Thursday, July 19, 2018

" काय किती भारी "

काय किती भारी
जमात आमची सारी ।
पेलतायेत सगळे
आपापली जवाबदारी ।

गडबड गोंधळ घोटाळे
चाललंय दारोदारी ।
उघडा वर्तमान पात्र
दिसेल नुसती मारामारी ।

संपल्यातच जमा आहे
आता दुनिया दारी ।
पैज लागलं नुसती
कोण कुणावर भारी ।

राजकारणात दिसताहेत
गिधाडं आणी घारी ।
भोग भोगले आम्ही
आता आली तुमची बारी ।

जागोजागी वाळवळतात
हेच नाग विषारी ।
वाजवा कुणी आता
युद्धाची तुतारी ।

रे विठ्ठला फुलली कशी
माणसांनी पांढरी ।
माणुसकीचा दे प्रसाद
होईल सफल जन्माची वारी ।
Sanjay R.



No comments: