Thursday, June 30, 2022

गुन्हा काय माझा

कधी पडतो पाऊस खूप
कधी दिसेचना त्याचे रूप ।

येतात कधी वादळ वारे
हाती निसर्गाच्या हे सारे ।

नसते कमी मेहनत माझी
पण नाही कुणा कदर त्याची ।

फळ मेहनतीचेही का मिळेना
गुन्हा काय माझा काहीच कळेना ।
Sanjay R.


जग लय बेकार

भाऊ दूर नको जाऊ
जग लय बेकार ।
डोळे उघडून पाय
खाऊन पिऊन देते डकार ।
वरून तुले म्हणन
लयच होता तू गा टिकार ।
पायजो बापू अजून कोनी
यक अजून शिकार ।
आमचा त ह्या धंदाच हाये
मातर तू करू नोको नकार ।

Sanjay R.


सागराच्या लाटा

का काहीच कळेना
दूर जातात लाटा ।
येऊनिया काठावर
परत फिरतात वाटा ।

वाटतो जणू अबोला
काठा लाटांचा कसा ।
सागराने कशाला हा
घेतला असा वसा ।

नको काही काठाला
हवा थोडासा संवाद ।
अथांग किती सागर
का कशाचा हा वाद ।

स्वार्थ नाही कसला
उरते काय गाठीला ।
सुटेल साराच गुंता
भरती नि ओहटीला ।
Sanjay R.


मार शक्तीचा

निर्णयच तो असतो
होतो कधी चुकीचा ।
भोगतो मग मात्र
त्रास मात्र दुनियेचा ।
धडपडत असतो सारखा
मार्ग शोधतो मुक्तीचा ।
भोग लागतात भोगावे
फायदा नाही युक्तीचा ।
हळू हळू होतो सराव
मार्ग विसरतो भक्तीचा ।
कधीतरी येते याद
आठवतो मार शक्तीचा ।
Sanjay R.

विचार नको कशाचा

असू दे निर्णय चुकीचा
आता विचार नको कशाचा ।
येऊ दे संकट कितीही
मार्ग तर निघेलच यशाचा ।
हसायचे मस्त जगायचे
भरवसाच कुठे आयुष्याचा ।
कुणासाठी कोण थांबतो
मन्त्र एकच हा जगण्याचा ।
Sanjay R.

Wednesday, June 29, 2022

रात्र


कशावर मी सांगू हक्क
काहीच इथे उरले नाही ।
अंधार दिसतो काळा
सूर्याचा तर पत्ताच नाही ।
चांदण्याही लुप्त झाल्या
चंद्र तर उगवतच नाही ।
मिणमिणते ते काजवे
का ते रात्री जागत नाही ।
Sanjay R.


चालेना आता माथा

सरले दिवस आता
करू काय जाता जाता ।
बसु द्या ना थोडे तरी
सांगतो मी माझी कथा ।
गाठीला आहेत बांधलेले
त्यात साऱ्याच व्यथा ।
प्रश्न आहे पुढ्यात
चालेना आता माथा ।
Sanjay R.


आनंदाची प्रभात

अंतरातल्या विचारांना
शब्दांची हवी साथ ।
अवतरते मग कविता
घेऊन शब्दांचा हात ।
भावार्थ त्या रचनेचा
दिसे काय या मनात ।
आनंदाची अनुभुती
ती आनंदाची प्रभात ।
Sanjay R.


झाली कशी दशा

छंद नव्हे हा असा
ही तर आहे नशा ।
बघा जरा याची
झाली कशी दशा ।
सदा हाती मोबाईल
जणू झाला तो पिशा ।
कळेना काही कसे
विसरला हो दिशा ।
काळ वेळ नाही काही
चालतात उठा बशा ।
Sanjay R.


कसा हा छंद

कसा हा जगण्याचा छंद
आयुष्यभर दरवळतो गंध ।
कधी हसतो मी दिलखुलास
आणि स्वतःतच होतो धुंद ।
वाट दुःखाची कधी येते
मग श्वास ही होतात मंद ।
सुख दुःख तर येती जाती
वेचतो त्यातून मी आनंद ।
Sanjay R.


लढेल मी हक्कासाठी

लढेल मी हक्कासाठी
नका समजू मज अबला ।
पाळते माया ममता धैर्य
आहेच मी ही स्वयं सबला ।
आहे मी सीता मीच माता
आहे दुर्गेचे अभय मजला ।
नको पाहुस अंत रे माझा
कठोर किती कळेल तुजला ।
Sanjay R.


Friday, June 24, 2022

गुलाब मोगरा

फुलांचा रंग आणि काट्यांचा संग
गुलाबालाच जमतो ।
मोगरा बिचारा देऊन सुगन्ध
स्वतःच दमतो ।
बाकी फुलांची व्यथाच वेगळी
कोण कुणात कसा रमतो ।
गळ्यातला होऊनही हार तुरा
तोही शेवटी जागीच सरतो ।
Sanjay R.


कसा रे तू माणसा

कसा रे तू माणसा
करशील किती लोभ ।
नको वागू असा
दिसेल तुलाही क्षोभ ।
जोर ज्याच्या हाती
दाखवितो तो रोब ।
साधा सरळ कुठे चाले
म्हणतात त्याला डूब ।
Sanjay R.


फुल जिथे तिथे काटे

फुल जिथे तिथे काटे
सुखाला का दुःख वाटे ।
वाट प्रेमाची ही कठीण
वाटे सारे जग हे खोटे ।
होई अंतराला यातना
आसवे डोळ्यात दाटे ।
आशा तरीही सुटेना
हवे क्षण आनंदाचे छोटे ।

Sanjay R.


Thursday, June 23, 2022

मुखवटा मायानगरीचा

कशी ही मायानगरी
सारे जीवन किती वेगळे ।
चेहऱ्यावर लावून मुखवटा
करतात अभिनय सगळे ।

श्रीमंतीचा चढवून साज
कोणी होतो इथला हिरो ।
दारिद्र्याची ओढून चादर
दाखवितो किती तो झिरो ।

प्रेमाचा पडतो कधी पाऊस
कधी द्वेषाची जळते आग ।
कधी आसवे लपवून हसतात 
सारेच इथले आहेत महाभाग ।
Sanjay R.


Wednesday, June 22, 2022

घेऊ नको तू विसावा

येरे येरे तू पावसा
केलास किती उशीर ।
वाट होतो पाहात
केलेस किती अधीर ।

पड आता आरामात
घेऊ नको तू विसावा ।
सगळे लागलेत कामाला
सोडू नकोस ओलावा ।

खूप तापला रे सूर्य यंदा
कर म्हणा थोडा आराम ।
बोलव ढगांना मदतीला
घेऊ नकोस तू विराम ।

शेत होऊ दे हिरवे छान
डोलतील सारी पिकं ।
बळीराजा होईल खुश
संपेल घरातलं धुकं ।
Sanjay R.


वेडा गणपा

गणपा आमचा लय भारी
सिनेमा साठी करायचा चोरी
पहिला दिवस पहिला शो
शाळेला मग बुट्टी मारी ।
पिक्चरचा नेहमी ध्यास त्याला
हिरो बनून मारायचा फेरी ।
स्टाईल शिवाय जमायचे नाही
म्हणायचा नेहमी ओ तेरी ।
देखना एकदिन तुम भी सारे
आयेगी एक दिन पिक्चर मेरी ।
बघतोय आता सारेच आम्ही
गणपा फिरतो दारो दारी ।
Sanjay R.


रात्र परतून आली

सरला दिवस आता
रात्र परतून आली ।

चमचम करते चांदणी
राणी चंद्राची झाली ।

अंधार काळा त्यात मी
शोधतो सूर्याची सावली ।

चन्द्र बघतो दुरून सारे
हास्य चांदणीच्या गाली ।
Sanjay R.


Tuesday, June 21, 2022

बंध प्रेमाचा अतूट

बदल विचार थोडे
करू नको राजकारण ।
असह्य झाला अबोला
का केलास तू धारण ।
कान झालेत अधीर
सांगुन टाक तू कारण ।
आठवतात शब्द तुझे
ठेवलेत तेच मी तारण ।
बांध प्रेमाचा अतूट
करू नकोस तू हरण ।
Sanjay R.

राजकारण

साधा सरळ मी असा
कुठे जमते राजकारण ।

वेडे वाकडे मार्ग इथले
होतो मनस्ताप विनाकारण ।

हाजी हाजी इथे करायची
दहा वेळा पकडा चरण ।

साध्या सुध्यास कोण जुमनतो
त्याचे फक्त होते मरण ।
Sanjay R.


राजकारण झाले भारी

राजकारण झाले भारी
निघाली कुठे ही वारी ।
मतभेद होती जेव्हा
पडते मधातच दरी ।
होताच अंदाज पावसाचा
काही पोचतात घरी ।
चिंब भिजताना काही
अंगावर घेऊनिया सरी ।
राजकारणाची धुरा कठीण
नाही अशी अवस्था बरी ।
Sanjay R.

Monday, June 20, 2022

निसर्गाची किमया

निसर्गाची किमया बघा
हिरव्या झाडाला लाल फुल ।
आकाशात दिसतात तारे
कुठून येतात वाहणारे वारे ।
आकाशातून पडतो पाऊस
कांपुटरला असतो माउस ।
माणसांची इथे किती गर्दी
पैसे लागतात करायला खरेदी ।
कुतूहलाचे सारेच विषय
कधीच कळेना कशाचा आशय ।
Sanjay R.


कुतूहल

बाळ म्हणे जेव्हा आई बाबा
माय बापाला कुतूहल किती ।
पडे बाळाचं ते पाहिलं पाऊल
सगळ्यांना वाटे नवल किती ।
बाळ हळू हळू मग मोठे होई
जडते सगळ्यांची किती प्रीती ।
आनंदाचा मग प्रत्येक क्षण
आई बापाची फुलते छाती ।
मोठे मोठे मग जेव्हा होते बाळ
आई बापास वाटते भीती ।
सोडून तेव्हा मग जातो बाळ
आई बापाची थांबते गती ।
नाना विचार येतात मनी
का ही अशी जगाची रीती ।
म्हातारपणाचा सहारा तुटतो
का क्षणात सरते सगळी नाती ।
Sanjay R.


Sunday, June 19, 2022

इच्छा पूर्ण होतात

इच्छा मनात अगणित
कधी कुठे त्या सरतात ।
काही काही होतात पूर्ण
उरलेल्या वाट बघतात ।
लावून मी सर्वस्व पणाला
असतो नेहमी प्रयत्नात ।
विश्वास नाही सरला
वाटते इच्छा पूर्ण होतात ।
Sanjay R.




आनंदाचे वारे

येईल तो ही दिवस
पूर्ण होईल नवस ।

मिळेल साथ जन्माची
नसेल चिंता हसण्याची ।

असेल हातात ही हात
जन्मभराची मिळेल साथ ।

सरेल मग दुःख सारे
वाहतील आनंदाचे वारे ।
Sanjay R.


नाव

जन्म होताच बाळाचा
शोध होतो नावाचा ।
नामकरण होते जेव्हा
कानात गजर नामाचा ।
हसते खुदकन बाळ कसे ते
ऐकून उच्चार कामाचा ।
बोल बोबडे त्यासी कळते
होतो किती मग लाडाचा ।
नाव विचारता कोणी त्याला
साथीला उल्लेख बापाचा ।
नाव कमावून होतो मोठा
मान मिळवितो नावाचा ।
Sanjay R.


बदलतील तारे



इछा साऱ्या होतील पुर्ण 
असेल मनात जर भाव  ।
कष्टाची थोडी हवी साथ
हवी थोडी धावा धाव ।

प्रयत्न कसे ते जाईल व्यर्थ
जीवणाचाही तोच अर्थ ।
अभिमान तू नको बाळगू
असेल तयात तुझा स्वार्थ ।

स्वार्थी असा तू होऊ नको रे
मिळेल हवे ते तुजला सारे ।
विश्वास ठेव तू कर्तृत्वावर
नशिबाचे बदलतील तारे ।
Sanjay R.

Saturday, June 18, 2022

रूप धरेचे

भावनेला द्यायची
कधी मोकळी वाट ।
त्यातही वाटते मग
रम्य किती पहाट ।
नवं रंगांची उधळण
निसर्गाचा कसा थाट ।
झुळझुळ वाहे पाणी
तुडुंब भरतील पाट ।
डोंगर दऱ्या  उंच पहाड
हिरवी हिरवी झाडी दाट ।
पुढे पुढे मग जावे जसे
संपते कुठे कळेना वाट ।
अथांग हा सागर कसा
येतो घेऊन उंच लाट ।
रूप बघतो मी धरेचे
आहे कसे किती विराट ।
Sanjay R.


प्रयास

हो अगर मनमे विश्वास
मंजिलका भी थोडा ध्यास ।
और साथ हो थोडे #प्रयास
होगा सबकुछ अपने पास ।।
Sanjay R.


नामकरण होते कसे

असेल जो जाडा खूप
म्हणायचे त्याला मोटू ।

उंच असेल जोही तो
असतो तोच कसा लंबू ।

ठेंगणा ठुसका दिसे कसा
म्हणतो त्याला टिंगू ।

टांगा ज्याच्या असेल लांब
तो तर असतो लांबाड्या ।

वायफळ चाले बडबड ज्याची
म्हणती त्याला बडबड्या ।

कुणी करतो तडतड खूप
तो असे तडतड्या ।

मुका मुका राहतो कोणी
तो असतो मुकाडू ।

बोकडांची दाढी ज्याला
तो आमचा बोकड्या ।

माकडा सारखे करी तोंड
दिसतो जसा माकड्या ।

बंदरा सारखे लहान तोंड
तो आमचा बंदऱ्या ।

म्हणतो आम्ही कुणास अप्पू
असतो कुणी ढ चा ढप्पू ।

जेही आम्हास जसे दिसते
नामकरण तर तसेच होते ।
Sanjay R.

सांगा कसे वागायचे

कुठे काय हो बघायचे
सांगा कसे वागायचे ।
सुख थोडे तरी द्यायचे
दुःख सारेच घ्यायचे ।
अश्रू डोळ्यातच प्यायचे
हास्य मुखावर बघायचे ।
भूतकाळ विसरून सारा
भविष्य आनंदात जगायचे ।
Sanjay R.


Friday, June 17, 2022

जखमा खोल

आसवांचे सांगा काय मोल
डोळे असले जरी गोल ।
ओघळतात जेव्हा गालावरती
सुटतो कुठे कुणाचा तोल ।
हुंदके मग होतात  का सुरू
वेदना अंतरात जखमा खोल ।
Sanjay R.


अभिनय

प्रत्येक दिवस वेगळा
अभिनय चाले सगळा ।
जीवनाचे रंग जितके
बदलायचे भाव तितके ।
डोळयात असू दे अश्रू
हास्यात सारेच विसरू ।
अंतरात या नाही प्रेम
नाही कशाचा कुठे नेम ।
पारंगत हो सारेच इथे
माणूस मी शोधू कुठे ।
Sanjay R.


Thursday, June 16, 2022

आहे कोणी खास

सतत होतात भास
थांबतील का श्वास ।
मनात जे माझ्या
त्याचाच लागे ध्यास ।
करील सुरू मग
मीही माझा प्रवास ।
असेल सोबतीला माझ्या
असेल जो खास ।
सांगा तुम्हीच मज
होईल कसा त्रास ।
गमावणार नाही कधी
हाच माझा विश्वास ।
Sanjay R.

काय कमावले काय गमावले

काय कमावले काय गमावले
हिशोबच कुठे लागतो ।
कितीही असो अपुरेच नेहमी
थोडे अजून जास्तच मागतो ।
नसेल जर मिळत तर मात्र
कसाही मी वागतो ।
मीठ जरी तुमचे असेल
त्यालाही मी जागतो ।
Sanjay R.

कशी ही जादू

कशी ही जादू
कसा हा टोना ।
जगतो जीवन
पण एकच रोना ।

रडतो जास्त
पण हसतो कमी ।
दिसेल डोळ्यात
नेहमीच नमी ।

आसवांचे इथे
काय मूल्य ।
दाबून टाकायचे
मनातले शल्य ।

उठून लागतो
जेव्हा वाटेला ।
खिळावे वाटते
धरून खाटेला ।

वाटतं मला
मीच लाचार ।
सुख विसरतो
दुःखाचा प्रचार ।
Sanjay R.


प्रथा गावो गावी

सक्काळी सक्काळी
जावे आपल्या गावी ।
स्वागताला हजर सारे
गोष्ट ही नाही हो नवी ।
रहस्य कुठले नाही यात
जो तो वेशिकडे धावी ।
प्रथा ही दिसेल तुम्हा
प्रत्येकच गावो गावी ।
Sanjay R.
😊😊😊😊


Tuesday, June 14, 2022

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या त्या आठवणी
वाटतं परत व्हावं लहान ।
खेळावं बागडावं मस्त उडावं
परत शाळेत जावं छान ।

मित्रांशी घालावा तसाच गोंधळ
नवे कपडे घालून मारावी शान ।
खोड्या काढाव्या कुणाच्याही
जेव्हा नसता कुणाचेच भान ।

काढून एक चित्र गुरुजींचे
फाडावे तसेच वहीचे पान ।
गुरुजींचा पडता मार मग
व्हावे अजूनच खूप लहान ।

आईचा मार बाबांचा धाक
पाठीवरच्या वळांचे ते निषाण ।
परत वाटतं हवं हवं सारं
व्हायचं मला परत एकदा अजाण ।
संजय रोंघे


गावाचे रहस्य

सगळेच जिथे रहस्य
तेच ते आहे गाव ।
असू द्या ना काहीही
त्या छोटया गावाचे नाव ।

झुळ झुळ वाहते नदी
निसर्ग घेतो मन मोहून ।
आंबा चिंच गोड आंबट
तोडावी वाटते धावून ।

मूठभर  दाणे पेरायचे
पोते भरून आणायचे ।
काय किमया होते बघा
रहस्य तिथल्या मातीचे ।

माणसंही साधी भोळी
लळा लावून जातात ।
गरीब असला तरी हो
श्रीमंती त्यांच्या प्रेमात ।

अशी कित्येक रहस्य
दडलीत त्या गावात ।
एकदा फक्त जाऊन बघा
कळेल सारे एका डावात ।
Sanjay R.


Monday, June 13, 2022

मित

कळले मज सारे
कशात माझे हित ।
वागणे तुझे बघ
आहे कशी ही रीत ।
हरणार सांग कशी
होईल तुझी जित ।
माझी तू मी तुझा
ही आपली मित ।
बहरू दे आता
तुझी माझी प्रीत ।
Sanjay R.


दरवळतो सुगंध

तुझा आणि माझा
एक अनामिक संबंध ।
आठवणीनेही मीही
होतो कसा बेधुंद ।
आभास मनाला
दरवळतो सुगंध ।
करतो स्मरण किती
लागला तोच छंद ।
Sanjay R.


अनामिक संबंध

नाव न ज्याचे
गाव न त्याचे ।
सांगू मी नाव
सांगा कुणाचे ।
ओळख ना पाळख
देणे घेणे कशाचे ।
अनामीक तो
संबंध कशाचे ।
Sanjay R.


Sunday, June 12, 2022

आयुष्याचे रंग अनेक

आयुष्याचे रंग अनेक
सुख दुःखाचा त्यात रिटेक ।
गालावर हास्य डोळ्यात अश्रू
वाटते कधी सारेच फेक ।
रंग अनेक ढंग अनेक
मिळतात कधी माणसं नेक ।
Sanjay R.


नको पडायला दरार

विवाहात कुठला करार
नको पडायला दरार ।
एकदा चुकली वाट तर
अस्तित्वच होते फरार ।
Sanjay R.


आयुष्य एक चित्रपट

आयुष्य कसे सांगतो
मीही सोबत धावतो ।
जणू चित्रपटच हा
माझा मीच पाहातो ।
तीन तासात कुठे
शेवाटालाच थांबतो ।
कधी डोळ्यात अश्रू
कधी कधी हसतो ।
खूप घेतले जगून आता
जगायचे म्हणून जगतो ।
मिटतील कधी डोळे
वेळ त्याचीच बघतो ।
Sanjay R.



Saturday, June 11, 2022

करू एक करार

तुझ्या माझ्यात आज
करू एक करार ।
कागदावर नकोच तो
होतो नेहमी फरार ।
मनाचेही खरे नाही
नेहमीच पडते दरार ।
तुझे तू माझे मी
हाच आता विचार ।
दूर झालो दोघे तर
होईल कोण लाचार ।
मी एक सदाचार
तू तर भ्रष्टाचार ।
दुर हो आता तरी
नको मला आधार ।
Sanjay R.


पहिल्या पावसाची झाली बरसात

पहिल्या पावसाची आज
झाली बरसात ।
घेतले चार थेंब मी त्यातून
पसरवून हात ।

गार आकाशातले ते पाणी
थांबेना हातात ।
जो तो होता किती डोलत
झाडही होते हालत ।

माती झाली थोडी ओली
धुंद सारे गंधात ।
गीत पावसाचे होते त्यात
पक्षांचा चिवचिवाट ।

ढोल वाजला आकाशी
ढगांचा गडगडाट ।
मधेच वीज येऊन गेली कशी
तिचाही कडकडाट ।

वाऱ्यालाही होता किती जोर
धावला गारव्यात ।
ढगांनी झाकले सारे आकाश
वाटे झाली ही प्रभात ।
Sanjay R.


करार

विवाह एक करार
नात्यावरती प्रहार ।
प्रेम कुठे उरेल मग
नाही मनाचा विचार ।
नाही कशाचे बंधन
नाही कशाचा आधार  ।
मनमानी जशी चाले
तिथे सारेच लाचार ।
Sanjay R.

Friday, June 10, 2022

पाऊस केव्हा येईन

बघत होतो मी आकाश
ढगांचा नव्हता पत्ता ।
आकाशात चोही कडे
सुर्याचीच होती सत्ता ।

चट चट झोंबायच ऊन
अंगाची व्हायची लाही ।
गळ्याला पडली कोरड
पाण्यासाठी मचली त्राही ।

नदी  नाले पडले कोरडे
विहिरीत नाही उरले काही ।
काळ्या ढगांची वाट आता
भिर भिर सारे आभाळ पाही ।

येऊ दे रे पहिला पाऊस
मीही थोडं भिजून घेईन ।
वादळ झाले वारे झाले
सांगा पाऊस केव्हा येईन ।
Sanjay R.


प्रेमाचे किती प्रकार

प्रेमाचे किती प्रकार
जणू जडलेत विकार ।
नाही त्यास अस्तित्व
नाही कुठला आकार ।
अंतरात चाले सारे
किती किती ते विचार ।
जुळले जर सारेच
तेव्हाच होई साकार ।
नशिबात नसेल तर
मिळेल फक्त नकार ।
Sanjay R.