Monday, July 22, 2019

" बाप पाठीवर द्यायचा थाप "

वाटायचा मला बाप
का डोक्याला ताप ।
ओरडायचा जेव्हा तो
लागायची श्वासाला धाप ।
ओरडणे त्याचे भल्यासाठी
वाटायचं रोजचाच हा जाप ।
कधी प्रेमाची कधी रागाची
पाठीवर द्यायचा थाप ।
आज कळतंय मनाला
होतो काळजाचा मी काप ।
आयुष्यभर उपसले कष्ट
नव्हता कुठलाच आलाप ।
विसरू नका धावपळ त्याची
घडवलं त्यांनी तुम्हा निष्पाप ।
म्हातारपण सांभाळा त्याचे
दूर लोटून घेऊ नका शाप ।
Sanjay R.

No comments: