Saturday, July 6, 2024

पहिल्या पावसाचा आनंद

पहिल्या पावसाचा किती आनंद
धराही होते भिजून कशी धुंद ।

अचानक अवतरतात ढग काळे
मधेच डोकावते आकाश निळे ।

थेंब थेंब जेव्हा बरसतो पाऊस
चिंब भिजून मग फिटते हौस ।

वृक्ष वेली संगे धरा होते आनंदी
दरवळ फुलतो हवा होते सुगंधी ।
Sanjay R.



Thursday, July 4, 2024

प्रेमाचा चहा

चहाची तलफच भारी
छोटे मोठे त्याच्या आहारी ।

सकाळ होताच हवा कप भर
नाही तर डोके होते अधर ।

कुणाला गोड कुणाला फीक्का
चहा मात्र हवा एक कप पक्का ।

दुधाचा असो वा असो काळा
चहा विना तर सुकतो गळा ।

ऑफिस असो वा असू दे घर
येता जाता म्हणतो चहाच कर ।

पाहुणा असो वा असो मेहुणा
सहज म्हणतो थोडा थोडा घेऊना ।

काम काढायचा पण एकच मंत्र
चहा विना हो जमते कुठे तंत्र  ।

कुठलेही संकट कुठलीही आपत्ती
चहाच घालवतो सारी विपत्ती ।

सगळ्याच गोष्टींवर चालेना हत्ती
गुणकारी किती या चहाची पत्ती ।
Sanjay R.


Wednesday, July 3, 2024

गेले ते दिवस

गेलेत हो ते दिवस
आलोय मी कुठे ।
परत नाही येणार
दिवस तेच इथे ।

हसणे रडणे खेळणे
दिवसभर भटकणे ।
मोठा मी झालो ना
दिवस होते ते जुने ।

आईचा तो मार
बाबांचा होता धाक ।
भ्यायचो ना किती
ऐकताच ती हाक ।

शाळा असो वा घर
मस्ती करायची खूप ।
वरण भातावर वाढे
आईच जास्त तूप ।

हवे ते मिळायचे
चिंता नव्हती कशाची ।
बाबाही किती झटायचे
नसे काळजी खिशाची ।

पावसात मस्त भिजायचो
उन्हा तान्हात खेळायचो ।
मित्रांसोबत आम्ही तेव्हा
पेरुही कसे चोरायचो ।

सारच संपलं आता
उरल्या फक्त आठवणी ।
किती छान होती ना
आजीची ती कहाणी ।

खूप वाटत मनाला
हवे परत तेच दिवस ।
सांगा ना कोणी मला
करू कुणाला नवस ।

Sanjay R.


Tuesday, July 2, 2024

साथ

मन तुझे हरपले
मी हरवलो त्यात ।
माझा मी न उरलो
देशील का साथ ।
Sanjay R.

Monday, July 1, 2024

तुझी माझी कथा

तुझी आणि माझी
एकच आहे कथा ।
जिवनभराची साथ
आयुष्याची गाथा ।

डोळ्यातले अश्रू
अंतरातली व्यथा ।
हवे असो वा नको
पण सांभाळली प्रथा ।

कष्ट तुझेही त्यात
लढलो मीही स्वतः ।
गोड झाला संसार
हवेच काय आता ।
Sanjay R.