Saturday, April 16, 2016

" जिवनाची जोड "

नाही खाण्यास गोड धोड
पोर बघा हो झाली कशी रोड ।
पैसा पैसा का असा
त्याची कशी जिवनाशी जोड ।
नाही जुळले माझे तया
नाही गवसली कुठे तोड ।
पाहतो सार्या दीशा असा मी
सारेच करती लुटायची होड ।
देतो सोडुन आता सारे
नाही पेलवत मजला लोड ।
पाश उलटले जिवनाचे आता
फंदा वेडावतो कसा बेजोड ।
सरली आसवं डोळ्यातली
पेटु दे चीता दुर सार गिधाडं ।
नको रडउस तान्हुल्यासी
हसाया देजो धाडुन एक झाड ।
Sanjay R.

No comments: