Saturday, April 20, 2019

" सूर्य चंद्र "

लागले ग्रहण सूर्याला
बघायचे मज चंद्राला ।
सळ सळ जरी वाहे तो
अस्तित्व कुठे वाऱ्याला ।

उमलला गुलाब अंगणात
डोलतो कसा डौलाने ।
धुंद झाले अंगण सारे
मंद धुंद सुगंधाने

स्वप्नच देतात साद मनाला
बंद असतात डोळे जेव्हा ।
अवतरतो मग सूर्य धरेवर
होते तांबडे आकाश तेव्हा ।
Sanjay R.

No comments: