Sunday, July 14, 2019

" नको करू उजाड "

रूप कुणाचे
गुण कुणाचा
काय रे तू भाऊ ।
तुझ्या पेक्षा
सुंदर आमचा
काव काव काऊ  ।

सारेगम गातो कसा
ना  आवाज
ना तुला सूर ।
कोकीळ गाते
कुहू कुहू
तूच रे बेसूर ।

चिव चिव चिमणी
साद देऊनी
भुर्रकन उडे ।
डाव साधतो
कसा रे तू
करतो पुढे पुढे ।

हिरवा पोपट
पांढरे कबुतर
सारेच किती छान ।
जंगल झाडे
सरले आता
काय करू तुझे ज्ञान ।

लाव ना रे तू
एक एक झाड
नको करू उजाड ।
पडेल पाऊस
हिरवी सृष्टी
नदी नाले पहाड ।
Sanjay R.

No comments: