Thursday, April 25, 2019

" वणवा पेटला "

झळा उन्हाच्या कशा या
अंग अंग निघते भाजून ।
नाही उरले झाड कुठेच
उभा उन्हातच मी अजून ।

शोध घेतला पाखरांचा
चिमणी पण नव्हती कुठे ।
पाण्यावाचून सांगा कसे
जंगलही झाले सुटे ।

वाळून गेलीत झाड सारी
उडताहेत पानं दूर दूर ।
मधेच एक ढग दिसतो
त्यात बघतो पावसाचा पूर ।

कोरडी पडली जीभ आता
पेटला वणवा त्या दूर ।
थेंब भर पाण्यासाठी
जीव झाला कसा आतुर ।
Sanjay R.

No comments: