Friday, June 8, 2018

ढगांची गडगड

चालली ढगांची
नुसती गडगड ।

वाढली छातीत
कशी धडधड ।

बंद बघा झाली
साऱ्यांची बडबड ।

सगळीकडे शांतता
वाऱ्याची सळसळ ।

थेंब पावसाचे
करताहेत तडतड ।

मनात चुकचुकली
पालीची फडफड ।

कोसळली का वीज
झाली तडफड ।

जोर वाढला पावसाचा
घडा भरू दे घडघड ।

देवा शेतं पिकू दे
आभाळ भर ।

शेतकरी राजाला
आता सुखी कर ।
Sanjay R.

No comments: