Wednesday, November 15, 2017

" कपसाला का नाही भाव "

काय सांगु राव
नाही कापसाला भाव ।
निवडणुकी आधी
किती मारला ताव ।

चांगल्या दिवसांची
किती वाट पहाव ।
शेतकरी करतो
किती धावाधाव ।

चोर तो माल्या
बनुन बसला साव ।
व्यापार्यांना कीती
पैशाची हाव ।

उपाशी पोटी
झोपतो सारा गाव ।
मेहनत करुनही का
त्यानेच असे मराव ।

उठा कोणीतरी
सांगा बाजार भाव ।
मंतर द्या म्हणा
नाहीतर दिसेल प्रभाव ।

अतीच होतय आता
विसरा घुम जाव ।
जागा झाला बळी तर
उरणार नाही नाव ।
Sanjay R.

No comments: