Thursday, July 19, 2018

" माह्या वऱ्हाडाची माती "

म्हाया वऱ्हाडाची माती 

फुलवते सारी नाती गोती ।


धनी राबतो थे शेती

होतो वला पावसाच्या घाती ।


पऱ्हाटीले फुटते पाती

वळे कष्टाच्या वाती ।


तवा येयी पयसा हाती

पोसे मानसाच्या जाती ।


घास दोन सारे खाती

कधी उपासाच्या राती ।


तुटे निसर्गाची गती

हाती ढेकलाची माती ।


दिस हपत्याचे साती

जीव उरफाटा घेती ।


अभंग तुकोबाचा गाती

फुले इंच इंच छाती ।


सपन उद्याचे पाहती 

झोप सुखाची राती ।

Sanjay R.


No comments: