाही अशा खोटी "

अजूनही आहे
मनात माझ्या आशा ।
कोण म्हणतय
येताहेत ज्या लाटा
साऱ्याच निराशा ।
भरती नंतर असते
सागरात ओहोटी ।
हवा थोडा सय्यम
नाही आशा खोटी ।
सुर्यास्ता नंतर जरी
होते काळी रात्र ।
सुर्योदया नंतर
सूर्याचे एक छत्र ।
जीवन हाही आहे
एक अथांग सागर ।
सुख दुःखाच्या लाटांतून
भरायची आपली घागर ।
संपणार नाही ही वाट
पुढे अजून जायचे ।
जगता जगता अलगद
आनंद त्यातले वेचायचे ।
Sanjay R.

Sunday, August 18, 2019

नजर दूर वाटेवर


फडफड तनात होते
तडफड मनात होते ।

काळजास चाहूल होता
धडधड उरात होते ।

नजर दूर वाटेवर
मनही आतुर होते ।

क्षण अधीर होता
डोळ्यात पूर येते ।
Sanjay R.

Saturday, August 17, 2019

" माझी कविता "

मनात माझ्या तू
सांगू कसे तुला ।
छळतेस किती कशी
स्वप्नात तू मला ।

आहेस तू कविता
शब्दांची तू सरिता ।
आहेस तूच मनात
म्हणून
फुलते ही कविता ।

श्रावणातली सर तू
क्षणात दूर जाते ।
परी अंतरात माझ्या
आठवण तुझीच राहते ।

भिजून चिंब धरा ही
हिरवे गीत गाते ।
पूर आठवणींचा बघ हा
नेत्राच्या कडेतून वाहते ।
Sanjay R.

" हवा गुलाबाचा संग "

रूप आणि रंग
हवा गुलाबाचा संग ।
मन मोहरले माझे
गुलाबात मी दंग ।

काय कुणाचा छंद
होतो मोगराही धुंद ।
कळी गुलाबाची झुले
संगे वारा वाहे मंद ।

सलतो काटा मनात
राहूनही तो झाडात ।
करून मन मोकळे
जाते सल क्षणात ।
Sanjay R.

Friday, August 16, 2019

" आव्हान "

पेलवत नाही आता
मनालाच मनाचे आव्हान ।
क्षणातच निसटून जाते
आणि गुंतते कुठेतरी भान ।
काळ होता तो एक
आठवण म्हणजे होती एक शान ।
अभ्यासाचे मात्र कसे सांगू
बुद्धीलाच ते आहे सारे ज्ञान ।
पुढ्यात पेपर येताच कसे
आठवायचे नाही पुस्तकाचे पान ।
निकाल पत्र बघून मग
स्वतःच स्वतःचा करायचो अपमान ।
कधी वाटत बरच आहे
विसरण्याची कलाही
नाही इतकी आसान ।
कधी त्यातूनही पूर्ण होतात
हवेत ते सारे अरमान ।
Sanjay R.

Thursday, August 15, 2019

यवतमाळ साहित्य मंच काव्य सम्मेलन

15 ऑगस्ट 2019 ला यवतमाळ येथे आयोजित काव्य सम्मेलनात मी माझी कविता सादर करताना

स्वतंत्रता आणि रक्षाबंधन दिन

सर्व मित्र मंडळीस स्वतंत्रता दिवस आणि रक्षा बंधन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
" वंदे माँ तरम "

Wednesday, August 14, 2019

" तुझ्यात देव "

भक्ती करतो, करतो पूजा
सांगा कुठे हो आहे देव ।

भाव मनात माझ्या त्याचा
नाही मज कुणाचे भेव ।

असेल नसेल मंदिरात तो
श्रद्धा, विश्वास निरंतर ठेव ।

कर्ता करविता तोच आहे
अंतरात बघ तू तिथेच देव ।

माणसातला तू माणूस होऊन
जिवंत थोडी माणुसकी ठेव ।

तूच होशील माणूस असा की
दिसेल तुजला तुझ्यात देव ।
Sanjay R.

Tuesday, August 13, 2019

" नाही उरलं जहर "

झिम झीम पावसानी
केला किती कहर ।
नद्या नाले भरले
रस्त्यावर आले नहर ।
पाणीच पाणी झाले सारे
डुबले मोठ्ठाले शहर ।
घर दार पैसा गेला
नाही उरले जहर ।
हात मदतीचा हवा आता
तेव्हाच येईल घराला बहर ।
Sanjay R.

Monday, August 12, 2019

" सत्य जीवनाचे "

मृत्यू सत्य जीवनाचे
नाही कुणाच्या मनाचे ।
जन्मसोबत बांधलेले
रहस्य हे आयुष्याचे ।
जाई घेऊन नकळत
क्षण त्यात सुख दुःखाचे ।
जगला जो आनंदाने
दुःख त्यासी कशाचे ।
सत्याचा मार्ग ज्याचा
नाव अलौकिक त्याचे ।
जगला सरला काय उरला
मार्ग सारे जीवनाचे ।
Sanjay R.

" सपना अपना "

कोई एक हो अपना
नही वह कोई सपना
खुशबू जीसकी साथ
दिलही जाने दिलकी बात
महक उठे सारा आसमान
कैसे होगा दिल अनजान ।
Sanjay R.

Saturday, August 10, 2019

" नही दूर तुम "

नही तुम दूर हमसे
हो बसे दिलमे हमारे ।
जी चाहता जब मिलनेका
याद करते सपने सारे ।
खुशीयोके वो सारे पल
आखोमे बसे सारे नजारें ।
मीले राहत दिलको और
करे दिल दिलको इशारे ।
Sanjay R.

Friday, August 9, 2019

" दोस्तायची दोस्ती "

अंगत झाली पंगत झाली
दिसभर दोस्तायची मले
भाऊ मस्त संगत झाली

उखाने झाले पाखाने झाले
शायेतल्या जमान्यांचे मंग
तश्शेच सारे धिंगाने झाले

हरिक होता सर्यायलेच
मारामारी भांडणायचे
किस्से गाऊन झाले

निंगा म्हने आता सारे
घरी जाचा वकत आला
तोंडं सऱ्यायचे सुकून गेले ।

दोस्तायन दोस्तायले
हात हलवून जाय जाय केले ।

Sanjay R.

Thursday, August 8, 2019

" तूच माझी प्रीत "

कळतंय मला तुझं गं
माझ्यावरचं हे रुसणं ।
डोळ्यात माझ्या बघत
गालातल्या गालात हसणं ।
मलाही वाटत थोडं
असच तू थोडं रुसावं ।
हसताना गालावर तुझ्या
त्या गोड खळीला बघावं ।
आकाशातून सरसर येणाऱ्या
पावसात थोडं भिजावं ।
गरम गरम चहा आल्याचा
पीत हितगुज थोडं करावं ।
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये
प्रीती ला थोडं फुलवावं ।
घेऊन तुझा हात हातात
मनाला हळुवार झुलवावं ।
प्रीत माझी ग तूच प्रिये
तुझ्या विना नाही रंग ।
सोडू नकोस कधीच मला
हवा मला तुझाच संग ।
Sanjay R.

Wednesday, August 7, 2019

" सरसर सरी "

सरसर सरसर
कोसळतात सरी ।
रात्र नशिली आणि
सोबतीला तुं गं परी ।

झाले धुंद तनमन
वाटे घ्यावे धुंद भिजून ।
अलगद टिपून घ्यावे
थेंब ओठावरचे अजून ।

हात घेऊन हातात
कवेत तुजला घ्यावे ।
वाटे रेशमी स्पर्शात
एकरूप तुझ्यात व्हावे ।
Sanjay R.

Tuesday, August 6, 2019

" पाच ऑगस्ट 2019 नवा इतिहास "

अखंड माझा हा भारत
काश्मीर ते कन्याकुमारी ।
फडकला तिरंगा आता
उत्साह फुलला दिशा चारी ।

स्वप्न गेलेत तुटून त्यांचे
नवाबी थाटात जगणे ज्यांचे ।
आतंक दहशत वादच सम्पला
सांडवू रक्त आता घुसखोरांचे ।

सुजलाम सुफलाम देश आमचा
काश्मीर आमचे नंदनवन ।
हसेल बगडेल सारेच आता
लाल चौकात फुलवू वृन्दावन ।
Sanjay R.

Monday, August 5, 2019

" गारुडी "

मांडायचा जेव्हा गारुडी
नागोबाचा खेळ।
काळायचंच नाही मग
गेला किती वेळ ।
साप मुंगूस ची लढाई
आमिष तो दाखवायचा ।
उत्सुकता इतकी मनात
त्यातच तो भुलवायचा ।
फणा काढलेला नाग
पुंगी च्या नादावर डोलायचा ।
दाखवून भीती गारुडी
खिशातले पैसे काढायचा ।
दर्शन देऊन नागाचे
धोपटी आपली भरायचा ।
मुंगूस सापाची लढाई
मुद्दामच तो विसरायचा ।
Sanjay R.

Sunday, August 4, 2019

" मित्र महान "

मैत्री म्हणजे विश्वास
नेहमीच मित्रांचा ध्यास ।
मैत्री जीवनाचा आधार
नाही वाटत कशाचाच भार ।
मैत्री म्हणजे आपलेपणा
अशक्य सारेच मित्रांविणा ।
मित्र म्हणजे मोठी हिम्मत
दूर झाल्यावर कळते किंमत ।
मित्र आयुष्यातले सुख
जाणवणार नाही दुःख ।
मित्र आठवणींचा भाग
आठवतात येताच जाग ।
मित्रांविना हलत नाही पान
मैत्री मित्रांची खरच महान ।
Sanjay R.

Friday, August 2, 2019

" हो विवेकी थोडा "

हो तू थोडा विवेकी
मी होईल आशावादी ।
ठेवुनी चित्त शांत
विवेक करील कार्य ।
अशांत होशील जेव्हा
मिळेल तुलाच धैर्य ।
होशील तू विजयी
आशावाद माझा ठाम ।
मनोकामना पूर्ण होतील
विवेकाचे हेचि काम ।
Sanjay R.

" दूर कितना है ये चांद "

आदत से हु मजबूर मै
करना चिंता बस मेरा काम ।
लोग क्यू हसते बहोत
धुंडता हसी मै सुबह शाम ।
दूर कितना वह चांद बताओ
धरती पर भी है एक चांद ।
गीन पाया कौन बताओ
तारे गगनके और सूरज चांद ।
खुशीयोसे ना दूर रहो तुम
बिखरा है यहा कितना प्यार ।
जिंदगी सुख दुःख का सागर
राही हम सब , करना पार ।
Sanjay R.

Thursday, August 1, 2019

" करू नका त्रागा "

करू नका मुळीच चिंता
शांत चित्ताने थोडे जगा ।
कर्म आणि कष्ट तुमचे
देणार नाही कधीच दगा ।
संतुलन मनाचे राखा
हसतमुखाने थोडे बघा ।
राग जीवनाला घातक
त्याविना कामाला लागा ।
सर्वस्व हाती तुमच्या
नका करू अति त्रागा ।
किल्ली यशाची तुमच्यापाशी
आनंदानी थोडे वागा ।
Sanjay R.