Tuesday, April 17, 2018

" डोळ्याला पाझर "

पोरगी माई बापु
हाये मायेचा सागर ।
समजलाच नाई मले
झाली कवा डगर ।

आजूनबी वाटते मले
लहानशीच थे हाये ।
दिसच किती झाले
नर्सरीत थे जाये ।

दिसा मागून  दिस गेले
म्हणते मोठी मी झाली ।
कुकुलं न्हायी बाळ
तुमच्या खांद्यावरी आली ।

हट्टी भाय लहानपनी
कोपऱ्यात जाऊन बसे
पायजे थे भेटलं का
लय खुदू खुदू हासे ।

चिव चिव आवाज तिचा
घर भर चाले ।
पैंजण पायातले तिच्या
कसे झुन झुंन वाजे ।

मोठी झाली आता थे
शांत स्वभाव न मन मायाळू ।
आपलंस साऱ्यायले करणारी 
हाये थोडीशी लाजाळू ।

लय मेहनती पर अभ्यासू
मोठ्ठं  व्हायचे स्वप्न तिचे ।
सगळंच चांगला भेटलं मुन
उपकार मानते देवाचे ।

मायबापाची बी लाडी थेच
नसली थे का उदासी येते ।
उद्या  कसं होईन चा इचार
डोळ्यायले मंग पाझर देते ।
Sanjay R.

No comments: