Saturday, May 18, 2019

" रे बळीराजा.... "

रे बळीराजा.....
सहनशक्ती तुझी सांग
किती आहे रे अपार ।
कळणार नाही कधीच तुला
त्या चाकूची रे धार ।
नाही ठाव अजब रे 
आहे हे सरकार ।
पोटावर तुझ्या होता
किती किती रे वार ।
सांग तूच आता तुला
आहे कुणाचा आधार ।
किती रे झेलशील तू
हे असलेच प्रहार ।
काळ्या मातीत राबतो
नाही तुज दिस वार।
घरात जगतात किती
सांग किती तुझा भार ।
पै पै लागतो मातीत
घेतो पाऊसच इसार।
सावकारापुढे कसा
होतोस तू लाचार ।
तिसरा मधेच कुणी येतो
करतो तुझा व्यापार ।
खिसा घेतो हिसकावून
आणि सरतात विचार ।
सांग ठणकावून जरा
तूच जगवतो सारा भार ।
नको रे सोसू असा
एकटाच सारे वार ।
फेक फंदा फाशीचा
दे घराला तू आधार ।
टाक उलटून आता
सरकारचा हा दरबार ।
जळून तू रे जळणार किती
राखे विना काय उरणार ।
टाक जाळून तू आता
पडू दे त्यांचेच निखार ।
Sanjay R.

No comments: