Saturday, April 16, 2016

" स्वप्न "

मोठ्यानं लहानावर
करायचे राज्य ।

नियम हा सर्वमान्य
आहे अवीभाज्य ।
 
तुणतणं वाजवा कितीही
ढोल नगार्याचाच बाजा ।

दुसरा तिसरा नको आता
मोठा मीच आहे माझा ।
Sanjay R.

कालच्या त्या भेटीची
बातच काही औरच होती ।

मैफील तर आजही सजली
पण अदा काही औरच होती ।

ताल सुर आणी सोबतीला नाद
संगम त्यांचा काही औरच होता ।

रुणझुण रुणझुण पैंजण वाजे
थिरकली पावलं काही औरच होती ।
Sanjay R.

हेच तर स्वप्न होते माझे
ठेउन घ्यायचे सुर्याला बॅगेत ।
गरज पडताच रात्री मग
घेउन सुर्य बघायचे काळोखात ।
Sanjay R.

No comments: