Sunday, December 22, 2013

" आठवणींचा संदुक "

आठवणींचा संदुक
असाच सांभाळुन ठेवायचा
परत परत थर
धुळीचा पुसुन काढायचा ।
sanjay R.


कला अशीच असते ।
कलाकाराला आनंद देते ।
तर रसीकाला त्रुप्ती ।
जिवनात आमच्या डोकावते ।
मन मंत्रमुग्ध होते ।
हळुच झोके घेते ।
आणी सुर उमटतात ।
ये कहा आ गये हम ।
युही साथ चलते चलते ।
sanjay R.


आली आली दिवाळी
जिवनाचे वर्ष एक
कमी करुन गेली
sanjay R.


जगणे असले
जरी येक आभास ।
प्रत्येक क्षण
जिवनाचा आहे खास ।
पार करायचा आपणा
एक एक फास ।
चला करु या आपण
नवजिवनाचा ध्यास ।
sanjay R.


मला पण आहे
कवितेचा ध्यास ।
मिळे आनंद इतका
जगतो रोज एक
नवीन श्वास ।
sanjay R.


झाली तयारी एकदाची
गडबड घाई दिवाळीची
फुरसत नव्हती क्षणाची
संपवा प्लेट आता फराळाची ।
sanjay R.


आली आली
दिवाळी आली ।
फराळाची
तयारी झाली ।
कपडे फटाक्यात
खिसा खाली ।
साडी साठी नाराज
माझी घरवाली ।
महागाईन सारी
फजीती केली ।
कराव काय
कोण नाही वाली ।
सोडुन चिंता
पेटउ मशाली ।
sanjay R.


बस याद उनकी आइ
और होश गवा बैठे हम ।
रातभर ढुंढते रहे फिर
लौट आये होशमे तो
सुबह हुयी ।
शुभ प्रभात ।।

No comments: