Tuesday, July 4, 2017

" आषाढ वारी "

मुखी हरी नामाचा गजर
निघाली पंढरपुराला वारी ।
मनात ध्यास विठ्ठलाचा
विसरला तहान भुक सारी ।
टाळ मृदंगाच्या नादात पडे पाउल
पुढे जाया हरीच्या द्वारी ।
आज एकादशीचा दिवस
लोटला जन सागर पंढरी ।
चंद्रभागेत भिजताच पाय
संचारला मनी उत्साह भारी ।
ओढ लागली दर्शनाची
ठेउनी आला सुख दुःख घरी ।
मनी एकच आशा दर्शनाची
बाप माय तुची माझा हरी ।
भाव श्रद्धा देवा तुझ्या ठायी
टेकवतो माथा तुझ्याच पारी ।
फिटले याची देहाचे पारणे
सफल झाली जन्माची वारी ।
जय जय हरी जय जय हरी
विठ्ठल हरी विठ्ठल हरी ।
Sanjay R.

No comments: