Sunday, December 22, 2013

” भुकेला हवी भाजी भाकर ”

घालता फुंकर
उडती पाखर ।
भुकेला हवी
भाजी भाकर ।
sanjay R.


आनंदी बोल
जिवन अनमोल ।
दुखी मन
माती मोल ।
sanjay R.


मनात बहुत
कल्पनांचे झरे ।
आनंदी जिवन
क्षण अपुरे ।
sanjay R.


असतीस तु जाडी
किंवा सनकाडी
परवडली नसती
लाडी गोडी
आठवणीन तुझ्या
धगधगते नाडी
sanjay R.


नको घोडा
नको गाडी
मज हवी
लाडी गोडी
sanjay R.


जिवनाचा आनंद
द्यायचा मज तुला ।
दुखः नाही द्यायचे
मज तुझ्या मनाला ।
sanjay R.


साद तुने द्यावी
कानी माझ्या यावी ।
धाउन येता मी
साथ तुझी असावी ।
sanjay R.


जाणले मी मन तुझे
दे मजसी क्षण तुझे
जगु आता संगतीन
जिवन तुझे माझे
sanjay R.


आठवतात त्या
पावसाच्या धारा
चिंब ओले होउन
वेचलेल्या गारा ।
कागदी नावांचा
खेळ पसारा ।
गाणे पावसाचेनी
ढग गडगडणारा ।
लखलखाट विजेचा
आणी वादळ वारा ।
आला आला पाउस
शाळेला बुट्टी मारा ।
sanjay R.

” दिला पाहुन हिरा ”

आई बाबानी
दिला पाहुन हिरा ।
आता जन्मभर
मागे त्याच्या फिरा ।
sanjay R.


ये माझ्या कवेत
बस अशी नावेत ।
मिळु दे श्वासात श्वास ।
थेंब थेब प्राशन करुनी
विझवु तनाची प्यास ।
sanjay R.


फुलाला अस सजवु
गंध त्यातला घेउ ।
चांदणी रात्र सोबत
बहुपाशात जागउ ।
sanjay R.


कसे सांगु तुजला
मनात आहे लव्ह ।
मनात तुझ्या काय
हूदया माझ्या कळव ।
sanjay R.


मनाच काय
कळत नाय ।
आवाज येतो तिथुन
हेल्लो हाय ।
sanjay R.


वाटत घट्ट बांधाव्या
संग तुझ्या गाठी ।
अम्रुत कराव प्राशन
ओठ लाउनी तुझ्या ओठी ।
sanjay R.


मनात माझ्या
तु अशी बसली ।
सोबत तुझी असतांना
आता चिंता कसली ।
sanjay R.


काय खर काय खोट ।
मन त्याच खुप मोठ ।।
मनात माझ्या तुच राजा ।
का हीच आहे मला सजा ।।
sanjay R.

” परंपरा आणी रुढीं “

हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.


अंबर करता सिंचन
त्रुप्त होई धरा
चढेल प्रीतीला
रंग खरा, वाह धरा ।
sanjay R.



” परंपरा आणी रुढीं “

नक्कीच आपल्या पुर्वजांनी
ज्या परंपरा आणी रुढीं
बांधुन दिल्यात त्या मागे
शास्त्रीय कारणं आहेत ।
आणी आपण बघतोच
आहोत, त्या काळातही
विज्ञान आणी तंत्रज्ञान
बरेच प्रगत होते ।
जसे ईजिप्त मधील
पिऱयामीड, रामाचा
विमान लंका ते अयोद्ध्या
युद्धानंतरचा परतीचा
प्रवास, रामायणातील
युद्धात वापरले गेलेले
विवीध शस्त्र, महाभारतात
संजय द्वारा ध्रुतराष्ट्राला
दिलेला युद्ध व्रुत्तांत, जुन्या
काळातील मंदीर लेण्या
व त्यांचे अद्वितीय बांधकाम
आणी असे बरेच काही
सांगता येयील ।
आणी म्हणुन जुन्या परंपरा
आणी रुढींना नाकारणे
म्हणजे आपलाच मुर्खपणा
ठरेल ।
sanjay R


.आली बघा दिवाळी
चला जाउ खरेदिला ।
खिशात नाही पैसा
कर्ज काढुया खर्चाला ।
चंपु गंपुला नवा शर्ट
हवी साडी रमीला ।
फाटका शर्ट टाचुन घेउ
चालेल मग दिवाळीला ।
मिठाइ फटाके महाग फार
चिवडाच ठेउ फराळाला ।
पावसान यंदा सार नेल
गवत उरलय उपासाला ।
sanjay R.

” दुखःही कसे आनंदी होते “

“दुखःही कसे आनंदी होते”
हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.


कल्पकतेतला रंग
असाच असतो ।
ह्रुदयात जाउन
कसा बसतो ।
मन विखुरते
सैरभैर होते ।
दुखःही कसे
आनंदी होते ।
जिवनही मग
रंगमय होते ।
sanjay R.


जाउ या चला
सागर सफरीला ।
तयार होडी
आहे दिमतीला ।
खारे पाणी
आहे संगतीला ।
झोक लाटांचे
आहे गमतीला ।
हळुच मासा
येयील चमकीला ।
जिव वरखाली
होई भरतीला ।
नभात चांदणी
आली हिमतीला ।
जायचे मज
आता धरतीला ।
sanjay R.


अर्पीला मी जन्म सारा
का तुटला विश्वास तुझा ।
नाही हरीश्चंद्र मी सखा
सोडुन दे आभास तुझा ।
sanjay R.

" आठवणींचा संदुक "

आठवणींचा संदुक
असाच सांभाळुन ठेवायचा
परत परत थर
धुळीचा पुसुन काढायचा ।
sanjay R.


कला अशीच असते ।
कलाकाराला आनंद देते ।
तर रसीकाला त्रुप्ती ।
जिवनात आमच्या डोकावते ।
मन मंत्रमुग्ध होते ।
हळुच झोके घेते ।
आणी सुर उमटतात ।
ये कहा आ गये हम ।
युही साथ चलते चलते ।
sanjay R.


आली आली दिवाळी
जिवनाचे वर्ष एक
कमी करुन गेली
sanjay R.


जगणे असले
जरी येक आभास ।
प्रत्येक क्षण
जिवनाचा आहे खास ।
पार करायचा आपणा
एक एक फास ।
चला करु या आपण
नवजिवनाचा ध्यास ।
sanjay R.


मला पण आहे
कवितेचा ध्यास ।
मिळे आनंद इतका
जगतो रोज एक
नवीन श्वास ।
sanjay R.


झाली तयारी एकदाची
गडबड घाई दिवाळीची
फुरसत नव्हती क्षणाची
संपवा प्लेट आता फराळाची ।
sanjay R.


आली आली
दिवाळी आली ।
फराळाची
तयारी झाली ।
कपडे फटाक्यात
खिसा खाली ।
साडी साठी नाराज
माझी घरवाली ।
महागाईन सारी
फजीती केली ।
कराव काय
कोण नाही वाली ।
सोडुन चिंता
पेटउ मशाली ।
sanjay R.


बस याद उनकी आइ
और होश गवा बैठे हम ।
रातभर ढुंढते रहे फिर
लौट आये होशमे तो
सुबह हुयी ।
शुभ प्रभात ।।