Sunday, December 22, 2013

” दुखःही कसे आनंदी होते “

“दुखःही कसे आनंदी होते”
हलकेच ओढुनी चादर
निवांत निजली चांदणी ।
वेडा चंद्र निघाला
तिज शोधाया हिरकणी ।
sanjay R.


कल्पकतेतला रंग
असाच असतो ।
ह्रुदयात जाउन
कसा बसतो ।
मन विखुरते
सैरभैर होते ।
दुखःही कसे
आनंदी होते ।
जिवनही मग
रंगमय होते ।
sanjay R.


जाउ या चला
सागर सफरीला ।
तयार होडी
आहे दिमतीला ।
खारे पाणी
आहे संगतीला ।
झोक लाटांचे
आहे गमतीला ।
हळुच मासा
येयील चमकीला ।
जिव वरखाली
होई भरतीला ।
नभात चांदणी
आली हिमतीला ।
जायचे मज
आता धरतीला ।
sanjay R.


अर्पीला मी जन्म सारा
का तुटला विश्वास तुझा ।
नाही हरीश्चंद्र मी सखा
सोडुन दे आभास तुझा ।
sanjay R.

No comments: