Monday, April 30, 2018

अंतरात तु

मनात माझ्या आहेस तु
क्षणो क्षणीच्या भासात तु ।

वाटे सदा मजला असे
अंतरात आहेस माझ्याच तु ।

छळेल कसा मी सांग तुज
आहेस स्वप्न माझेच तु ।

शब्द माझे नाहीत तीर
मनातली ती भावना तु ।

तू तर आहेस माझी राधा
वेड मजसी लविलेस तु ।

सांग कधी कळेल तुजला
आहेस माझ्या काळजात तु ।

तोडून सारा हा दुरावा
ये कवेत सखे माझ्याच तु ।

फुलव मोगरा अंगणात माझ्या
भिजव मजला त्या गंधात तु ।
Sanjay R.

चमक डोळ्यातली

डोळ्यांत चमक भावनांची
आणि हास्याची लकीर गाली ।

अवतरले शब्द झर झर
बघ कशी ही कविता झाली ।

माझ्या निराकार मनात आज
आठवणींनी किती गर्दी केली ।

अवती भवती दारवळला सुगंध
गुंतल्या मोगऱ्यात बेधुंद वेली ।

डोकावून पाहण्या आकाशी
निळ्या काळ्या ढगांची गर्दी झाली ।

तुझ्यातच एक व्हायचं म्हणून
सरही हलकेच धाऊन आली ।

तू आणि मी बस दोघंच आपण
रात्र पुनवेची चांदण्यात न्हाली ।
Sanjay R.

Friday, April 27, 2018

रंग काळा

रंग असो गोरा वा काळा
भावनेला रंग निळा निळा
मनास वाटे जावे आभाळा
टिपून घ्यावा रंग जांभळा
होऊन जावे कृष्ण सावळा
Sanjay R.

उन्हाच थोडं पायजा

पायता पायता
दिस आला जोळ ।
चला अकोल्याले
करू नोका घोय ।

शर्टा प्यांट
कायले तू घेत ।
वर्हाडी पेहेराव
पायजेन तेथ ।

चला आता बिगी बिगी
लागा रस्त्याले ।
उन्हाच थोडं पायजा
न्हाई त घोर होईन जीवले ।
Sanjay R.

Wednesday, April 25, 2018

" मीले नयनोसे नयन "

नायनो से जब
मिले दो नायन ।

बढती दिलकी
थोडी धाडकन ।

झूम उठे फिर
तन बदन ।

धधगती ज्वाला
बेकाबू मन ।

ईश्क की आहत
सुंदर गगन ।

रिमझिम बारसे
काले घन ।
Sanjay R.

लुगड्याचा थाट

लुगड्याचा थाट
काही औरच हायं ।
दीसते कशी मी
सांगा ना मायं ।

वऱ्हाडी लोकाईचं
संमेलन मोठ्ठं हायं ।
कोना कोनाले हो
अकोला याचं हायं

बोली भाषा वर्हाडी
साही त्त्याचा मेळा हायं
चालाच लागते ना भौ
घरी रावुन करता कायं
✍🏻
संजय रोंघे
नागपुर /यवतमाळ

Monday, April 23, 2018

" गुलाबाच्या फुला "

गुलाबी गुलाबी
गुलाबाच्या फुला ।
मनात काय माझ्या
कळले का तुला ।

रंग तुझा गंध तुझा
वेड लावले मला ।
सुंदर नाजूक तूच  किती
सांग मजसी फुला ।

हवे हवेसे रूप बघूनी
मन माझे घेयी झुला ।
भिजु दे मज गंधात तुझ्यारे
गोड गुलाबी फुला ।
Sanjay R.

Saturday, April 21, 2018

मामाचा गाव

उन्हायाच्या सुट्टीची
वाट पाहे सारे ।
मोजले जाओ आमी
मामाच्या गावाचे तारे ।

झुक झुक गाडीची
मजाच लय न्यारी ।
झाडा मांग झाड धावे
कवतिक वाटे भारी ।

रोजच होये पाहुनचार
आंब्याच्या रसाचा ।
मस्ती गोंधय मज्जा वाटे
खेल चाले चांदण्या  मोजाचा ।

आजूनबी आठवते मले
थे लहानपणचे दिस ।
सारंच सरल आता
जीवनाचा झाला कीस ।
Sanjay R.

Thursday, April 19, 2018

वर्हाडी संमेलन

सांगू नका कोणी मले
कायच्या  काई ।
जाच मले अकोल्याले
आता हाये घाई ।

वर्हाडी संमेलनाचा
हाये मोठा थाट ।
जोरात चालली तय्यारी
पाहत हावो वाट ।

एकोनतीस येते कवा
दिस रायलो मोजून ।
सारेच येतीन तेथ
सजून आन धजून ।

चाल बाबू बिगि बिगी
आटप सारे काम ।
तारीख आली जवळ
करू नको आराम ।
Sanjay R.

Tuesday, April 17, 2018

" डोळ्याला पाझर "

पोरगी माई बापु
हाये मायेचा सागर ।
समजलाच नाई मले
झाली कवा डगर ।

आजूनबी वाटते मले
लहानशीच थे हाये ।
दिसच किती झाले
नर्सरीत थे जाये ।

दिसा मागून  दिस गेले
म्हणते मोठी मी झाली ।
कुकुलं न्हायी बाळ
तुमच्या खांद्यावरी आली ।

हट्टी भाय लहानपनी
कोपऱ्यात जाऊन बसे
पायजे थे भेटलं का
लय खुदू खुदू हासे ।

चिव चिव आवाज तिचा
घर भर चाले ।
पैंजण पायातले तिच्या
कसे झुन झुंन वाजे ।

मोठी झाली आता थे
शांत स्वभाव न मन मायाळू ।
आपलंस साऱ्यायले करणारी 
हाये थोडीशी लाजाळू ।

लय मेहनती पर अभ्यासू
मोठ्ठं  व्हायचे स्वप्न तिचे ।
सगळंच चांगला भेटलं मुन
उपकार मानते देवाचे ।

मायबापाची बी लाडी थेच
नसली थे का उदासी येते ।
उद्या  कसं होईन चा इचार
डोळ्यायले मंग पाझर देते ।
Sanjay R.

Tuesday, April 10, 2018

" धुळ बिलगली मातीशी "

बदलले नक्षत्र आता
उन म्हणु की पाउस ।
घामाने भिजला देह
सरीत तु नको न्हाउस ।

गरजतात नभ आकाशी
वैर का कुणाचे सुर्याशी ।
धाप लागली धरेला
धुळ बिलगली मातीशी ।

दरवळला गंध मातीचा
पिवळी पाने झाली वेडी ।
तांडव करील सुर्य परतुन
होतील झाडं काडी काडी ।
Sanjay R.