Friday, April 19, 2019

" मन "

मन सुखाचा सागर
कुठला त्यास किनारा ।
हळूच एक फुंकर यावी
होऊन जावे वादळ वारा ।
आकाशात ढग यावेत
सोबतीला पावसाच्या धारा ।
काळोखाची चादर ओढून
बघतो त्यातून लखलख तारा ।
पहाटेचे तांबडे फुटता
प्रकाश होतो आसमंत सारा ।
प्रीतीचा हा बंध नाजूक
अंतरात त्याचाच इशारा ।
Sanjay R.



No comments: