Sunday, April 2, 2023

सांगतो मी राजा

सांग तू राजा
आहे रे कुठे मजा ।
सदा असतो धावत
वाटते मला सजा ।

गाव सुटले आणि
शहरी मी आलो ।
पैश्याची हाव आता
लालची किती झालो ।

रहायला रे खोली
हवे वाटते घर ।
गावच्या अंगणाची
नाही रे इथे सर ।

सकाळची बैठक
पळतो मी कुठे ।
घड्याळीच्या कट्यावर
सारे धावत सुटे ।

नाही क्षणाची उसंत
चाले दिवसभर काम ।
पूजा नाही पाती
विसरलो मी राम ।

काळ लोटला इथे
सूर्य बघितला कधी ।
ऊन वाऱ्याचा चटका
पाऊस रे गावा मधी ।

हिरवे रान कुठे
इमारतीचे झाले जंगल ।
आई बाप तिकडे
हीच मनात रे सल ।

शोधतो रोज मी
काळया मातीचा वास ।
उभ्या उभ्या कसा रे
थांबतो इथे श्वास ।

सांगतो मी राजा
याद गावाची येते ।
नाही माणुसकी इथे
काढून काळीज नेते ।

नको वाटते सारे
गाव होता रे बरा ।
कपटी सारेच इथे
हृदयात तिथेच झरा ।
Sanjay R.


No comments: