Tuesday, July 23, 2019

" धडकी भरली मनात "

भीतीचे ढग पसरलेत आकाशात
विचारांनीच भरली धडकी मनात ।

तेच ते विचार मला कसे घाबरवतात
मग लागत नाही लक्ष माझे कशात ।

संपेल पावसाळा पाणी नाही घरात
अमेरिका पोचला आता इराणच्या दारात ।

युद्धाचे सावट दिसत आहे जगात
प्रत्येकच माणूस आता दिसतोय रागात ।

मोह माया मत्सर संचारला अंगात
दहशतवाद पसरला आला खूप रंगात ।

साधा सरळ माणूस भरडतोय यांच्यात
दुर्धर झालं जगणं उरलं काय जीवनात ।
Sanjay R.


No comments: