Tuesday, June 29, 2021

" आला पाऊस आला "

अष्टाक्षरी

" ओला सुगंध मातीचा "

गेले आभाळ झाकुनी
भासे प्रहर रातीचा ।
वाहे वादळी वारा तो
जसा निधड्या छातीचा ।

कुठे पडली वीज ती
झाला प्रकाश वातीचा ।
सरी सूटल्या नभात
भिजे देह धरतीचा ।

धरा झाली ओली चिंब
पडे पाऊस प्रीतीचा ।
नाही फुलला मोगरा
ओला सुगंध मातीचा ।

बळी राजा सुखावला
आहे तोच हिमतीचा ।
साथ नको सोडू आता
भार झेलतो शेतीचा ।

स्वप्न बघतो डोळ्यात
शेतकरी तो जातीचा ।
सज्ज तो जाहला द्याया
नारा हरित क्रांतीचा ।
Sanjay R.


No comments: