Sunday, December 22, 2013

” परंपरा आणी रुढीं “

हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.


अंबर करता सिंचन
त्रुप्त होई धरा
चढेल प्रीतीला
रंग खरा, वाह धरा ।
sanjay R.



” परंपरा आणी रुढीं “

नक्कीच आपल्या पुर्वजांनी
ज्या परंपरा आणी रुढीं
बांधुन दिल्यात त्या मागे
शास्त्रीय कारणं आहेत ।
आणी आपण बघतोच
आहोत, त्या काळातही
विज्ञान आणी तंत्रज्ञान
बरेच प्रगत होते ।
जसे ईजिप्त मधील
पिऱयामीड, रामाचा
विमान लंका ते अयोद्ध्या
युद्धानंतरचा परतीचा
प्रवास, रामायणातील
युद्धात वापरले गेलेले
विवीध शस्त्र, महाभारतात
संजय द्वारा ध्रुतराष्ट्राला
दिलेला युद्ध व्रुत्तांत, जुन्या
काळातील मंदीर लेण्या
व त्यांचे अद्वितीय बांधकाम
आणी असे बरेच काही
सांगता येयील ।
आणी म्हणुन जुन्या परंपरा
आणी रुढींना नाकारणे
म्हणजे आपलाच मुर्खपणा
ठरेल ।
sanjay R


.आली बघा दिवाळी
चला जाउ खरेदिला ।
खिशात नाही पैसा
कर्ज काढुया खर्चाला ।
चंपु गंपुला नवा शर्ट
हवी साडी रमीला ।
फाटका शर्ट टाचुन घेउ
चालेल मग दिवाळीला ।
मिठाइ फटाके महाग फार
चिवडाच ठेउ फराळाला ।
पावसान यंदा सार नेल
गवत उरलय उपासाला ।
sanjay R.

No comments: