Sunday, June 20, 2021

" येशील ना तुही स्वप्नात माझ्या "

येईल मी स्वप्नात तुझ्या
घेशील ना जवळ तुझ्या ।
सांगिल मी कानात तुझ्या
ऐकशील ना मनातलं माझ्या ।
तुही सांगशील मनाचं तुझ्या
वाटेल बरं मनास माझ्या ।
रंगतील गप्पा तुझ्या माझ्या
सरेल ही रात्र कुशीत तुझ्या ।
येईल मी ग स्वप्नात तुझ्या
येशील ना तुही स्वप्नात माझ्या ।
Sanjay R.

No comments: