Tuesday, March 31, 2020

" काळजी तुझी कुणाला "

चिंता सांग तुझी कुणाला
लहान तू रे असताना
चिंता आई बापाला ।

विवाहित होताच तू
काळजी तुझी पत्नीला

धागा आयुष्याचा बांधलेला ।

होतोस तू बाप जेव्हा
असते काळजी लेकरांना
तुही त्यांच्याशी जुळलेला ।

समाजाशी तुझे देणे घेणे
आठवतो तू ज्यांना ज्यांना
असते तुझी काळजी त्यांना ।

नाती गोती ही जवळची
करतात तेही काळजी तुझी
विचार थोडे तू मनाला ।

घे थोडी काळजी तुही
जीव लाव तू जीवाला
लाभेल अर्थ या जीवनाला ।
Sanjay R.


Monday, March 30, 2020

" जीव जगण्यावर जडला "

जीव जगण्यावर जडला
वाटते भीती मरणाची ।
पेटली आग या अंतरात
लागली रास सरणाची ।
डोक्यात वादळ विचारांचे
मीमांसा करतो कारणांची ।
सुख दुःख भाग जीवनाचे
ओढ अजूनही जगण्याची ।
Sanjay R.


Sunday, March 29, 2020

" संसार सांभाळताना "

कष्ट किती तिचे
कळले मला आता ।
सारेच आहेत घरात
भीती पाई कुठे जाता ।

मांडतो मी पसारा सारा
जीव जातो उचलता उचलता ।
मीच ठेवतो उचलून मग
बदललो किती पाहता पाहता ।

खाणे पिणे उचल घाचल
काम तिचे समजले आता ।
घरी राहून कळले सारे
शोभतो आता मी पिता ।
Sanjay R.


Saturday, March 28, 2020

" माती "

जुळलेली सगळी नाती जिथे
ती माय माऊली माती इथे ।

हसवते खुलवते करते संगोपन

देते आनंद फुलऊन हे जीवन ।


क्षणोक्षणी येते तीच धावून
शेवाटीही घेते स्वतःत सामावून ।
Sanjay R.


Friday, March 27, 2020

" लॉक डाऊन "

केले सरकारने जाहीर
लॉक डाऊन भारतभर ।
वाचवायचा आपला जीव
सुरक्षित आहे आपले घर ।

बाळगा थोडासा सय्यम
निघू नका कोणी रस्त्यावर ।
नियम थोडे पाळा हो
संकट मोठे हे या जगावर ।

येतील दिवस परत सोन्याचे
जगलो वाचलो आपण तर ।
सारेच आहे आपल्या हाती
मिळवू विजय या कोरोनावर ।
Sanjay R.

Thursday, March 26, 2020

" देवा तूच रे आता वाचव "

चीनने केली एक चुकी
झाली दुनिया रोगी ।

बसवले साऱ्यांना घरात
भीती मरणाची मनात ।

गेलेत हजारो लोक सोडून
पुढ्यात मरण आहे वाढून ।

जग झाले लॉक आऊट 
प्रत्येकाला होतोय डाऊट ।

जगण्यासाठी आहे धडपड
छातीत होते आता धडधड ।

देवा तूच रे आता वाचव 
कोरोनाला दूर तू घालावं ।
Sanjay R.

Wednesday, March 25, 2020

" अगं ये आजी "

अग ये आजी
आवडती तू ग माझी ।

करमत नाही तुझ्याविना
लाडकी किती मी तुझी ।

रागावते ना आई जेव्हा
आठवण येते ग तुझी ।

घेऊन कुशीत तुझ्या
पुसतेस आसवं माझी ।

पुरवतेस लाड माझे

प्रेमळ किती तू आजी ।

जायचं नाही सोडून कधी
आहेस सावली तू माझी ।
Sanjay R.




" अंतरातला आवाज "

हाक देतो अंतरातला आवाज
सांगतो तोच धोक्याचा अंदाज ।
ओळखुन सजवा जीवनाचा साज
सुखी जीवनाचे आहे हेच राज ।
Sanjay R.


" घरीच थोडे थांबा "

निघू नका बाहेर
घरीच थोडे थांबा ।
कोरोना आला घरात
तर होईल तितम्बा ।

कोरोना आहे महामारी
ओळखा हे संकट ।
पाळले नाही नियम तर
जीवच येईल आंगलट ।

मी जगतो , तुम्हीही जगा
थोडे दिवस घरात बसा ।
आपोआप जाईल कोरोना
घरच्यांसोबत थोडे हसा ।

खूप उधळला पैसा
आता जरा शांत राहा ।
जिवापुढे सारे शून्य
काळजीने आता घर पहा ।
Sanjay R.



Saturday, March 21, 2020

" जीवनात चाले पळापळ "

चाले जीवनात पळापळ
होते नुसती धावपळ ।
डोंगर कामाचा घेऊन
रोजचीच होते सकाळ ।
खिशाला ही असतो
नेहमीच पैशाचा दुष्काळ ।
हसतो फुलतो थोडासा
जेव्हा येते आभाळ ।
भुकेला असतो नेहमीच
कोरभर भाकरीचा जाळ ।
येईल जेव्हा पैसा तेव्हा
होतो साजरा सण दिवाळ ।
Sanjay R.


Friday, March 20, 2020

" संस्कृती भारताची "

सर्वस्वाने नटलेली
पूर्णत्वाने रुजलेली
आमची ही संस्कृती ।
विज्ञान  तंत्रज्ञान 
होते प्रगत इथेच ।
भाषा आणि विचारांचा
संगम सुरेख इथेच ।
कला आणि शिल्प
त्यात दिसे संकल्प ।
खाणे पिणे राहणे सारे
लोक वाटतात प्रगल्भ ।
इतिहास भूगोल अर्थशास्त्र
डंका होता सर्वत्र ।
त्याच वाटांवर उभे आम्ही
करू जतन अहोरात्र ।
Sanjay R.



Thursday, March 19, 2020

" जगा..... होईल कधीही दगा "

कधी इबोला तर
कधी येतो कोरोना ।
जीवनाच्या या यात्रेत
व्हायरसचा हो रोना ।

खेळच आहे जीवन
बघता बघता जाते ।
क्षणही नाही लागत
सारे इथेच राहते ।

कालच तर बरे होते
काय हे असे झाले ।
नाती गोती, सम्पत्ती सारी
सोडून हो ते गेले ।

आहे असेच जीवनाचे
दिवस आजचा तुम्ही जगा ।
काय त्या मनात यमाच्या
देईल कधी तो दगा ।
Sanjay R.


Wednesday, March 18, 2020

" दुःखातही तिचे हसणे "

दुःख उरात किती सांगू कसे
जाऊ नको तू दिसण्यावर ।

बांधून दुःखाची मोळी ती
करते मात संकटावर ।

खोचून पदर कमरेला
काढते तोड जगण्यावर ।

स्त्रीच या घराचा आधार
अभिमान तिच्या असण्यावर ।

काळजातले पाणी तिच्या
नाही दिसणार डोळ्यावर ।

सुखी संसाराची किल्ली तीच
जाऊ नको तिच्या हसण्यावर ।
Sanjay R.


" हवा थोडा विसावा "

कामाचा डोंगर त्यात
घडीभराचा विसावा ।
सगळाच वेळ मस्त
कामात जावा ।
फुरसतिचा कधी
एकही क्षण नसावा ।
टेन्शन कामाचे पण
चेहरा हसरा दिसावा ।
पोटासाठी कष्ट सारे मात्र
वेळ आपला असावा ।
जीवन आहे असेच
त्यात हवा थोडा विसावा ।
Sanjay R.



Tuesday, March 17, 2020

" ओळख "

तुझ्याच हाती तुझी ओळख
सरत आहे आता काळोख ।
हो खंबीर , धीर नको सोडू 
अत्याचाऱ्यास दाखव तुझा धाक ।
जननी तूच ग या जीवनाची
अपराध्याची होऊ दे राख ।
Sanjay R.

" प्रेम बहिणींचे दृढ "

बहिणींच प्रेम
असते किती दृढ ।
नसते त्यात हो
कुठलेच गूढ ।
भावांच्या प्रेमाला
लागतो मूड ।
काही नाती तर
असतात फक्त सूड ।
आशय त्यांचा असतो
भुर्रकन रे तू उड  ।
डोक्याला भार
अंतरात तुड तुड ।
पाण्यातला बुडबुडा
खोलात जाऊन बुड ।
Sanjay R.


Monday, March 16, 2020

" तुझा तोच चेहरा "

आठवतो अजूनही 
तुझा तोच चेहरा ।
सांग बदलू कशा मी 
अंतरातल्या मोहरा ।
नजरेतला तो भाव
आणि रुबाबदार तोरा ।
रंग असेल सावळाच
पण वाटायचा गोरा ।
शब्दही आठवतात
हृदयाच्या चोरा ।
बांधायचं होत मला
पण हरवला तो दोरा ।
Sanjay R.


Sunday, March 15, 2020

" कोरोना "

जिकडे तिकडे एकच रोना
आला आला कोरोना ।

काळजी आपली स्वतः घ्या
बाहेरून येताच हात धुवाना ।

कुणिहो भेटो करा नमस्कार
एक मीटर दुरूनच बोलाना ।

प्रवास सोडा गर्दी टाळा
एकांतात एकटे घरी बसाना ।

जेवण खाणे साधेच घ्या
प्रतिकार क्षमता थोडी जपाना   ।

सर्दी खोकला असेल थोडा
घेऊन औषध बरे व्हावा ना ।

घाबरू नका घाबरवू नका
जाईल दूर बघा करोना ।
Sanjay R.

Saturday, March 14, 2020

" परंपरेत बांधलेलो आम्ही "

परंपरेत बांधलेलो आम्ही
चाकोरीत त्या जगायचे ।
नियम केलेत समाजाने
त्यांनाही आपण पाळायचे ।

विचारांना कुठे कशाच्या मर्यादा
नियमात म्हणून वागायचे ।
आचार विचार समाजनुरूप
ठेऊन आपण राहायचे ।

परंपराही काही भोळ्या
त्यांना आपण सोडायचे ।
चांगले ते घेऊन सारे
दुःखाला दूर सारायचे ।
Sanjay R.



Friday, March 13, 2020

" सजली आज मेहंदी "

हातावर तुझ्या बघ
सजली आज मेहंदी ।
स्वप्न होते साकार
नवजीवनाची धुंदी ।
मन घेते झेप आकाशी
वाटे जग सारे आनंदी ।
नकळे सहजीवन हे
स्वच्छंदी की आहे बंदी  ।
Sanjay R.

Thursday, March 12, 2020

" नको परत तो आवाज "

संगीताच्या तालावर
घेऊन शब्द नवा साज ।
थरथरत्या ओठातून
लयीत निघाले आज ।
गेले भेदून काळजाला
नव्हता कुणाला अंदाज ।
पाणावले डोळे मग
लटकली वेशीला लाज ।
बंद कान बंद डोळे
नको परत तो आवाज ।
दूर श्रीमंत वाड्यातला
नको वाटतो तो रिवाज ।
Sanjay R.

Wednesday, March 11, 2020

" जीवन प्रकाशाचे किरण "

जीवन प्रकाशाचे किरण
जगण्याला त्याचेच कारण ।

ठरवायचे रोज नवे धोरण
बांधायचे सकाळी तोरण ।

पोटासाठी जातो शरण
कष्टाचे त्याला पारण ।

सारतो एक एक दिवस
अंताला शेवटी येते मरण ।

रचायचे मग शेवटाचे सरण 
रूप नव्याचे होते धारण ।

रात्रंदिवस चाले प्रवास
चंद्र सूर्य सोबतीला आमरण ।
 Sanjay R.


 

Tuesday, March 10, 2020

" पहिली भेट "

भेटतो मी तुला जेव्हा
वाटतं ही आहे आपली
अगदी पहिलीच भेट ।
हृदयात होतात कम्पन
मनाला आनंद आणि
नजर डोळ्यात तुझ्या थेट ।
Sanjay R.

Monday, March 9, 2020

" वाट पाहतो उत्तराची "

सांग तूच आता
किती वाट बघायची ।
प्रश्न होता माझा
वाट तुझ्या उत्तराची ।

प्रश्नांचे तर वादळ इथे
दूर त्याला सारण्याची ।
अंतरात आहे आस
नाव ही जीवनाची ।

बेचैन होते मन जेव्हा
तडफड होते आठवांची ।
सुने वाटे तुझ्या विना
बरसात होऊ दे पावसाची ।
Sanjay R.

" प्रवास हा एकट्याचा "

इति पासून अंता पर्यंत
प्रवास हा एकट्याचा ।
वाटेत प्रवासी बहुत
चाले संवाद अंतराचा ।

वाट ही वाळणांची
खाचा आणि खळग्यांची ।
घेऊनिया काळजी सारी
पदक्रांत ती करायची ।

दुःखाचे काटे कुठे
हाव सुखाच्या वाटेची ।
पडता पाऊल मधे 
होते दैना जीवनाची ।

जन्म मृत्यू दोन टोके
त्यात जाळी जीवनाची ।
प्रवास हा एकट्याचा
सोबत त्यात अंतराची ।
Sanjay R.



Sunday, March 8, 2020

" महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा "

आई तू बहीण तू
पत्नी तू  पुत्री तू
आहेस तू नारी ।
अंबा तू जगदंबा तू
देवी तू,लक्ष्मी तू
हाती तुझ्या ग
जीवनाची दोरी ।
मैत्रीण तू , प्रेयसी तू
स्वप्नातली परीही तू
तूच आहे परोपकारी ।
Sanjay R.

Saturday, March 7, 2020

" अंतरात त्याच खुणा "

सांग ना मना
काय तुझी कामना ।
वाटते जे तुला
विचार तो रे जुना ।
छेडतो मज का
हा असा पुन्हा पुन्हा ।
छळणार रे तू किती
माझा काय गुन्हा ।
एकांत हा असा
वाटतो मज सुना ।
सांग निरोप माझा
जाऊन तू कुणा ।
वाट मी बघतो
अंतरात त्याच खुणा ।
Sanjay R.

" चला थोडे हसू "

चला थोडं हसू
नका कोपऱ्यात बसू ।

जगायचंना जीवन तर
असे नका रुसू  ।

दाखवा थोडे दात
नका दुःखात असे फसू ।

शोधून थोडा आनंद
छान छान थोडे दिसू ।
Sanjay R.

Friday, March 6, 2020

" कल्पनांची वाहती नदी "

लेखणी तर आहे माझ्या
कल्पनांची वाहती नदी ।
विचारांचा डोंगर पाठी
काठावर हिरवी वादी ।

बांधून पाट मी त्यावर
करतो गोळा शब्द थोडे ।
लिहिते लेखणी माझी
काव्य रचनेचे धडे ।

प्रतिक्रिया वाचकांच्या येता
मन होते आनंदाचा फुलोरा ।
दरवळतो चहूकडे सुगंध
बदलतो चेहऱ्यावरचा तोरा ।
Sanjay R.

Thursday, March 5, 2020

" आठवते अजून ती संध्याकाळ "

दिवसभराची करून परिक्रमा
सूर्यही निघाला अस्ताला ।

अशीच ती रम्य संध्याकाळ
लागले तांबडे पसरायला ।

पक्षी शोधती घरटे आपुले
ओढ लागली मनाला ।

मनात उत्साह भरलेला
आनंद चेहऱ्यावर बहरलेला ।

सायंकाळ तुझ्या माझ्या भेटीची
आठवतो प्रसंग घडलेला ।

मन मनात गुंतलेलं आणी
हात हातात गुंफलेला ।

अबोल होते शब्द जरी ते
कळले सारेच अंतराला ।

जवळ येउनी एक झालो
श्वासात श्वास मिळालेला ।

अवतरल्या मग दूर चांदण्या
लागल्या चम चम चमकायला ।

तुझे माझे नाते जुळले 
लागले जीवन फुलायला ।
Sanjay R.

Wednesday, March 4, 2020

" बंदिस्त तुझे विश्व "

बंदिस्त तुझे विश्व
या खिडकीच्या आड ।
टाक उपटून ते गज
वृक्ष बंधनाचा तू पाड ।

निरभ्र झाले आकाश
वरून सूर्य डोकावतो ।
क्षितिज हे दूर किती
पक्षी गगनात झेपावतो ।

ये तुही बाहेर जरा
मोकळ्या या हवेत ।
घे भरून श्वास थोडे
आनंद तुझ्या कवेत ।
Sanjay R.

Tuesday, March 3, 2020

" नशिले तुझे ते डोळे "

नशिले तुझे ते डोळे
त्यात आसवांचे तळे ।

मन माझे ही खुळे

नजर मग ना ढळे ।


काजळ त्यात काळे 

वाटे आकाश निळे ।

नजरेला नजर जुळे
लक्ष परत परत वळे

मन तिथेच खिळे

हृदयास माझ्या छळे ।

अंतरात विचार भोळे
शोधात तुझ्याच जळे ।

लावू नकोस ताळे
तुजविण हळहळे ।
Sanjay R.



" पेटवू एकदाच होळी "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई मार्च 2020 अंकात माझ्या " पेटवू एकदाच होळी " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .