Friday, June 29, 2018

" आसवं कशी पुसायची "

पावसाचा रंग कसा उफाळून आला
काळ्या ढगांनी सूर्य झाकून दिला ।।

वाऱ्यालाही बघा किती जोश आला
सळसळती झाडं कशी घेताहेत झुला ।।

सर सर आल्या सरी आसमंत ओला
लोट निघाले पाण्याचे कुठे नदी नाला  ।।

रिमझिम पावसाने कहरच केला
पुराच्या पाण्यासंगे गाव वाहून गेला ।।

नाही उरले घरदार कुठे आडोशाला
पाणीच पाणी जिकडे तिकडे जीवाचा काला ।।

निसर्गाच्या करणीचा नशिबावर घाला
आसवं कशी पुसायची पदरही ओला ।।
Sanjay R.

No comments: