Saturday, April 30, 2016

" कुछ वादे कुछ इरादे "

भावनांना नसते भाषा
तयासी प्रेमाची आशा ।
सोडुनी सार्या निराशा
धावते मन दशदिशा  ।
Sanjay R.

कभी उनकी यादे
कभी उनके वादे  ।
दिलमे न कोइ उमंग
न रहे कोइ इरादे ।
जिते जागते है हम
पिठपर बोझ लादे ।
अबभी चाहते उनको
कोइ उन्हे याद दिलादे ।
Sanjay R.

Thursday, April 28, 2016

" हातात हात "

घे मी दीला
तुझ्या हातात हात ।
हवी मज तुझी
आयुष्याची साथ ।

आकाशाला जशी
चांदणयांची साथ
सुर्याच्या साक्षीन
रोज होते प्रभात ।

तुच ठसली बघ
माझ्या मनात ।
आठवते तुच मज
प्रत्येक क्षणात ।
Sanjay R.

" उन्हाच्या झळा "

का रे बाळा
रडतो घळघळा ।
तहानेन॓ कोरडा
पडला  गळा ।
त्यासी हवा
बरफाचा गोळा ।
गार गार थंड
लाल पिवळा ।
होइल शांत
मनातल्या कळा ।
sanjay R.

उन्हाची एक दुपार
पाण्याविन गळा सुकलेला ।
येताच समोर एक कोन
गळा थंड ओला जाणवला ।
Sanjay R.

Wednesday, April 27, 2016

" स्वप्नांची दुनीया "

चल जाउन येउ आपण सखे
स्वप्नांच्या अनोख्या दुनियेत ।
तु मी आणी सोबतीला चंद्र
आनंदोत्सव करु साजरा
चांदण्याच्या बागेत ।
sanjay R.

काय सांगु राजेहो
काल अख्खा दिवस
उन्हात फिरलो ।
गरमीनं चांगला
गरम गरम शिजलो ।
घामाच्या धारायनं
बंदाच भिजलो ।
रातच्यानं तापानं
चांगलाच फनफनलो ।
लय बेकार हाये उन
बंदा दिवस गरगरलो ।
Sanjay R.

Friday, April 22, 2016

" धाव धाव विठ्ठला "

सुर्यासंगे अवतरल्या
उन्हाच्या तप्त ज्वाळा ।
लोपला नदी किनारा
सरला आवाज खळखळा ।
सुकला हिरवा पसारा
भासे पाण्यावीन पांगळा ।
दाना पाणी सरले सारे
ओरडे पोटात कावळा ।
संपले सारे उपाय
महाग झाला आवळा ।
गरीबाचा नाही आता
उरला कोणी मावळा ।
धाव धाव विठ्ठला
तुच माझा रे सावळा ।
Sanjay R.

" गंध की पुकार "

कभी आर
कभी पार ।
भटकता
द्वार द्वार ।
भवरेको देखो
गंध की पुकार ।
छुते चुमते
तितली का प्यार ।
जिवन का रंग
खुशीयोकी बहार ।
Sanjay R.

Thursday, April 21, 2016

" घर "

राहण्यास नाही घर
राहतो अंथरुन पदर ।

उपाशी पोट आमचे
नाही कुणास कदर ।

कष्टाला नाही किंम्मत
जगतो करुन मरमर ।
Sanjay R.

" नको धावा धाव "

नको जास्त हाव
नको धावा धाव ।
खाउ देनं त्याला
फुकटचा भाव ।
नाही तरी नेहमी
असते काव काव ।
म्हणतो देवास
मला तु पाव ।
लांब आहे त्याचा
जन्मा चा गाव ।
कोण कुठला
कुणास ठाउक राव ।
येउन बसला
बनला साव ।
विचारलं तर
सांगत नाही नाव ।
द्या ना टाकुन
करुन डाव डाव ।
भरेल मनावरचा
खोल झालेला घाव ।
बरीच कामं आहेत
चला जाउ राव ।
Sanjay R.

Wednesday, April 20, 2016

" डोळा अश्रु विनाच रडला "

रीश्तो की डोर ।
उसमे कितना जोर ।
हम आप और
जिंदगीका दौर ।
Sanjay R.

जिवन म्हणजे काय
जन्म आणी म्रुत्यच ना ।
येणार्याला जायचच आहे
थांबणार कोण सांगा ना ।
असे करा तसे करा
तुम्हा वाटेल तसे करा ना ।
नका विसरु माणुसकी
माणुस म्हणुन जगा ना ।
Sanjay R.

उन्हाचा मारा वाढला
गरमीचा पारा चढला
गळा कोरडा पडला
थेंब पाण्याचा दडला
दाही दिशा हाहाकार घडला
डोळा अश्रु विनाच रडला
Sanjay R

Sunday, April 17, 2016

" आधार हवा "

उन्हाच्या झळा
पावसाच्या कळा ।
दाबुन कान नाक
आवळायचा गळा ।
जगायचे जिवन तर
नुसते पळा पळा ।
Sanjay R.

खरच जिवन रथ
असाच असावा ।
खांद्याचा आधार 
शेवट पर्यंत पुरावा ।
संसार आनंदात
न्हाउन निघावा ।
मनाचा प्रत्येक कोपरा
अमरुतात भिजुन जावा ।
Sanjay R.

Saturday, April 16, 2016

" जिवनाची जोड "

नाही खाण्यास गोड धोड
पोर बघा हो झाली कशी रोड ।
पैसा पैसा का असा
त्याची कशी जिवनाशी जोड ।
नाही जुळले माझे तया
नाही गवसली कुठे तोड ।
पाहतो सार्या दीशा असा मी
सारेच करती लुटायची होड ।
देतो सोडुन आता सारे
नाही पेलवत मजला लोड ।
पाश उलटले जिवनाचे आता
फंदा वेडावतो कसा बेजोड ।
सरली आसवं डोळ्यातली
पेटु दे चीता दुर सार गिधाडं ।
नको रडउस तान्हुल्यासी
हसाया देजो धाडुन एक झाड ।
Sanjay R.

" स्वप्न "

मोठ्यानं लहानावर
करायचे राज्य ।

नियम हा सर्वमान्य
आहे अवीभाज्य ।
 
तुणतणं वाजवा कितीही
ढोल नगार्याचाच बाजा ।

दुसरा तिसरा नको आता
मोठा मीच आहे माझा ।
Sanjay R.

कालच्या त्या भेटीची
बातच काही औरच होती ।

मैफील तर आजही सजली
पण अदा काही औरच होती ।

ताल सुर आणी सोबतीला नाद
संगम त्यांचा काही औरच होता ।

रुणझुण रुणझुण पैंजण वाजे
थिरकली पावलं काही औरच होती ।
Sanjay R.

हेच तर स्वप्न होते माझे
ठेउन घ्यायचे सुर्याला बॅगेत ।
गरज पडताच रात्री मग
घेउन सुर्य बघायचे काळोखात ।
Sanjay R.

Tuesday, April 12, 2016

" रोज जलता है "

कभी याद हमे
वो करते है  ।
कभी हम उनको
दिलमे लिये चलते है ।
मोहब्बत का आलम
बस युही चलता है ।
दिलके अंदर कौन देखता
वो तो रोज जलता है ।
Sanjay R.

Sunday, April 10, 2016

उन्हाळा

लागता उन्हाळ्याची चाहुल
प्रश्न पाण्याचा पुढे येतो ।
आटलेल्या खोल विहीरी
आसवांना सोकुन घेतो ।
Sanjay R.

Saturday, April 9, 2016

" का येतो राग "

काय हो काका
तुम्हाला इतका
का येतो राग ।
दुर जाउन बसता
काही न बोलता
करता त्राग ।
काही तर बोला
मिळुन मग काढु
मधला माग ।
जाउ द्या आता
विसरुन सारं
पुसुन काढु डाग ।
हसतच पुढे जाउ
हा पण असा
जिवनाचा भाग
Sanjay R.

" ढोलकीच्या थापेवर "

ढोलकीच्या थापेवर
रुणझुण रुणझुण नादावर ।
घा घा धींना घरुन सुर
चला नाचु या तालावर ।
Sanjay R.

नको मारु शेखी
होशील तुच दुखी ।
असेल काही रुखी
घेउन हो सुखी ।
Sanjay R.

Friday, April 8, 2016

" वर्हाडी ठेचा "

काल गेलो होतो
मी एका आफीसात ।
सरकारी हाफीस ते
सारेच होते बंदोबस्तात ।
बाबु पाशी गेलो
मनलं काम कवा होइन ।
म्हनते कसा बाबु 
भेटन वेळ तवा मी पाइन ।
मनलं बाबुले पहानजी जरा
महीने झाले नाइन। ।
तो म्हने भेट मंग
रात्री घेउ थोडी वाइन ।
म्या म्हनलं मंग
देतो न जी क्वाइन ।
रात्री भेटशीन त
उद्या काम तुहं होइन ।
नियमच हाये तसा
काय काय मी पाहीन ।
रात्र झाली जंगी
निपटलं काम बहीन ।
फालतुच होतो बसला
कामाची कीती वाइन ।
Sanjay R

मैत्रीची प्रथम हाय
कळतं कुणाला काय ।
मैत्रीत दुष्मनी नाय
रोज चालतं हाय बाय ।
कधी होते काय बाय
मनात असते काय नाय ।
दोस्तायची असते दोस्ती
मन म्हनते जाउदे बराय ।
करुन पाहीलं व्हाय व्हाय
दोस्तायची दोस्तीच खराय ।
Sanjay R.


जब रात हो सुहानी
दिलमे हो दिवानी ।
और साथ हो तुम्हारा
तो बनेगी एक कहानी ।
Sanjay R.


Wednesday, April 6, 2016

" काय तुझी अदा "

काय बये तुझी गं अदा
बदलते सदा न कदा ।
बघुन मन माझे
झाले तुजवर फिदा ।
ठसली मनात तु
अस तिथेच सदा ।
तुजविण नको चालणे
नाही होणार जुदा ।
Sanjay R.

प्रहर काळ्या  रात्रीचा
अन खेळ सावल्यांचा ।
कुठे चमकतो काजवा
सोबत नाच भावल्यांचा ।
अशीच उलटते रात्र
मंद वारा पहाटेचा ।
Sanjay R.

" मोह "

मोह कवितेचा नव्हता
मला आवरत ।
शब्दांचा साज
नव्हता मला सावरत ।
वाट तुझी बघता बघता
मन होतं धावत ।
ह्रुदयात ज्योत प्रेमाची
आहे अजुन तेवत ।
Sanjay R.

तारे सितारे
उघडी दारे ।
येउन जाउन
घुसतात वारे ।
गडबड गोंधळ
ओरडतात पोरे ।
मन उद्विग्न
ओढतात दोरे ।
प्रत्येकाचे बघा
वेगळेच तोरे ।
Sanjay R.

Tuesday, April 5, 2016

हमारी याद आये

कभी उनको भी
हमारी याद आये ।
गगनमे तुटते तारोंकी
झडी लग जाये ।
क्या कहे दिलसे
दिलको वो अपनाये ।
दिल ही दिलमे
हम गीत गुनगुनाये ।
Sanjay R.

Monday, April 4, 2016

" सफर सुहाना "

कभी उन्हे भुल जाना
कभी हमे याद करना
जिंदगी का ये तराना
दिलका यही फसाना
कोइ गायेगा दिवाना
यही हसने का बहाना
सफर जिंदगी का सुहाना ।
Sanjay R.