Monday, April 3, 2023

आठवा जरा जुना काळ

आठवा जरा जुना काळ
घर भरून असायचे ।
सगळेच येका छताखाली
मिळून मिसळून हसायचे ।

आजी आजोबा काका काकू
सगळेच सोबत बसायचे ।
एकमेका आधार त्यांचा
सुख दुःख वाटून जगायचे ।

तुटले आता ते जुने घर
प्रत्येकाला वेगळे राहायचे ।
सासू नको सासर नको
सांगा एकटेच काय बघायचे ।

मोबाईल ने तर केला दगा
सांगे येकटे कसे जगायचे ।
म्हातारपण तर किती कठीण
त्यांना कुणी सावरायचे ।
Sanjay R.


No comments: