Thursday, March 5, 2020

" आठवते अजून ती संध्याकाळ "

दिवसभराची करून परिक्रमा
सूर्यही निघाला अस्ताला ।

अशीच ती रम्य संध्याकाळ
लागले तांबडे पसरायला ।

पक्षी शोधती घरटे आपुले
ओढ लागली मनाला ।

मनात उत्साह भरलेला
आनंद चेहऱ्यावर बहरलेला ।

सायंकाळ तुझ्या माझ्या भेटीची
आठवतो प्रसंग घडलेला ।

मन मनात गुंतलेलं आणी
हात हातात गुंफलेला ।

अबोल होते शब्द जरी ते
कळले सारेच अंतराला ।

जवळ येउनी एक झालो
श्वासात श्वास मिळालेला ।

अवतरल्या मग दूर चांदण्या
लागल्या चम चम चमकायला ।

तुझे माझे नाते जुळले 
लागले जीवन फुलायला ।
Sanjay R.

No comments: