Saturday, July 23, 2022

पाणीच पाणी

नको त्या आठवणी
नको ते विचार ।
वाळूचे घर बांधले
लाटेपुढे होते लाचार ।

जिकडे तिकडे पाणीच पाणी
नाही कशाचाच आधार ।
सतत पडतोय हा पाऊस
सोबत डोळ्यांनाही धार ।

घराला तर छत नाही
उरल्या कुठे भिंती चार ।
शेतात नुसतेच पाणी
डोक्यावर कर्जाचा भार ।

तापाने नुसता फणफणतो 
अंग ही  पडले गार ।
हसू कसा रडू कसा 
जीवनाचा तर हाच सार ।
Sanjay R.

No comments: