Monday, September 15, 2014

" मज घडेल काशी "

हास्य वदन घेउनी
नभात अवतरला रवी ।
प्रकाशीत झाली धरा
झळकली आनंदाची छवी ।
Sanjay R.

नको रे देवा
वेळ येउ देउ अशी ।
बापाला बाप म्हणायची
त्यांना का लाज येते अशी ।

लहानाचे केले मोठे
पुरवलेत लाड राहुन उपाशी ।
आयुष्य घातले खर्ची
रात्र रात्र काढल्या उशाषी ।

जडवला घडवला हिरा बनवुन
सम्मानीत केला नावानीशी ।
आई बापच विसरला रे
कसे आता सांगायचे कुणापाशी ।

नाही हव्यास मज पैशा पाण्याचा
तरीही आहे मी उपाशी ।
शब्द दोन प्रेमाचे दे
नाही कुठले रुण घडेल काशी ।
Sanjay R.

देवा खरच तुझी
किमया न्यारी ।
पहीले तर बळिराजाची
वाया घालवलीस तयारी ।
आता केलीस रे
धरा जलमय सारी ।
प्राणही काढुन नेलेस
का सारेच होते अनाचारी ।
देवा तुझी किमयाच न्यारी ।।
Sanjay R.




No comments: