Wednesday, June 13, 2018

जीवनाचा सार

काय असेल सांगेल कोणी
जीवनाचा या सार ।
सहजच आला मनात माझ्या
नकळत एक विचार ।

पडलो उठलो परी लढलो
कितीक झेलले प्रहार ।
अंतलाच असा मग इतका
का काळा अंधार ।

मागे पुढे आणि आजू बाजू
दिशा असती चार ।
खाली धरती वर आकाश
मधला मीच का निराधार ।

सुख दुःखाच्या वाटा कितीक
कुठे जायचे नव्हता विचार ।
चालत चालत थकलो आता
थांब जरासा सरला आहे बाजार ।

कुणी कुणाचा कोण लागतो
हसतो फुलतो येतो कसा बहार ।
सांज होता परतून फिरतो
ठेऊन जातो उघडे हे दार ।
Sanjay R.

No comments: