Sunday, December 22, 2013

” भुकेला हवी भाजी भाकर ”

घालता फुंकर
उडती पाखर ।
भुकेला हवी
भाजी भाकर ।
sanjay R.


आनंदी बोल
जिवन अनमोल ।
दुखी मन
माती मोल ।
sanjay R.


मनात बहुत
कल्पनांचे झरे ।
आनंदी जिवन
क्षण अपुरे ।
sanjay R.


असतीस तु जाडी
किंवा सनकाडी
परवडली नसती
लाडी गोडी
आठवणीन तुझ्या
धगधगते नाडी
sanjay R.


नको घोडा
नको गाडी
मज हवी
लाडी गोडी
sanjay R.


जिवनाचा आनंद
द्यायचा मज तुला ।
दुखः नाही द्यायचे
मज तुझ्या मनाला ।
sanjay R.


साद तुने द्यावी
कानी माझ्या यावी ।
धाउन येता मी
साथ तुझी असावी ।
sanjay R.


जाणले मी मन तुझे
दे मजसी क्षण तुझे
जगु आता संगतीन
जिवन तुझे माझे
sanjay R.


आठवतात त्या
पावसाच्या धारा
चिंब ओले होउन
वेचलेल्या गारा ।
कागदी नावांचा
खेळ पसारा ।
गाणे पावसाचेनी
ढग गडगडणारा ।
लखलखाट विजेचा
आणी वादळ वारा ।
आला आला पाउस
शाळेला बुट्टी मारा ।
sanjay R.

No comments: